साहित्यः
१/२ कपपेक्शा किंचित जास्त किंवा ४ आऊंस बेकिंग चॉकलेट
१/२ कपपेक्शा किंचित जास्त किंवा ४ आऊंस अनसॉलटेड बटर
१/३ कप साखर
२ अंडी
१/४ कप मैदा
पाकृ:
बेकिंग चॉकलेटचे बारीक तुकडे करून डबल बॉयलर वापरून वितळवून घेणे .( डबल बॉयलर म्हण्जे एका मोठया भांड्यात पाणी घेऊन उकळ्णे व त्यावर दुसरे भांडे ठेवून त्यात चॉकलेट घालणे म्हण्जे गरम पाण्याच्या उष्णतेने ते वितळेल .)
चॉकलेट पूर्ण वितळले की भांडे खाली उतरवून त्यात बटर घालून चांगले एकजीव करावे.
दुसर्या भांडयात अंडी व साखर हलके होईपर्यंत फेटावे. अंडयाचे मिश्रण व मैदा हळु-हळु चॉकलेटच्या मिश्रणात घालून नीट एकत्र करुन घ्या.
रॅमॅकिन पॉट ला बटरने ग्रीज करुन घ्या. (रॅमॅकिन पॉट नसतील तर सिरॅमिक, पोरसेलिन किंवा ओव्हन सेफ मफिन चे साचे वापरले तरी चालतील.)
रॅमॅकिनमध्ये मिश्रण ओतून प्री-हिट केलेल्या ओव्हन मध्ये १८० डीग्रीवर १०-१२ मिनिटे बेक करा.
बेक झाल्यावर दोनच मिनिटे बाहेर ठेवून लगेच सर्व्हींग प्लेट मध्ये काढा व थंडगार आईस्क्रिम बरोबर खायला सुरुवात करा.
जसा तुम्ही केकेचा चमच्याने घास घ्याल तेव्हा तुम्हला आतुन चॉकलेटचा लावा बाहेर येताना दिसेल, म्हणुन ह्याला मोल्टन लावा केक असे म्हणतात :)
वाचने
6336
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान पाकृ! फोटू पाहूनच वजन
सही.
लावा केक आणि लावा मोबाईल , हे
In reply to सही. by आत्मशून्य
मस्त
जाम भारी, डाएटचा विचार काही
मस्त! मस्त! मस्त!
वाव, तोंडाला पाणी सुटले ग...
तुफ्फान!! कसल जबरी दिसतंय गं
रॅमॅकिनमध्ये मिश्रण ओतून
रॅमॅकिनमध्ये मिश्रण ओतून
In reply to रॅमॅकिनमध्ये मिश्रण ओतून by अभिज्ञ
मस्तं !
मस्त..
यम्मि यम्मि ! तुझ्या रेसेपि
मस्त.
गणपा तुम्ही कधीही येऊ शकता
तोंडाला पाणी सुटले!