Skip to main content

फिशपाँड....

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 19/05/2008 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच एका प्रतिसादात ऋषिकेशने वापरलेला कंडा हा शब्द बघितला. खूप दिवसांनी हा शब्द समोर आला. तसा हा शब्द खूपच जुना. भाईकाकांनी पण हा शब्द वापरला आहे, पूर्वरंग मधे, मलाय भाषेत त्यांना हा शब्द 'मुलगी' ह्या अर्थी सापडला होता. मी सुद्धा आठवायचा प्रयत्न करायला लागलो की आमच्या वेळेला काय शब्द फेमस होते ते... पण छया: काही आठवायला तयार नाही. पण तेवढ्यात एकावरून एक असे काहितरी जुने जुने आठवायला लागले आणि अचानक आमच्या शाळेत १०वी च्या शेवटी झालेला 'सेंड ऑफ' चा कार्यक्रम डोळ्यासमोर आला. खासकरून त्यातले काही फिशपाँड्स... त्यात काही 'नेहमीचे यशस्वी' घिसेपिटे होतेच, उदा. चंद्र वाढतो कलेकलेने, '----' वाढतो/ते किलोकिलोने वगैरे... पण काही मात्र खतरनाक आणि 'वाईट्ट' होते. त्यातले काही इथे देतो आहे. एक मुलगी जरा 'अशीच', म्हणजे 'अशीच', अहो अशीच म्हणजे मित्र वगैरे अगदी भरपूर तिला.... 'लेक लाडकी ह्या घरची, होणार सून मी दहा घरची' आम्हाला १०वीत इंग्लिश मधे एक धडा होता त्यात एक मेड्यूसा नावाची चेटकीण होती जिच्या डोक्यावर केसांच्याऐवजी नागमोडी साप होते... मग काय एक मुलगी होती आमच्या वर्गात कुरळ्या, केसांची तिला मेड्यूसा हे नाव अपरिहार्यच ना.... तिला... 'अटक मटक चवळी चटक, मेड्यूसाच्या डोक्याची *** सटक' असेच काही काही... तुमच्या कडून पण ऐकायला आवडेल....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11991
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया