Skip to main content

संडे स्पेशल ( आंब्याचे सांदणे)

लेखक स्वाती राजेश यांनी सोमवार, 19/05/2008 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली आंब्याच्या रसाचे डबे सहज उपलब्ध असतात. त्यामुळे हे पक्वान्न केव्हाही करता येते. आंब्याच्या रसाच्या रंगामुळे अतिशय सुरेख दिसते व चवही उत्तम लागते. फक्त वाफवून करायचे आहे, त्यामुळे तब्येतीस चांगले व पौष्टीकही आहेच! सीझन मधे आंबे मिळतात, तेव्हा त्यांचा ताजा, हापूस आंब्याचा रस वापरला तरी चालतो. साहित्यः २ वाट्या तांदळाचा रवा किंवा साधा रवा २ वाट्या साखर २ वाट्या हापूस आंब्याचा रस १/२ वाटी दूध जरूरी नुसार २ टी.स्पून लोणी ताटाला लावण्यास साजूक तूप १.प्रथम तांदळाचा रवा भाजून घ्यावा. तो जरा गार झाला कि पाण्याने धुवून पाणी पुर्ण निथळून द्यावे व तसाच अर्धा तास ठेवावा. २.आता त्यात आंब्याचा रस, साखर, लोणी,मीठ घालून हाताने चांगले कालवावे. हे मिश्रण जरा सैलसर असावे, त्यासाठी जरूर वाटली तर दुध घालून ढवळावे. व तासभर तसेच ठेवावे. ३.तूप लावलेल्या ताटात मिश्रण ओतून ढोकळ्याप्रमाणे सांदणे उकडावीत. ४.गार झाल्यावर वड्या कापाव्यात. टीपः आंब्याच्या रसाऐवजी फणसाचे गरे किंवा जून काकडी किसुन रस काढून घ्यावी किंवा गाजर किस घालूनही सांदणं चांगली होतात. थोडे दुध घालून बारीक वाटून घ्यावे बाकि प्रमाण, कृती सारखीच.

वाचने 6641
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया