[ज्योतिष] माझा उत्कर्ष कुठे होईल?

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
15 Jul 2011 - 1:57 pm

माझा उत्कर्ष केव्हा होईल आणि कुठे होईल? हा ज्योतिषांना कायम विचारला जाणारा प्रश्न.यातल्या "केव्हा"चे उत्तर देण्यासाठी दशा, गोचर ग्रह, चलित ग्रह इत्यादींचा उपयोग केला जातो. तर "कुठे" हा प्रश्न पारंपरिक ज्योतिषात अजब तर्‍हानी हाताळला जातो. प्रश्नांची उत्तरे पण संदिग्ध अशीच असतात. पाण्याजवळ उत्कर्ष होईल किंव जुनाट अथवा वडलोपार्जित वास्तूत उत्कर्ष होणार नाही इ. इ. मात्र आधुनिक ज्योतिषात यातील "उत्कर्ष कुठे" या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जी पद्धत वापरली जाते, ती ज्योतिषातील मूळ गृहितकांशी सुसंगत अशीच आहे.

आधुनिक ज्योतिषातील एक मूलभूत तत्त्व असे आहे - उगवते म्हणजे लग्नबिंदूशी युती करणारे आणि ख-मध्याशी युती करणारे (जन्मवेळी बरोब्बर डोक्यावर असलेले) ग्रह हे फलिताच्या दृष्टीने ताकदवान असतात. म्हणजे एखाद्या पत्रिकेत रवि-गुरु युती जर जन्म वेळेला उगवत असेल किंवा बरोबर डोक्यावर येत असेल तर ती व्यक्ती तिच्या जन्मस्थळी उर्वरीत आयुष्य जगल्यास नक्कीच उत्कर्ष साधेल. पण या व्यक्तीने स्थलांतर केले तर नव्या ठिकाणी पत्रिकेचे स्थानांतर केल्यावर स्थानांतरीत लग्न किंवा ख-मध्य यांच्याशी होणारे योग विचारात घावे लागतात.

अधिक वाचण्यासाठी इथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com/

ज्योतिष

प्रतिक्रिया

गवि's picture

15 Jul 2011 - 3:44 pm | गवि

नॉट समझींग्ड..

नावातकायआहे's picture

15 Jul 2011 - 3:50 pm | नावातकायआहे

हा लेख वाचुन न्ह्याय. ह्यो १०० % पटले.....

मितभाषी's picture

15 Jul 2011 - 4:03 pm | मितभाषी

मिपावर तरि होणार नाही असा होरा वर्तवतो. हॅ हॅ

भावश्या.

शाहिर's picture

15 Jul 2011 - 4:28 pm | शाहिर

अजुन एक!

म्हणजे?? स्थानांतर केलं की लग्न बदलतं ??

हो..... जाईल त्या शहरात वेगळे घर असेल... तर त्या प्रत्येक घरात (वेगवेगळया) लग्नाची (वेगवेगळी) बायको असणार ना!

सूड's picture

16 Jul 2011 - 7:06 pm | सूड

__/\__ धन्य आहात !! :D
मी लग्न म्हणजे लग्नीच्या राशीबद्दल बोलत होतो. बादवे, तुम्ही म्हणता ती शक्यता नाकारता येत नाहि.

पंगा's picture

16 Jul 2011 - 7:12 pm | पंगा

'अ वाइफ इन एवरी पोर्ट'ची आठवण झाली.

धनंजय's picture

17 Jul 2011 - 7:19 am | धनंजय

"अ सेलर ऑन एव्हरी शिप" सुद्धा!

लग्नी उच्चीचा गुरु असेल तर कुठे प्रकाश पडेल ते प्लीज सांगा :(
का फक्त "कोलेस्ट्रॉल" वाढवतो? :(

नुसता लग्नी उच्चीचा गुरु याला माझ्या दृष्टीने फारसा अर्थ नाही. त्याने इतर योग काय केले आहेत हे पण बघावे लागते. शिवाय गुरु बरोबर तयार झालेले मध्यबिंदू पण विचारात घावे लागतात.

रामदास's picture

15 Jul 2011 - 8:35 pm | रामदास

एक विनंती आहे. आपल्यापैकी बर्‍याच मिपाकरांना हा विषय न समजण्यासारखा आहे.थोडे सोपे करून लिहीता येईल का ? तसेच पुढील वाचनासाठी ब्लॉग वर जावे या सल्ल्यानुसार तेथेही गेलो पण फारसे समजले नाही. शशिकांत ओक जुलैच्या अखेरीस ठाण्यात येणार आहेत. तेव्हा तुम्ही पण येऊ शकाल का ?
हा आणि ब्लॉगवरचा लेख हे दोन्ही ज्योतीषानी ज्योतीषासाठी लिहीलेले वाटले म्हणून ही विनंती.
आपले बाकीचे धागे मनोरंजक असतात हे येथे नमूद करीत आहे.

अनेक वैयक्तिक कारणांमुळे मला पुण्याबाहेर पडणे सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे आपली भेट घेऊ शकत नाही, या बद्दल क्षमस्व!
आपल्या अभिप्रायाची नोंद घेतली आहे.

इंटरनेटस्नेही's picture

15 Jul 2011 - 9:20 pm | इंटरनेटस्नेही

माझा उत्कर्ष केव्हा होईल आणि कुठे होईल?

मिपा दुर्लक्षित पँथर मध्ये प्रवेश केल्यावर! आम्ही तुम्हाला राजज्योतिष्याचे पद देऊ!
-
मिपा दुर्लक्षित पँथर

कवितानागेश's picture

16 Jul 2011 - 8:56 am | कवितानागेश

ब्लॉगवरचा लेख वाचल्यावर कळले.
एक शंका; आधुनिक ज्योतिष अणि पुरातन ज्योतिष असा फरक खरंच आहे का?
जुन्या पद्धतीतदेखिल, लग्नस्थान अणि दशमस्थानच जास्त महत्त्वाचे समजले जाते.

युयुत्सु's picture

16 Jul 2011 - 10:49 am | युयुत्सु

असा फरक खरंच आहे का?

हो असा फरक आहे. हर्षल नेप्च्युन आणि प्लुटोच्या अंतर्भावानंतर हा फरक अधिक स्पष्ट होऊ लागला.

पण फार कमी जणांच्या लग्नी वा खमध्यावर ग्रह असतो... तिथे अंश पाहुन नुसते ठरवता येईल... ? का केपी चे अंश पहावे ??? का लग्नी वा दशमात वा नवमात भावमध्य असणारे नक्षत्र पहावे ???

आणखीन एक विचारायचे आहे..
एक जातक मला सारख विचारात आहे, की पी-जी शिक्षणासाठी अ‍ॅडमिशन पुण्याला घ्यावी, कलकत्याला घ्यावी का कोल्हापुरला घ्यावी? कुठे लाभेल हे पत्रिकेवरुन कसे ठरवणार ??? चतुर्विशांश वर्ग कुंडली वरुन विद्या बघतात, त्यावरुन काही मदत होईल का ????????????

आत्मशून्य's picture

16 Jul 2011 - 11:41 am | आत्मशून्य

पण तूमचे प्रश्न आपण एखाद्या खर्‍या जाणकार व्यक्तीला का विचारत नाही ? मी इतकच म्हणेन

पण फार कमी जणांच्या लग्नी वा खमध्यावर ग्रह असतो... तिथे अंश पाहुन नुसते ठरवता येईल... ? का केपी चे अंश पहावे ??? का लग्नी वा दशमात वा नवमात भावमध्य असणारे नक्षत्र पहावे ???

