बाबा रामदेव, वेळीच जागा हो..! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
7 Jun 2011 - 9:45 am
गाभा: 

१) मी स्वत: कट्टर काँग्रेस अन् सोनिया विरोधी आहे,
२) भ्रष्टाचार हटवण्याची किंवा काळा पैसा भारतात आणण्याची आजच्या केन्द्र सरकारची मानसिकता नाही आणि तशी प्रबळ राजकीय इच्छाशक्तिही नाही हेही मी ठामपणे नमूद करतो.
३) मी स्वत: रामबाबाच्या योगविद्येचा आदर करतो आणि त्याकरता माझा त्याला दंडवतच आहे.

तरीही असे लिहावेसे वाटते की,

पोलिसांनी आंदोलकांना रामलीला मैदानातून हाकलताना बायकांना आणि लहान मुलांना मारले असे रामबाबा सांगत आहे. परंतु त्यात फारसे तथ्य दिसत नाही. अन्यथा पोलिस लहानमुलांना आणि बायकांना फटकावताहेत, हे चित्र कुठल्या ना कुठल्या वाहिनीवर नक्कीच दिसले असते; कारण प्रत्येकच वाहिनी मध्यरात्रीची ती प्रत्यक्ष दृष्ये दाखवत होती. अर्थात, खरोखरच जर त्यांना मार पडला असेल तर ती सरकारची केव्हाही चूकच आहे..

तरीही पोलिस हरकत में आ गई आणि केवळ शक्तिप्रदर्शनाकरता जमवलेल्या ५०००० च्या त्या गर्दीला तेथून रातोरात हाकलले ते एका अर्थी बरेच झाले. त्या गर्दीत फुकाचे साधुसंत आणि यूपीतले बरेचसे रेमेडोके भय्येच अधिक दिसत होते हे आग्रहाने नमूद करावेसे वाटते..!

बाकी सांगायचे म्हणजे एकूणच रामबाबाच्या ह्या आंदोलनात त्याने **अत्यंत ढोबळ अन् बेफाट** मागण्यांच्या निमित्ताने केलेले राजकीय (?) शक्तिप्रदर्शनच अधिक होते.

** १) आत्ताच्या आत्ता परदेशात जा अन् तेथील बँकातील काळा पैसा घेऊन या..!
- म्हणजे पोतीच्या पोती घेऊन परदेशात गेले आणि तेथील सारा काळा पैसा घेऊन पुढच्याच विमानाने भारतात परत आले इतके हे सोप्पे आहे का?

**२) ५०० आणि १००० च्या नोटा लग्गेच फर्मान काढून रद्द करा..!
- अहो पण याला काही अन्य पर्याय..?

**३) वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांत द्या..
- पण तुमच्याकडे तसा अभ्यासक्रम तयार आहे का? तसे शिक्षक आहेत का? तश्या काही ठोस योजना तयार आहेत का?

वगैरे वगैरे.. **

योगविद्या शिकवणारा रामबाबा गेल्या काही काळापासून भलताच अहंकारी होत चालला होता. शिवाय तो एक हलक्या कानाचा अन् हुऱळून जाणारा साधूही आहे. त्याला आंदोलनाच्या ह्या हरबर्‍याच्या झाडावर कुणीतरी चढवला आणि तो सुसाट चढत सुटला. त्यातच अण्णांच्या आंदोलनाला सार्‍या देशाने आणि आंतरजाल जगताने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्याद्वारे रातोरात ष्टार झालेले अण्णा, हे पाहून रामबाबाही अंमळ खुळावला असावा, किंबहुना त्याचा जळफळाटच अधिक झाला असावा. आणि त्यामुळेच अण्णांचे हे आंदोलन तो काहीही करून हायजॅक करू पाहू लागला. मिडियाचे आपल्याकडे लक्ष जाऊन आपण सतत प्रकाशाच्या झोतात कसे राहू हे तो पाहू लागला.

अण्णांच्या आंदोलनाला/उपोषणाला जशी काही एक भक्कम वैचारीक बैठक आहे तशी काहीही बैठक रामबाबाची नाही. शिवाय अण्णांच्या मागे अरविंद केजरीवाल नामक एक चाणक्यही आहे जो अत्यंत हुशार मनुष्य आहे, काही एक चांगले करू पाहणारा आहे. अत्यंत कर्तबगार आणि निस्पृह पोलिस अधिकारी असलेल्या डॉ किरण बेदी याही अण्णांच्या पाठीशी आहेत. तसे या रामबाबाच्या मागे कुणी आहे का?

रामलीला मैदानावरील आंदोलनाच्या मंचावर ही ऋतंबरा कशाकरता आली होती? (तिला सारेजण 'साध्वी' ऋतंबरा असे संबोधतात. परंतु तिच्याबद्दल कुठलीही व्यक्तिगत माहिती मला नसताना मला व्यक्तिश: तिला 'साध्वी' असे संबोधणे उचित वाटत नाही. मनुष्यप्राणी हा जबर स्खलनशील आहे असा माझा ठाम विश्वास आहे. असो..!) :)

दिल्लीहून हुसकून हरिद्वारला पाठवलेला रामबाबा तिथे गेल्यावर अजूनही काही वाट्टेल ते बरळतो आहे. म्हणे ५००० माणसे बेपत्ता आहेत, मला ठार मारण्याचा सरकारचा डाव होता वगैरे वगैरे..

अरे रामबाबा, मेल्या योगी ना तू? मग तू कसा काय इतका जबर अहंकारी? अण्णा हजारेंवर जळ जळ जळून तुझा नक्की काय फायदा होणार आहे? 'तुझे आहे तुजपाशी' नाटकात पुलं म्हणाले होते की सन्याशाची वस्त्र ही भयंकर असतात, ती सारे अंग भाजून काढतात. रामबाबा, तूर्तास तुझीही नेमकी तशीच अवस्था झाली आहे. लेका, तुझ्यासारख्या योग्यापेक्षा आठवड्याला एक-दोनदा क्वार्टर अन् मच्छीचं जेवण जेवणारे, सुंदर-आकर्षक आणि कमनीय बायकांकडे पाहून मनातल्या मनात पाघळणारे आमच्यासारखे भोगी बरे की रे..! :)

तेव्हा रामबाबा, जागा हो. आजही तू एक मोठा योगाचार्य आहेस. तेव्हा तू आपला तुझी योग्यविद्याच आम्हा सार्‍या भारतीयांना शिकवून सोड कसा..!

जमल्यास तुझ्या योगसामर्थ्याच्या बळावर मस्तपैकी एकसे एक स्त्री शिष्यांना पटव ( तूर्तास तसं काही नसावं हा माझा अंदाज! ;) ) आणि मस्त मजा कर, असा आपला जाता जाता माझा तुला एक व्यक्तिगत सल्ला..! ;)

काय बोल्तो..? :)

तुझा,
तात्या.

प्रतिक्रिया

विशेषतः

**२) ५०० आणि १००० च्या नोटा लग्गेच फर्मान काढून रद्द करा..!
- अहो पण याला काही अन्य पर्याय..?

अगदी अगदी..

एटीएम मधे हजार पाचशेच्या नोटा असतात म्हणून दिवसभर तरी पुरतात. शंभर पन्नासच्या ठेवल्या तर दर अर्ध्या तासाने एटीएम रिकामे होईल आणि कॅश व्हॅन पाठवावी लागेल. किंबहुना एक लोड करणारा मनुष्य आणि गनमॅन प्रत्येक एटीएमला कॅशची सूटकेस घेऊन बसवावे लागतील.

त्यांच्या मागण्या अवास्तव आहेत, अशक्य कोटीतल्या आहेत. मूळ हेतू चांगला वाटतो, तरीही.

