मोहोर
नियतीच्या सहस्त्रभुजांत अजस्त्र विक्राळ जोर आहे
विधीलिखितावर अटळपणाची उमटलेली मोहोर आहे
टेबलाशी, खुर्चीत एकेक खिडकीशी बसला चोर आहे
उपोषणांवर वांझपणाची उमटलेली मोहोर आहे
आग्रा कधी अमृतसर कधी मोहाली कधी लाहोर आहे
मूक थडग्यांवर अहिंसेची उमटलेली मोहोर आहे
जन्मानंतर तोडती नाळ जणू कापलेला दोर आहे
अंतापर्यंतच्या भटकण्यावर उमटलेली मोहोर आहे
भरल्या पोटी गातो गाणे निरंजन भाव विभोर आहे
झगड्यावरती रोज लाखोंच्या उमटलेली मोहोर आहे
व्वाह!!
वाहव्वा
मस्त !!!
गझल खुपच सहि आहे .. मनापासुन