केपी चे अंश पहा व त्यातून नवमात भावमध्य असणारा नक्षत्र प्रभाव कारण घ्या.

एक जातक मला सारख विचारात आहे, की पी-जी शिक्षणासाठी अ‍ॅडमिशन पुण्याला घ्यावी, कलकत्याला घ्यावी का कोल्हापुरला घ्यावी? कुठे लाभेल हे पत्रिकेवरुन कसे ठरवणार ??? चतुर्विशांश वर्ग कुंडली वरुन विद्या बघतात, त्यावरुन काही मदत होईल का

चतुर्विशांश वर्ग कुंडली वरुन मदत होल पण हे करताना दशस्थानातील उच्च भाव अभ्यासून सप्तमस्थानी केतूचा भाव किती फरक पाडतो याकडे लक्ष जरूर ठेवावे.

युयुत्सु's picture

16 Jul 2011 - 11:58 am | युयुत्सु

श्री आपटे यांस,

तिथे अंश पाहुन नुसते ठरवता येईल.

नुसते अंश पाहून ठरवता येणार नाही. या अंशाबरोबर कोणते ग्रह-योग ( उदा. लाभ, नवपंचम केंद्र, अर्ध केंद्र इ, व मध्यबिंदू) होतात ते बघावे लागेल.

"पुण्याला घ्यावी, कलकत्याला घ्यावी का कोल्हापुरला घ्यावी? कुठे लाभेल हे पत्रिकेवरुन कसे ठरवणार"

चतुर्विसांश कुंडलीचा अभ्यास मी केलेला नाही, त्यामुळे त्यावर मी भाष्य करणे योग्य होणार नाही. जातकाने सूचावलेल्या तिनही ठिकाणांसाठी पत्रिका मांडून प्रत्येक ठिकाणच्या ख-मध्याबरोबर होणारे ग्रह तपासावे लागतील.

धन्यवाद...

गणित मांडून बघतो. सोल्युशन मिळाल्यास उत्तमच !!! त्या ठिकाणच्या ख-मध्यावर होणारे योग बघणे हे लॉजिकल वाटते ..........

नितिन थत्ते's picture

16 Jul 2011 - 2:06 pm | नितिन थत्ते

तुम्ही गणित मांडणार ते पृथ्वी गोल समजून मांडणार की त्रिकोणी?

त्रिकोणी पृथ्वीचे गणित वेगळे असते का?

काही ही समजुन मांडले तरी ते ज्योतिष समजणार्‍यांसाठी असेल. पाखंडी नास्तिकांना त्याची फिकीर का पडावी ;) ?

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jul 2011 - 11:45 am | परिकथेतील राजकुमार

युयुत्सु काका ही तुमची लेखन शैलीच अशी आहे का तुम्ही उगाच अवघड करुन लिहिले आहे ?

तसे मला स्वतःच्या आणि तुमच्या किंवा कोणाच्याच भविष्यात काडीचा रस नाहीये. पण एक आपली चोंबडी उत्सुकता म्हणुन विचारतोय.

युयुत्सु's picture

16 Jul 2011 - 12:01 pm | युयुत्सु

परा,

उगाच अवघड कशाला करू? तांत्रिक भाषा अपरिहार्य ठरते तेव्हा असे होते?

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jul 2011 - 12:51 pm | परिकथेतील राजकुमार

अहो काका पण मग आवड निर्माण कशी होणार ?

तुम्ही जे सांगताय ते थोडे थोडे का होईना आपल्याला कळतय किंवा हे जे समोर लिहिलेले आहे ते आपल्या अकलेत सामावणारे आहे असे आम्हाला वाटेल तेव्हाच आम्ही थोडा इंट्रेस्ट दाखवणार ना :(

विनायक प्रभू's picture

16 Jul 2011 - 12:17 pm | विनायक प्रभू

लग्न स्थानी ख मध्यावर ग्रह?