मालोजीराव's picture

7 Jun 2011 - 11:56 am | मालोजीराव

२) ५०० आणि १००० च्या नोटा लग्गेच फर्मान काढून रद्द करा..!

दरडोई उत्पन्नाचे मोठ्या नोटेशी असलेले प्रमाण हे जास्तीत जास्त पटीमध्ये असायला हवे,जे आपल्याकडे फक्त २४ पट आहे आणि प्रगत देशांमध्ये ३०० ते ४०० पट आहे (उदा. जपान,युरोपियन देश,अमेरिका) .जशी अमेरिकेत सध्या सर्वात मोठी नोट फक्त १०० डॉलर आहे.याला कारण म्हणजे काळ्या पैश्याचा आणि रोखीच्या व्यवहाराचा वापर कमी व्हावा आणि प्लास्टिक मनी वाढावी म्हणून १९६९ साली रिचर्ड निक्‍सन यांनी १०० डॉलरवरील सर्व नोटा रद्द केल्या.

पण या बाबाला यामागचं अर्थकारण काय कळणार आहे म्हणा....उचलली जीभ आणि लावली टाळ्याला...
आणि अण्णानबद्दलचं अहंकारासन आणि जळफळाटासन...कधी सुटेल देव जाणे...यातून भ्रष्टाचार विरोधी ऐक्यात फुट पटेल बाकी काई नाही.

असे नाहीं. आज कुठला माणूस रोजच्या खरेदीला १०००च्या नोटा घेऊन जातो?
या नोटा मूलत: रोखीच्या (गैर)व्यवहारात वापरायला सोयीच्या असतात.
५०० आणि १०००च्या नोटा तर नक्कीच रद्द झाल्या पाहिजेत. फार तर २०० रु.ची नवी नोट काढावी.
इंडोनेशियासारख्या रोखीने(च) व्यवहार होणार्‍या देशातही मोठ्यात मोठी नोट ५०० रु.चीच आहे.
तरी ५०० व १००० च्या नोटा काढून २०० ची नोट आणावी असे वाटते.
शिवाय प्लास्टिक पैशाच्या व्यवहाराला (तेही कर्जबाजारी न करणार्‍या Debit Card वर भर देऊन) उत्तेजन द्यावे असे मला वाटते.

तुमचे म्हणणे मान्य आहे. अगदी सहमत आहे. ऐकीव माहितीनुसार कोणतीही नकली नोट बनवायचा खर्च साधारण १७ रुपये पडतो. ५०० आणि १००० च्या चलनामुळे त्यांना फायद्यात पडते. जर हेच चलन मोठ्यात मोठे १०० ठेवले तर नकली नोटा बनवणार्यांवर आळा बसेल अशी आशा वाटते.

राही's picture

8 Jun 2011 - 5:03 pm | राही

एक हजार रुपयाची नोट खूप पूर्वी चलनातून रद्द झाली होती असे काही लोक सांगतात.ती अलीकडेच गेल्या काही वर्षांत पुन्हा जारी झालेली आहे. ५०० रु. च्या ही काही विवक्षित क्रमांकश्रेणींच्या नोटा चलनातून रद्द केल्या गेल्या होत्या. फारसा काही उपयोग झालेला दिसला नाही.

जुने मिपा चाळताना हा लेख सापडला. रामदेवबाबाबद्दल तात्यांनी लिहिलं आहे ते खरंच ठरत आहे. ५०० व १००० च्या नोटांबद्दल वाचून आता मनोरंजन होईल.
अवांतरः रामदेवबाबा निश्चलनीकरणाचे कसा श्रेय घ्यायला कडमडला नाही ?

५० फक्त's picture

7 Jun 2011 - 10:23 am | ५० फक्त

सरकारने जर रामदेवांची भ्रष्टाचार करणा-याचे हात तोडण्याची मागणी मान्य केली तर, क्रुत्रिम हातांचा धंदा जाम भारी चालेल, कुणी पार्टनर म्हणुन येणार असेल तर हा धंदा करावा असा एक विचार आहे.

गवि's picture

7 Jun 2011 - 10:29 am | गवि

त्यापेक्षा हात तोडण्याची शिक्षा एक्झेक्यूट करणार्‍या सरकारी डॉक्टर किंवा जल्लादाला चायपानी देऊन म्यानेज केल्यास मूळ हातच नाही का वाचणार?

हवे तर तोडल्याचे सर्टिफिकेट घेता येईल.

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Jun 2011 - 10:31 am | llपुण्याचे पेशवेll

अत्यंत ये**वा आणि फालतू लेख आहे.
मनुष्यप्राणी जसा अत्यंत स्खलनशील आहे तसा अत्यंत निर्धारी आणि निग्रही देखील आहे हे आजूबाजूला पाहीले तर सहज कळेल. असो.

VINODBANKHELE's picture

7 Jun 2011 - 10:58 am | VINODBANKHELE

वरिल प्रतिक्रियेशी प्रचंड सहमत...........

चिंतामणी's picture

9 Jun 2011 - 12:18 am | चिंतामणी

योगविद्या शिकवणारा रामबाबा गेल्या काही काळापासून भलताच अहंकारी होत चालला होता. शिवाय तो एक हलक्या कानाचा अन् हुऱळून जाणारा साधूही आहे
रामलीला मैदानावरील आंदोलनाच्या मंचावर ही ऋतंबरा कशाकरता आली होती?

अरे रामबाबा, मेल्या योगी ना तू? मग तू कसा काय इतका जबर अहंकारी? अण्णा हजारेंवर जळ जळ जळून तुझा नक्की काय फायदा होणार आहे? '

जमल्यास तुझ्या योगसामर्थ्याच्या बळावर मस्तपैकी एकसे एक स्त्री शिष्यांना पटव ( तूर्तास तसं काही नसावं हा माझा अंदाज! ) आणि मस्त मजा कर, असा आपला जाता जाता माझा तुला एक व्यक्तिगत सल्ला..!

ही वाक्ये दर्जा दाखतात.

गोगोल's picture

7 Jun 2011 - 10:50 am | गोगोल

मस्त लिहिलत.
१००% अ‍ॅग्री

काल लई वेळ रामदेव बाबा टिव्ही वर बघत होतो, बघता बघता तसाच झोपि गेलो.
हा प्रोब्लेम घेउन स्वप्नात मंग मि देवाकडे गेलो, आनं बोल्लो कि रे बाबा, १०० % प्रामानीक हुशार, भारताला पुढे घेउन जानारा असा एक तरी ह्या १२० कोटिंमध्ये जल्माला घाल.
देव बोल्ला, असा मनुक्श्य तय्यार करायला टाकला आहे. पन त्याला खुप वेळ लागेल. तोवर जे कोन थोडेफार परमानिक आनी हुश्शार आहेत त्यांचावरच भागावा.
.
काय करावं आता. देवच जर असा कामचुकारपना करु राहीला आहे, तर काय होइल देवच जाने.
.
.
बाकी रामदेव बाबाबद्दल जे काय चालले आहे.... चालू द्या.

आंसमा शख्स's picture

7 Jun 2011 - 12:12 pm | आंसमा शख्स

पब्लिसिटी स्टंट है सब, खुदा त्यांना चांगला रस्ता देओ.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Jun 2011 - 10:38 am | llपुण्याचे पेशवेll

खुदा त्यांना चांगला रस्ता देओ
खुदा कसला चांगला रस्ता देतो आहे? सगळीकडे खुदा हुवाच आहे खुदाला देखील आधी खुदा हुवा नसलेला चांगला रस्ता शोधावा लागेल.
;)

नितिन थत्ते's picture

7 Jun 2011 - 1:10 pm | नितिन थत्ते

.

नर्मदेतला गोटा's picture

7 Jun 2011 - 2:10 pm | नर्मदेतला गोटा

काहीतरीच लिहितो
वाद होतात
पण याचा वेळ बरा जातो

--
हा कपिल सिब्बल दिग्विजयचा मानूस दिसतो हाये

चिंतातुर जंतू's picture

7 Jun 2011 - 2:17 pm | चिंतातुर जंतू

त्याला आंदोलनाच्या ह्या हरबर्‍याच्या झाडावर कुणीतरी चढवला आणि तो सुसाट चढत सुटला.

आणि पोलीस आल्यावर बायकांचे कपडे घालून सुसाट पळतही सुटला, आणि हे म्हणे आंदोलक आणि सत्याग्रही! यापेक्षा राखी सावंत बरी. तीसुद्धा पब्लिसिटी स्टंट म्हणून तोंडाला येईल ते बोलते, पण किमान असला भोंदूपणा तरी करत नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Jun 2011 - 2:58 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह्वा ! आमची ती क्रांती दुसर्‍याचा तो भोंदूपणा. टिपीकल मेणबत्ती मनोवृत्ती दिसली या प्रतिसादातून. मेणबत्या हातात घेऊन रस्त्यावरून चालणारे ते खरे सत्याग्रही आणि सत्याग्रह करणारे बाबा मात्र भोंदू. वा रे बुद्धीवाद.

चिंतातुर जंतू's picture

7 Jun 2011 - 4:09 pm | चिंतातुर जंतू

नैतिक लढ्याला चेचायला पोलीस आले तर भुरट्या चोरासारखं पळून जायचं नसतं; अटक करून घ्यायची असते; त्यात डिग्निटी असते. हे कळायला उदाहरणार्थ फारशी अक्कल लागते असं वाटत नाही. त्यात बायकांचे कपडे वगैरे घातल्यामुळे बबन प्रभू - आत्माराम भेंड्यांचे फार्स पाहतो आहोत असं वाटलं.

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Jun 2011 - 4:51 pm | llपुण्याचे पेशवेll

म्हणजे वेशांतर करून पोलिसांच्या कचाट्यातून स्वतःची सुटका करून घेणारे क्रांतीकारक भुरट्या चोरासारखे पळून जात अथवा अनेक दिवस भूमिगत राहून काम करणारे अन्य देशभक्त भुरटे चोरांवतच होते असा माझ्या फारश्या नसलेल्या बुद्धीला बोधित होत आहे.

चिंतातुर जंतू's picture

7 Jun 2011 - 5:13 pm | चिंतातुर जंतू

अनेक दिवस भूमिगत राहून काम करणारे अन्य देशभक्त भुरटे चोरांवतच होते

भूमिगत माणूस आणि दिल्लीला रामलीला मैदानात हजारोंच्या उपस्थितीत २४*७ वृत्तवाहिन्यांच्या कव्हरेजखाली असणारा सार्वजनिक उपोषणकर्ता यांत काहीच फरक नाही?

एक शंका अशी:

रामदेव बाबांनी खरेच कधी असं म्हटलंय का की शुद्ध गांधीवादाने / गांधीतत्वाने ते सत्याग्रह करत किंवा करणार आहेत.

हम किसीको छेडेंगे नही..लेकिन कोई हमें छेडे तो हम उसे छोडेंगे नही.. असं त्यांना म्हणताना आप की अदालतमधे ऐकलं होतं. मग त्यांचे मार्ग वेगळे असू शकतील असं म्हणायला काय हरकत आहे.

मीडियाला स्वतःच्या आंदोलनावर रोखलेले ठेवणे यात काय गैर आहे? इतर राजकारणी नाही मिडीयात चमकोगिरी करत?

एकूण रामदेवांवर जे आरोप म्हणून केले जाताहेत त्यातले बरेच "आरोप" म्हणून का उल्लेखले जाताहेत कोण जाणे.

त्यांना खरोखर पोलीसांनी नग्नावस्थेत ठेवले तर मिळतील ती वस्त्रे नेसून त्यांनी लज्जारक्षण केले असेल तर त्यात कसला फार्स?

आणि अगदी असं समजू की त्यांनी मूळ चांगल्या उद्देशाने (किंवा स्वार्थी उद्देशाने पण आउटपुट चांगला निघण्याची शक्यता असलेल्या मोहीमेसाठी) चमकोगिरी, प्रसिद्धीलोलुपता, फार्स, गिमिक, हिडन अजेंडा, राजकारण आणि इतर काहीही केलं तर त्याला हरकत का?

सरळसरळ दुरित खेळ्या राजकारणी नेत्यांच्या चालू असतातच की. हा मनुष्य तरी उघडपणे काही भ्रष्टाचारविरोधी बोलतोय. स्वतःच्या ट्रस्टची संपत्ती किती हजार कोटी आहे ते जनतेसमोर बोलतोय. एवढ्यानेतरी त्याच्या उद्देशावर राळ उडवणे थांबवावे. अनलेस प्रोव्हन अदरवाईज..

धमाल मुलगा's picture

7 Jun 2011 - 6:50 pm | धमाल मुलगा

सहमती.
दुसर्‍या एका धाग्यात अगदी ह्याच्च अर्थाचं मत मांडलं होतं.
सायबा, तुम्चा न माझा मत बराब्बर जुळतां !

मालोजीराव's picture

7 Jun 2011 - 6:17 pm | मालोजीराव

स्त्री वेशात पळून गेलो हे मी शिवाजी महाराजांचं अनुकरण केलं - रामदेव ...
... मुर्खासारखी विधाने करणे सोडणार नाई वाटतंय हा बाबा

स्वानन्द's picture

7 Jun 2011 - 5:42 pm | स्वानन्द

पुपे आणि गविंशी सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2011 - 6:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमची ती क्रांती दुसर्‍याचा तो भोंदूपणा. टिपीकल मेणबत्ती मनोवृत्ती दिसली या प्रतिसादातून. मेणबत्या हातात घेऊन रस्त्यावरून चालणारे ते खरे सत्याग्रही आणि सत्याग्रह करणारे बाबा मात्र भोंदू. वा रे बुद्धीवाद.

पुपेशी सहमत....! बाकी, चालू द्या....!

-दिलीप बिरुटे

नर्मदेतला गोटा's picture

7 Jun 2011 - 2:21 pm | नर्मदेतला गोटा

त्या गर्दीत फुकाचे साधुसंत आणि यूपीतले बरेचसे रेमेडोके भय्येच अधिक दिसत होते हे आग्रहाने नमूद करावेसे वाटते.

--

इथे युपीचा काय संबंध ? आंदोलन सगल्या देशासाठी चाललेय
असे हे कूपमंडूक

जाऊदे
आपण टीवी बंद करावा जास्त पाहू नये

योगी९००'s picture

7 Jun 2011 - 2:38 pm | योगी९००

मस्त लेख...सर्वच मुद्दांशी सहमत.

रामदेव बाबा मला पहिल्या पासूनच लबाड वाटतो...आता तर खात्रीच पटली. केवळ राजकिय हेतू ठेवून त्याने हे केले असे वाटते..

>>अन्यथा पोलिस ..अर्थात, खरोखरच जर त्यांना मार पडला असेल तर ती सरकारची केव्हाही चूकच आहे..
http://www.tehelka.com/story_main49.asp?filename=Ws050611mar.asp
The injured Mr Sibal could not find
Revati Laul
New Delhi

अत्यंत कर्तबगार आणि निस्पृह पोलिस अधिकारी असलेल्या डॉ किरण बेदी याही अण्णांच्या पाठीशी आहेत. तसे या रामबाबाच्या मागे कुणी आहे का?
http://www.youtube.com/watch?v=A9oJMewaoMM ह्या घ्या किरण बेदी जंतर मंतर येथे :)

आता थोडा सावध पवित्रा घेतलाय असं दिसतं....या वृत्तावरून

बाबा रामदेवांना या दोघांचा पाठींबा 'सरसकट' नसून 'कायद्याच्या चौकटीत बसेल इतकाच' असेल असे दिसावे असा सूर दिसतो.

Hazare chose to distance their group from the Baba over his latest remarks - he said he is grooming an army of 11,000 men and women and they will be trained to fight back if the government tries to repeat what happened at his yoga camp over the weekend.

Ms Bedi tweeted, "No question of supporting which is unlawful and threat to security law and order...the powerful side must show wisdom and restraint. And not let it slip in the hands of opportunists." She added, "The establishment needs to deal with his outfit with wisdom and maturity before we create a serious law and law challenge for future."

भाजपातील काही नेते देखील संयम बाळगतील असं सुषमा स्वराज यांच्या या न-बोलक्या प्रतिक्रियेवरून वाटतं-

When asked about the Baba's call to arms, Mrs Swaraj had avoided comment.

उदयन's picture

7 Jun 2011 - 5:10 pm | उदयन

ज काल आपला भारत देश म्हणजे मुर्खांनी भरलेला बाजार झालेला आहे...जो तो उठतो आंदोलन करतो...सत्याग्रह करतो...कशासाठी...त्याचे फलीत काय...भविष्य काय.........कुणाला काहीच माहीती नाही....एखादा कायदा किवां धोरण ठरवण्या साठी त्याचा परिणाम काय होइल... भविष्यात काय घडेल...या धोरण राबवण्यात आपली यंत्रना सज्ज आहे का पुरेशी आहे का.. इत्यादी... माहीती चापचुन पाहतात........

मुळातच आपले सरकार ही निष्क्रिय आहे त्यामुळे इतरांना संधी मिळते........अण्णा हजारे,,अग्निवेश, राम देव बाबा. ..शांतीभुषण इत्यादींना जर काही खरच विधेयक काम करायची इच्छा असेल तर सर्वात आधी हे हुकुम सोडणे बंद करा...स्वता:ची इच्छा झाली आणि स्वत: चे म्हणने पुर्ण करण्या साठी सरकार ला वेठीस धरणे थांबवा...या देशाला एक घटना आहे..काही नियम आहेत... त्या नियमात राहुन काम करा...

जर कामच करायचे असेल तर रितसर निवडणुकीस उभे राहवा.......पक्ष काढा...... जसे या आंदोलना साठी लोक पैसे च्या पैसे देतात तर तुमच्या विधायक कामासाठी सुध्दा देतील...निवडुन या आणि पुढची ५ वर्षे जी सुधारणा करायची असेल ती करत बसा...पुर्ण देश आपल्या पाठीशी आहे...जर निवड्णुकीला उभे राहीलात तर समोरच्याचे डिपोझिट जप्त होइल...

पण विधायक मार्गाने न जाता तुम्ही स्वतःची टिमकी वाजवु बघतात...
नायक चित्रपटात एक छान वाक्य होते...परेश रावच्या तोंडी..अर्थ असा " सरकारला शिव्या देने सोपे असते...पण तिच कामे स्वतः ला करायला सांगितली की @#$ला शेपुट लाऊन पळुन जायचे..." आणि वर घरी जाउन पेपर वाचत बायको ला म्हणायचे की " डार्लिंग इस पोलिटिक्स ने देश को बेच खाया है..

सरकार चा विरोध नक्की करावा पण अशा घटनेला च आव्हान देण्याच्या पध्दती ने नव्हे तर...स्वता यंत्रणेचा एक भाग होउन...

सचीन ला कसा चुकिचा फटका मारतोस हे आपण टिव्ही वर अख्तरची गोलंदाजी बघुन सहज संगतो..प्रत्यक्श मैदानात उभे राहुन एक चेंडु तर अख्तर चा नाही तर आगरकर चा तरी खेळुन दाखवा.....

:)

Dhananjay Borgaonkar's picture

7 Jun 2011 - 8:38 pm | Dhananjay Borgaonkar

जो तो उठतो आंदोलन करतो...सत्याग्रह करतो...कशासाठी...त्याचे फलीत काय...भविष्य काय.........कुणाला काहीच माहीती नाही

रामदेव बाबा, अण्णा हजारे यांनी त्यांच्या सत्याग्रहाची कारणे आधिच स्पष्ट केलेली आहेत. आणि तो सत्याग्रह आपल्याच फायद्यासाठी आहे. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे तो नाहीसा (कमी) करण्यासाठी.काळा पैसा जो या राजकारणींनी परदेशातील बँकांमधे दडवुन ठेवला आहे तो परत आण्ण्यासाठी.
भविष्य काय कोणालाच माहित नसत. म्हणुन प्रयत्नच करायचे नाहीत का??

मुळातच आपले सरकार ही निष्क्रिय आहे त्यामुळे इतरांना संधी मिळते

म्हणुनच आंदोलन / सत्याग्रह चालला आहे.

अण्णा हजारे,,अग्निवेश, राम देव बाबा. ..शांतीभुषण इत्यादींना जर काही खरच विधेयक काम करायची इच्छा असेल तर सर्वात आधी हे हुकुम सोडणे बंद करा

हुकुम आणि मागण्या मधे गल्लत होते आहे तुमची.

स्वता:ची इच्छा झाली आणि स्वत: चे म्हणने पुर्ण करण्या साठी सरकार ला वेठीस धरणे थांबवा...या देशाला एक घटना आहे..काही नियम आहेत... त्या नियमात राहुन काम करा...

भ्रष्टाचारमुक्त भारत व्हावा. काळ्यापैशाचे साम्राज्य संपावे अशी फक्त आंदोलकांची नाही तरी तमाम भारतीयांची इच्छा आहे. शांतातापुर्ण सत्याग्रह करणे आंदोलन करणे हे घटनाबाह्य नाही. नियमात राहुनच सर्व चालत होते/ आहे.

जर कामच करायचे असेल तर रितसर निवडणुकीस उभे राहवा.......पक्ष काढा
सर्व स्वयंसेवी संस्थेचा पक्ष असतो का????

नायक चित्रपटात एक छान वाक्य होते...परेश रावच्या तोंडी..अर्थ असा " सरकारला शिव्या देने सोपे असते...पण तिच कामे स्वतः ला करायला सांगितली की @#$ला शेपुट लाऊन पळुन जायचे..." आणि वर घरी जाउन पेपर वाचत बायको ला म्हणायचे की " डार्लिंग इस पोलिटिक्स ने देश को बेच खाया है..

तुम्ही किती समाज विधायक कार्य केलीत?

विकास's picture

7 Jun 2011 - 5:16 pm | विकास

हा लेख पटला नाही.

  1. एक म्हणजे आपल्याला (त्यात मी देखील आलो आणि समर्थनार्थ आधी लिहीलेले देखील आहे) अण्णा हजारे जरी मोठे वाटत असतील तरी ते महाराष्ट्राबाहेर आत्ताच्या आंदोलनाआधी विशेष माहीत नव्हते हे अनेकांशी बोलताना जाणवायचे.
  2. भ्रष्टाचार हा असा मुद्दा आहे आणि तो आता इतका गंभिर झालेला आहे की त्या विरोधात कोणीही आंदोलन केले तरी ते समर्थनीयच आहे. अण्णा हजार्‍यांनी केले आणि आता अजूनही काही न करता सरकार परत त्यांना खेळवायला लागले आहे. त्यामुळे सतत सरकारच्याय/राजकारण्यांच्या डोक्यावर टांगती तलवार असणे हे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात रामदेवबाबांना पाठींबा न देताही मुद्याचे बोलणारे शबानाचे वक्तव्य मला आवडले: "I believe the issue of corruption has to be kept alive. And any public figure, who stands up against corruption should be welcomed."
  3. प्रत्येकाने आंदोलन कसे करावे आणि त्याची स्ट्रॅटेजी काय असावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तेथे साध्वी ऋतंभरा का हा प्रश्न अनाठायी आहे. त्या भारताच्या नागरीक आहेत. सोनीया गांधीपण तेथे आल्या असत्या तरी ते योग्यच होते, आक्षेपार्ह नव्हते. :-) तेथे फक्त हिंदूच नव्हते तर इतर धर्मिय देखील आहेत. तीच गोष्ट ते पळून गेले का छाती पुढे करून उभे राहीले या संदर्भात. त्यामुळे काही फरक पडत नाही. स्वतंत्र भारतात उगाच कोणी हुतात्मा होण्याची गरज नाही. आणि परिस्थिती अशीच होती की ते हुतात्मा झाले असते. (आता काँग्रेस सोनीया/मनमोहनसाठी असेच कपिल सिबलना हुतात्मा करणार आहेत असे दिसतेय...) जर तेथेच राहीले असतेत्यामुळे पोलीसांनी आणि सरकारने अनावश्यक कारवाई केली ह्याचे गांभिर्य कुठेही कमी होत नाही.
  4. रामदेवबाबांना भरपूर समर्थक आहेत आणि त्यांच्या बळावर त्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा परत प्रकाशात आणून मोठे काम केले आहे असे माझे मत आहे आणि त्यासाठी मी त्यांचा आभारीच आहे.
  5. बाकी त्यांचा हिडन अजेंडा आणि राजकीय अपरीपक्वता वगैरे मुद्यांसंदर्भात - उत्तर सिंपल आहे, शिकले नाहीत तर मार खातील. खाउंदेत. प्रत्येक नागरीकास उपोषण करण्याचा हक्क आहे, राजकारणात जाण्याचा हक्क आहे आणि ते जमले नाही की मार खाण्याचा देखील हक्क आहे... पण तसेच आत्ता वर्तमानात आहे असे समजून जेथे साप नाही तेथे भुई धोपटत दुसरीकडे झालेल्या सर्पदंशाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, तर भ्रष्टच आहे.
अजातशत्रु's picture

8 Jun 2011 - 4:23 pm | अजातशत्रु

Elite class सोडला तर सध्याची देशाची स्थिती/भ्रष्टाचार/ बजबपुरीने इथला प्रत्येक नागरीक पिचला आहे,
प्रत्येकाला इथल्या व्यवस्थेविषयी अत्यंतीक चीड आहे,
पण दुर्देवाने ती निर्माण करणारे त्याला हातभार लावणारेहि आपणच आहोत ना..

बाहेर असलेला,देशात असलेला काळा पैसा/ भ्रष्टाचार थांबावा, काळा पैसा सरकारी तिजोरीत जमा व्हावा
हे इथल्या प्रत्येक नागरिकांना वाटणे स्वाभाविक आहे मग ते फ्लॅट मधे राहणारे असो की झोपडीत राहणारे,
मग असे काहि घडत असले कि प्रत्येकजण त्यात आपला रोष प्रकट करतो,
याचाच फायदा संधीसाधू अन् स्वार्थी लोक घेतात,आपला राग/चीड याचा उपयोग ते त्यांच्या आंदोलनात Divert करुन आपली पोळी भाजून घेतात,
दुर्देवाने हे आजहि आपल्या जनतेला कळत नाहि,आणी कळले तरी वळत नाहि,
वर sumiit यांनी म्हणल्या प्रमाणे आपला भारत देश म्हणजे मुर्खांनी भरलेला बाजार झालेला आहे,
जो तो उठतो आंदोलन करतो,सत्याग्रह करतो....कशासाठी...त्याचे फलीत काय...भविष्य काय.........कुणाला काहीच माहीती नाही....एखादा कायदा किवां धोरण ठरवण्यासाठी त्याचा परिणाम काय होइल... भविष्यात काय घडेल...या धोरण राबवण्यात आपली यंत्रना सज्ज आहे का पुरेशी आहे का.. इत्यादी... माहीती चापचुन पाहतात....
जर कामच करायचे असेल तर रितसर निवडणुकीस उभे राहवा.......पक्ष काढा...... जसे या आंदोलना साठी लोक पैसे च्या पैसे देतात तर तुमच्या विधायक कामासाठी सुध्दा देतील...निवडुन या आणि पुढची ५ वर्षे जी सुधारणा करायची असेल ती करत बसा...पुर्ण देश आपल्या पाठीशी आहे...जर निवड्णुकीला उभे राहीलात तर समोरच्याचे डिपोझिट जप्त होइल...

या देशात लोकशाहि आहे, घटनेनुसार उपोषण/सत्याग्रह करणे हा श्रिमंतापासून गरिबापर्यंत सर्वांचा तो हक्क आहे, मग कुणी बाबा असो संन्यासी असो नाहितर शंकराचार्य,अण्णा असोत नाहितर रामदेव,
अगदि पंतप्रधानालाहि आपण जाब विचारु शकतो न पटलेल्या गोष्टिंचा निषेध करु शकतो,
त्यासाठी वेग वेगळे मार्ग आहेत,
पण स्वत:च्या स्वार्थासाठी स्वत:चे हट्ट पुर्ण करण्यासाठी आणी आपल्या गैरवाजवी मागण्या मान्य करुन घेण्यासाठी सरकारला वेठीस धरणे
कधिही चुकच आहे, मग ते सरकार कॉग्रेसचे असो वा एनडिए...
आपला हेतू स्वच्छ आणी प्रामाणिक असेल तर त्यांना पाठींबा द्यायला कुणाचीच हरकत नसावी,
पण या बाबाचा हेतू स्वच्छ न्हवताच हे कुणीहि सांगेल,
सरकारने मागण्या मान्य केले असे पत्र दिले होते दुसर्‍याच दिवशी आंदोलन संपले होते पण लाईम लाईट मधे राहण्यासाठी ह्या लबाडाने ते न स्विकारता विधेयक आणा म्हणून अडून बसला,
म्हणजे याच्या मागण्या पुढे किती वाढल्या असत्या?

इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे सरकारच्या काहि जबाबदार्‍या/मर्यादा असतात,
असे जर रोज उठून सगळे आंदोलन करू लागले तर मग काय होईल या देशाचं?
विषय जरी वेगळे असले तरी तिकडे जाट समाज/ ईकडे मराठा समाज उद्या आणखी कुणी वेगळे विषय घेऊन असे उपोषणे करून जर सरकारला आपल्या गैरवाजवी मागण्या मान्य करुन घेण्यासाठी वेठीस धरु लागले तर यातून वेगळ्याच समस्या निर्माण होतील,
उद्या उपोषण करुन वेग वेगळे प्रदेश मागणी होऊ लागली तर..?
याचा अर्थ आंदोलन करुच नये असा नाहि पण त्या बरोबर संसद, न्यायालय, शासन आणि प्रशासन यांचे अवमूल्यन होणार नाही आणि समतोल ढळणार नाही, याची दक्षता घेतली गेली पाहिजे.

मुळात अण्णानी केलेल्या उपोषण आंदोलनातूनच यानी आपल्या मागण्या पुर्ण करुन घ्यायला हव्या होत्या ते का झाले नाहि?

बरं विरोधी पक्षहि कुचकामी यांना जर खरेच हे करायचे आहे तर त्यानी स्वतः संसदेत एक वेगळे खाजगी विधेयक/बिल आणून त्यावर चर्चा करुन ते पास करुन घ्यावे उगा लोकांना भावनीक मुद्द्यांवर भडकवून घाणेरडे राजकारण कशाला खेळायचे ?
विरोधकांचे विचार कितीही टोकाचे असले तरी ते ऐकले जातात,
भारतातील संसदीय लोकशाही पद्धती भारतात पूर्णत: यशस्वी ठरली आहे असे मत विरोधी पक्षनेते पांडूरंग फुंडकर यांनी एकदा एका जाहिर कार्यक्रमात व्यक्त केले होते,
आज दुर्देवाने असा सक्षम विरोधी पक्ष हि अस्तित्वात नाहि,घोटाळेसुध्दा RTI कार्यकर्त्यांनी उघड केले आणी आयते कोलीत यांच्या हातात दिले पण फक्त कामकाजावर बहिष्कार टाकून पैशांचा चुराडा करणे एवढच काम यांनी केलं आहे,

काहि लोकांचे नवल वाटते त्यांना गुंड / ढोंगी / स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांनी काहि लोकोपयोगी काम केले आणी त्यात त्यांचा स्वार्थ जरी दिसत असला तरी काहि वाटत नाहि हे त्यांना समर्थनच देनार,
(सत्यसाई बाबा असो नाहितर रामदेव बाबा सगळे साले ढोंगीच)
उद्या दाऊद/ राजन/लादेन (आता मेला तो) यांनी सुध्दा काहि लोकोपयोगी काम केले लोकांसाठी हॉस्पिटल्स काढली की हे त्यांनाहि साष्टांग घालतील वर त्यांचा हेतू चांगला आहे ते परोपकारी आहेत वगैरे वगैरे बोलत बसतील,
यामुळेच राजकारणात अशा गुंड / ढोंगी / स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांची संख्या वाढली आहे आणी मग व्यवस्था भ्रष्ट आहे म्हणून नावेहि ठेवायची अन् गळेहि काढायचे...
दिवसेंदिवस ही परिस्थिती अधिकच चिघळत जाणार आहे. त्यामुळे आहे ती परीस्थिती सुधारु शकणार नाहि,यंत्रणाहि कार्यक्षम होऊ शकणार नाही,

बाबाने आता भक्तांना शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येनार आहे असे जाहिर केले आहे हे सगळे तो सुड बुध्दिने करत आहे हे वेगळे सांगायला नको,
पुढील वेळी दिल्लीच्या रामलीला मैदानावर लढाई हरावी लागू नये यासाठी ११ हजार पुरुष व महिलांची सेना रामदेव ब्रिगेड तयार करण्यात येणार आहे असे त्याने पत्रकार परिषदेत जाहिर केले आहे,
यातून काय बोध घ्यावा?
हा लोकांना शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देउन कसला सत्याग्रह करणार आहे की गांधीगिरी?
बाबा सरळ सरळ सरकार विरुध्द युध्दाची भाषा बोलत आहे,आणी हे सरकार हा देश चालवत आहे
(सध्या तरी)
म्हणजे मग देशा विरुध्दच हे सगळ चालु आहे असे म्हनावे काय?
एकुणच बाबा दिसतो तितका नाहि तर त्याहि पेक्षा धुर्त आणी घातक आहे,

पण मला वाटतेय हि विनाश काले विपरीत बुध्दि आहे दुसरे काय?
कालांतराने यावर बंदि आली तर आश्चर्य वाटायला नको..
आता पुढे पाहू काय काय प्रशिक्षण देणारे ते पाणबुड्या वगैरे....

अवांतरः या बाबाने सोनिया गांधीना विदेशी मुद्द्यावरुन टार्गेट केलेय,
पण हास्यास्पद गोष्ट अशी की या बाबाचा राईटहॅण्ड किंवा असीस्टंट बाळकृष्ण हा चक्क नेपाळी म्हणजेच अभारतीय निघाला आहे,
त्याने बोगस कागदपत्रे देऊन पासपोर्टही बनवला आणी तो विदेश वार्‍याहि करुन आलाय..बाबाला नेपाळि चालतोय मग ईटली का नको?
महत्वाचे राहिलेच या बाळकृष्ण कडे एक पिस्तुल अन् एक रायफल विथ लाईसेंस आहे,
या गोष्टि सहजा सहजी सामान्य माणसांना मिळत नाहित
आता अध्यात्मीक / योगगुरु यांना या गोष्टि कशाला हे एक गुढच आहे बुवा
भयंकर आहे सगळं...

अती अवांतरः पंतप्रधानहि नक्की काय करतात हे हि एक गुढच आहे,याना रिमोट कंट्रोल शिवाय स्वतःचे निर्णय घेता येत नाहित..
आणी त्यात तुम्हाला वाटतोय तितका मी दोषी नाहि, असे म्हणून स्वतःचा थोडा का होइना दोष मान्य करणार्‍या पंतप्रधानांना तिथे राहण्याचा नैतीक अधिकार आहे काय?

राही's picture

8 Jun 2011 - 5:06 pm | राही

सहमत आणि जोरदार अनुमोदन.

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jun 2011 - 6:17 pm | परिकथेतील राजकुमार

अगा या या या !

अजातशत्रु अहो किती चोर्‍या करायच्या लोकांच्या शब्दांच्या ? स्वतःचे निदान दोन शब्द तरी लिहा की राव. किती दिवस लोकाच्या बुद्धीमत्तेवर तुम्ही मिशांना पिळ भरणार ? थोडे कठोर शब्द वापरतोय त्याबद्दल क्षमस्व. पण मला लेखनचौर्याचा अतिशय संताप आहे. आणि तुम्ही तो वारंवार करता ह्याचे दु:ख आहे.

तुमचा प्रतिसाद वाचताना

१) याचा अर्थ आंदोलन करुच नये असा नाहि पण त्या बरोबर संसद, न्यायालय, शासन आणि प्रशासन यांचे अवमूल्यन होणार नाही आणि समतोल ढळणार नाही, याची दक्षता घेतली गेली पाहिजे.

आणि

२) भारतातील संसदीय लोकशाही पद्धती भारतात पूर्णत: यशस्वी ठरली आहे असे मत विरोधी पक्षनेते पांडूरंग फुंडकर यांनी एकदा एका जाहिर कार्यक्रमात व्यक्त केले होते,

हि वाक्ये राहून राहून कुठेतरी वाचली आहेत असे वाटत होते. थोडे कष्ट घेतल्यावर तुमच्या ह्या महान प्रतिसादाची दोन उगमस्थाने सापडली. (आता कृपया माझ्या विचारांन योग्य शब्द सापडत नव्हते ते तिथे मिळाले वैग्रे कारण प्लिज देउ नका.)

थोड्या वेळात जर माझे काम संपले तर तुमच्या प्रतिक्रियेची उरलेली उगमस्थाने पण हजर करिनच :) तोवर हे घ्या :-

१) http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7953652.cms

२) http://marathwadaneta.com/MarathwadaNeta/20101209/5637751116095387937.htm

१) याचा अर्थ आंदोलन करुच नये असा नाहि पण त्या बरोबर संसद, न्यायालय, शासन आणि प्रशासन यांचे अवमूल्यन होणार नाही आणि समतोल ढळणार नाही, याची दक्षता घेतली गेली पाहिजे.