Nile's picture

16 Jul 2011 - 12:33 pm | Nile

आमच्या लग्नस्थानी मध्यावर ळ ग्रह आहे म्हणे!! म्हणजे काय हो मास्तर?

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jul 2011 - 12:52 pm | परिकथेतील राजकुमार

निळ्या तू मिपाचा शनी आहेस मेल्या आणि ती अदिती साडेसाती.

आणि तू काय चंद्र काय रे शिंच्या?

सूड's picture

16 Jul 2011 - 7:14 pm | सूड

कारण चंद्राच्या आदल्या स्थानात शनी आला की चंद्राला साडेसाती लागते असं म्हणतात. ;)

विजुभाऊ's picture

16 Jul 2011 - 9:12 pm | विजुभाऊ

बरेच दिवसानी श्री श्री परा गुर्जींशी सहमत होण्याचा योग आला

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Jul 2011 - 9:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ए साडेसात नै रे, ३.१४ बद्दल बोल हवं तर. तुझं मेल्या गणितच चुकीचं!

विनायक प्रभू's picture

16 Jul 2011 - 12:45 pm | विनायक प्रभू

(मंग)ळ ग्रह मध्यावर म्हणजे चांदी आहे रे तुझी निळ्या.
काहीही का(ळ)जी करायचे करायचे कारण नाही.

Nile's picture

16 Jul 2011 - 1:00 pm | Nile

हा कंसातला ळ जास्त बरोबर दिसतोय!! ;-)

राजेश घासकडवी's picture

18 Jul 2011 - 6:00 am | राजेश घासकडवी

माझ्या मते दोन भरीव कंस आणि एक ळ असल्यावर मध्यभागी शुक्राचा उंचवटा का नाही येणार? उच्चीचा गुरू मग लपवायलाच त्रास पडेल. ताबडतोब युती होणं आवश्यक.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2011 - 2:46 pm | परिकथेतील राजकुमार

माझ्या मते दोन भरीव कंस आणि एक ळ असल्यावर मध्यभागी शुक्राचा उंचवटा का नाही येणार?

शमत आहे.

तो यायलाच हवा. तसे न घडल्यास शुक्र दूर्बल आहे असे समजुन घ्यावे व पत्रिकेत योग्य ती उपाययोजना करावी.

तसेच दोन भरीव कंस आणि एक ळ याजोडीला दैदिप्यमान चंद्रमाची युती झाल्यास अमृतयोग घडतो.

होरापंडित
परा

विनायक प्रभू's picture

16 Jul 2011 - 7:31 pm | विनायक प्रभू

हातावर शुक्राचा उंचवटा असला की बरेच काही योग जुळुन येतात असे कळते. मग लग्नी गुरु आणि हातावरचा शुक्राचा उंचवटा ह्याचा परस्पर संबंध काय?
जाणकारांनी प्रकाश टाकावा.

माझे लग्न किति जन्म कंटिन्यु होईल हे कळेल का माझ्या पत्रिकेवरुन ?
अ‍ॅडिअशनल जन्म वाढवुन घेन्यासाठि काही शांतिबिंती, होमहवन, साप बोकड बळीबीळी वगेरे वगेरे काय करावे लागेल ?
किति खर्च येईल ?
क्रुपया आकडा USD मध्येच सांगावा. ते usd-to-inr कनवर्शन लवकर जमत नाही.

गणपा's picture

18 Jul 2011 - 1:44 pm | गणपा

तुमच्या जोडिदारालाच चेंज हवा असेल तर?
अ‍ॅडिअशनल जन्म सोडा वडाला उलटे फेरे पडायचे आणि साता पैकी उरलेले जन्म पण जायचे हातुन
;)

जौ द्या हो नकु.
तुमचे पत्नी पिरेमा बद्दल लै ऐकुन हाय तवा हे पांढर्‍या शाईत लिव्हलेले हलकेच घ्याल अशी आशा धरतो. :)