आणि

२) भारतातील संसदीय लोकशाही पद्धती भारतात पूर्णत: यशस्वी ठरली आहे असे मत विरोधी पक्षनेते पांडूरंग फुंडकर यांनी एकदा एका जाहिर कार्यक्रमात व्यक्त केले होते,

माझ्या हातुन घडलेल्या चुकांना मी कधीहि नाकबूल करत नाहि,
हे दोन्ही विधाने पेपरातलीच आहेत त्याने काय फरक पडतो?
काय, पेपरा मधून कुणी इथे काहि देत नाहि?
आपल्याला ज्ञात असणार्‍या माध्यमातून मिळालेली माहिती देण्यास बंदी आहे काय?
आता म्हणाल उल्लेख करा... मग २ ओळी साठी वेगळी लिंक द्यायची?
तशी गरज वाटली न्हवती बाकी ज्याला जे वाचायचे ते वाचतील बापडे,
आमचं काम माहिती द्यायच आहे काड्या घालणे नाहि..:)

अवांतरः आमच्या योग्यते नुसार आम्हाला जमतात तेवढी २ शब्द लिहीतो आम्ही..
उगा याने इथे प्रतिक्रिया दिली नाही फलान्याने इथे लिहीले नाही,
ते लोक प्रतिक्रिया द्यायला आले नाहि....
असे लोकांच्या प्रतिसादां कडे दॉले लावून बसत नाहि,
आणी प्रतिसाद द्यायला भागही पाडत नाहि

जमल्यास वाचकांसाठी उर्वरीत प्रतिक्रियेची उरलेली उगमस्थाने हि जाहिर करावी,
म्हणजे माझे किती अन् चौर्य किती ते ही कळेल..:)

जाता जाता: जास्तच संताप होत असेल तर ईनो घ्या आराम मिळाला तर मिलाला...

धमाल मुलगा's picture

8 Jun 2011 - 7:07 pm | धमाल मुलगा

म्हणजे?
इतकं बचाबचा किलोकिलोनं टाकलेले प्रतिसाद सगळे उचलाउचलीचेच का काय म्हणायचं?

भले भले....

डायरी आणा रे गिफ्ट रॅप करुन.

अजातशत्रु's picture

8 Jun 2011 - 7:36 pm | अजातशत्रु

इतकं बचाबचा किलोकिलोनं टाकलेले प्रतिसाद सगळे उचलाउचलीचेच का काय म्हणायचं?

माणसं कामाला लावली आहेत....
शोध मोहिम संपली की ते सगळ उलगडेल ह..तोवर दम धरा...

धमाल मुलगा's picture

8 Jun 2011 - 7:53 pm | धमाल मुलगा

खुलाशाबद्दल धन्यवाद. :)
मंडळ जोरात आभारी आहे.

अजातशत्रु's picture

11 Jun 2011 - 4:10 pm | अजातशत्रु

असे खुलासे आम्हाला वरचे वर द्यावेच लागतात..
आमच्या हितचिंतकांसाठी.....
कारण ते बिचारे ,
आमचे लेखन अगदि डोळ्यात तेल का तेलात डोळे असे घालून लक्ष ठेवून असतात...
ते रात्री सुध्दा झोपत नसावेत त्यांचे २४ x ७ शोध कार्य चालू असते...
त्यामुळे निट झोप मिळत नसल्या मुळे दिवसा उजेडी ते झोपेतच साप साप म्हणून दोरिलाच धोपटून स्वतःच्या बालिश बालबुध्दिचे उथळपणे प्रदर्शन करतात..
अजातशत्रु अहो किती चोर्‍या करायच्या लोकांच्या शब्दांच्या ? स्वतःचे निदान दोन शब्द तरी लिहा की राव. किती दिवस लोकाच्या बुद्धीमत्तेवर तुम्ही मिशांना पिळ भरणार ?

आता खालील वाक्य पहा..

भारतातील संसदीय लोकशाही पद्धती भारतात पूर्णत: यशस्वी ठरली आहे असे मत विरोधी पक्षनेते पांडूरंग फुंडकर यांनी एकदा एका जाहिर कार्यक्रमात व्यक्त केले होते,
इतकी साधी सोपी वाक्य रचना असताना
यात इतका स्पष्ट उल्लेख आहे की,असे मत विरोधी पक्षनेते पांडूरंग फुंडकर यांनी एकदा एका जाहिर कार्यक्रमात व्यक्त केले होते,
मग हि चोरी ठरते काय?
म्हणजे यापुढे कुणाचेहि मत इथे उल्लेख करुनहि प्रकाशीत करणे हि चोरी ठरावी काय?
असे असेल तर मग आनंदच आहे :)

बाकी त्यांच्या या पोरकटपणावर कंपुबाज लोकांना फार काळ हसता आले नाहि याचे वाईट वाटतेय..

अवांतर :उर्वरीत प्रतिक्रियेची उरलेली उगमस्थाने शोधकार्य जोरात चालू आहे वाटते..
त्यामुळे काड्याघाल उद्योगाला जोरात शुभेच्छा...

योगप्रभू's picture

7 Jun 2011 - 5:22 pm | योगप्रभू

अण्णा मराठी आणि रामदेवबाबा भय्या!
हम्म्म! स्वतंत्र आंदोलनाचा विषय आहे खरा.
राजाबाबूंना सांगा रे कुणीतरी.... :)
(सर्व भक्तांनो ह. घ्या.)

पुपेंशी अतिशय सहमत, कुणीतरी उभं राहतंय हे महत्वाचं. त्याच्या मागं उभं राहता येत नसेल तर किमान समोर आडवं तरी जावु नये. आणि ५०० -१००० च्या नोटा बंद करणं हा उपाय खरोखर जबरा आहे, पुर्ण नाही तर थोडा तरी आळा बसेलच या मुळं भ्रष्टाचाराला. पण असं झालं तर लाच देण्यासाठी वेगळी कार्डे बँका इश्यु करतील अशी शंका आहे.

आत्मशून्य's picture

7 Jun 2011 - 7:30 pm | आत्मशून्य

.

अजातशत्रु's picture

7 Jun 2011 - 8:24 pm | अजातशत्रु

हो हिच उपाधी योग्य आहे या माणसाला..

मुळात हा रामदेव बाबा कोण आहे?
अल्प परीचय..
जन्म :हरीयाणा मधील सय्यदपुर.१९६५
शिक्षण - ८ वी.
व्यवसायः व्यावसायीक योगगुरु
प्रभाव : रामप्रसाद बिस्मिल / सुभाषचंद्र बोस
सुरुवातीला हरिद्वार येथे योगशिक्षण घेतले,पुढे २००३ पासून योग उपचार शिबिर सुरु केले आणी ते मग पुढे वाढतच गेले देशव्यापी झाले,हि जमेची बाजू यातूनच ते प्रसिध्दिच्या झोतात आले,
भ्रष्टाचारा बद्दल तर रामदेवबाबा प्रसिध्दिच्या झोतात आल्या पासूनच बोलत होता पुढे २००८ पासून रस्त्यावर उतरण्याची भाषा करायला लागला,पण धाडस होत न्हवते मुहुर्त मिळत न्हवता,
अशातच अण्णा हजारेंनी त्या विरोधात आंदोलन केले,आणी ते यशस्वी झाले,
आंदोलनाचे फलीत लोकपाल बिल या नावाने अमलांत येईल, यात अण्णांना देशभरातून पाठींबा मिळाला
हे पाहून प्रसिध्दिच्या झोतात असणार्‍या रामदेव बाबाला हि असच काहि करावे असे वाटल्यास नवल ते काय?
वास्तवीक बाबाने त्या आंदोलनातच सक्रिय सहभाग घ्यायला हवा होता,तसे न करता त्याने अण्णाना बाहेरुनच पाठींबा दिला.तसेच आंदोलन यशस्वी झाल्यावर समिती मध्ये भुषण पिता-पुत्र का?
डॉ.किरण बेदिंना का घेतले नाहि? असे आक्षेप घेऊन त्यातली हवा काढण्याचा प्रयत्न केला,
इथूनच अण्णा आणी रामदेव या द्वंयी मध्ये मतभेद निर्माण झाले,

मग आपली वेगळी चुल मांडून त्याने स्वत:चे वेगळे महत्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला,
आणी वेगळे आंदोलन केले..
तसे बाबा ने आपला स्वाभिमान पक्ष स्थापन करुन सक्रिय राजकारणात उतरण्याचे सुतोवाच अगोदरच केले होते,
आंदोलनाद्वारे किती जनाधार मिळतो?त्याचीच हि चाचपणी,
या बाबाला व्हायचेय पंतप्रधान,
कसे ते पहा बाबाच्या मागण्या-
१.भारताचा पंतप्रधान हे जनतेने निवडून दिलेली व्यक्ती म्हणजे नगरपालीका निवडणूका होतात तसे निवडून यावा मग बाबा अगोदरच फेमस व्यक्ती कोण अडवणार?

२.लोकपाल बिलातून पंतप्रधान पद/ सर्वोच्च न्यायालय वगळण्यात यावे,
यावरुन तरी असच वाटतेय..कि या बाबाला पंतप्रधान व्हायचेय,

आता आंदोलना कडे पहा खर्च किती केलाय,
सर्वांनीच हे आंदोलन पंचतारांकीत आंदोलन आहे अशी रास्त टिका केली होती.
२.५ लाख स्क्वे.फि.चे वाटर प्रुफटेन्ट
मैदान भाडे दिल्ली महानगरपालिका रु ३.१० लाख
९०० -प्रसाधनगृह अंदाजे रु २ करोड
५०००-पंखे +
६००-कुलर अंदाजे रु १.७५ करोड
१०-एल.सी.डी.स्क्रिन/साऊंड (भक्तांनी बाबाला बघण्यासाठी) अंदाजे रु १.५ करोड
५०० आरओ प्लांट पिण्याच्या पाण्यासाठी अंदाजे रु ८ करोड
१०००-स्वयंसेवक,केअरटेकर
जेवण बनविण्यासाठी खास खानसामे काशी/मथुरा वरुन
हा ढोबळ खर्च आहे काहि आकडे हे कमी जास्त होऊ शकतात.
(माहिती दै.भास्कर/ आयबीएन लोकमत/ स्टारमाझा)
हे आहे काळा पैसा आणन्या साठीचे पांढरे पैसेवाया घालवणे उपोषण,
इतका खर्च सबंध भारतात कुणीच कुठल्या आंदोलनासाठी केला नसेल

अचानक असे काय घडले की एका सायकलवर फिरणारा बाबा एकदम चार्टड प्लेन मध्ये उडू लागला?
असे म्हणतात कि एके काळी ती सायकल पंक्चर झाली तर ती दुरुस्त करायला बाबा कडे पैसे नसायचे आणी तोच बाबा पहा कसा गगन भरारी मारतोय..
त्याच्यावर असाहि एक आरोप आहे(आता त्याने कॉग्रेसशी पंगा घेतल्यामुळे ते लोक हा आरोप सिध्दहि करतील अशि शक्यता आहे) की ज्या हरिद्वार येथील आश्रमात त्याने योगशिक्षण घेतले ते त्याचे गुरु श्री.शंकरदेव यांनाच त्याने गायब केले, हे दोघे एकाच खोलीत रहात होते एक दिवस अचानक ते लुप्त झाले ते आजतागायत कुणालहि सापडले नाहित,त्यांच्या बरोबर नक्की काय झाले हे आजहि एक गुढ आहे,(बहुतेक ते सदेह वैकुंठाला गेले असावेत काय?)
असो
नेहमी टिव्ही वर प्रत्येक मुलाखातीत हा बाबा स्वतःछाती ठोकून सांगत असे की या देशासाठी माझे प्राण गेले तरी मी ते हसत हसत देईन, भ्रष्टाचारा विरोधात लढताना मला मरण आले तरी बेहत्तर.
अशी वाक्ये नेहमीच आपल्या भोळ्या भक्तांकडून टाळ्या मिळवून देतात
हि याची मुक्ता फळे आहेत हा तोच बाबा आहे जो कालच्या आंदोलनात पोलिसांच्या फक्त लाठ्या आणी अश्रु धुराला घाबरुन पाय लावून पळून गेला?
अश्रु धुरापासून वाचण्यासाठी हा एका भिंती मागे २ तास लपला-इती बाबा,
आपला स्वतःचा जिव वाचविण्यासाठी त्याने चक्क एका महिलेचा ड्रेस घातला..
आणी महिलांच्याच घोळक्यातून निसटायचा अयशस्वी प्रयत्न करु पहात होता..
धिक्कार आहे अशा पळपुट्या बाबाचा स्वतःला क्रांतीकारी देशासाठी लढणारा संत असे म्हणवून घेणारा
बाबा भोळ्या भाबड्या लोकांच्या भावना भडकवून त्यांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करत होता,
आणी जेव्हा बलिदानाची वेळ आली तेव्हा हा महाभाग त्या अबला महिला/ लहान मुलांना तिथेच लाठ्या खायला सोडून स्वतः स्टेज वरून उडी मारुन उडन छू झाला,
तिथून पळून जाताना त्याने त्याच्यावर भरोसा ठेऊन आपल्या लहान मुलाबाळांना घेऊन आलेल्या महिला/ वयोवृध्द यांचा जरातरी विचार केला काय?
जर झालेल्या धावपळीत कुणी दगावले असते तर त्याची जबाबदारी कुणाची सरकारची?
का ती गर्दी जमविणार्‍या बाबाची?
हसायला तर तेव्हा आले जेव्हा हा बाबाच वरील घटनाक्रम स्वतःच मिडीयाला रडत रडत सांगत होता
वारेवा भगोडे बाबा तुझ्या सारखे जर या देशात क्रांतीकारी असते तर या देशाला स्वातंत्र्य कधि मिळालं असतं का? त्यांच्या बलिदानातून हा देश आज उभा आहे,
त्यांच नाव घ्यायची पण नैतीकता नाहि या बाबा मधे,
यावरुन काहि प्रश्न विचारता येउ शकतात
इतकेच देश प्रेम आहे तर जसे अण्णा हजारे जाहिर करतात तसे यांनी हॉटेल मधील गुप्त बैठकीत काय झाले ते देशाला का सांगीतले नाहि?
अण्णा नेहमी चर्चा/ कामकाज मिडीया समोर चालावे असा आग्रह धरतात बाबा
नेमका उल्टा सर्व चर्चा/ कामकाज गुप्तपणे आणी स्वतः एकटाच का?
बाल क्रुष्णला कुठल्या मोहिमेवर पाठवले आहे?
यानेच सांगीतलेय कि त्याला एका गुप्त मोहिमेवर पाठवले आहे,म्हणजे नक्कि काय गौडबंगाल आहे?
५००० माणसे बेपत्ता हे याला कस काय कळलं?
एकदा पळून गेल्यावर मागे माणसे मरतात का जगतात याच्याशी काय संबंध?
आंदोलन जर शांततेत चालू होते तर मग आंदोलनकर्ते दगड घेऊन का बसले होते?
पोलिसांवर दगडफेकहि झाली आहे,

हे पुर्व नियोजीत असावे असेच वाटतेय..म्हणजे पोलिस आले की दगडफेक करून अफरा-तफरी घडवून आणायची आणी मग दंगल..त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला असणे शक्य आहे,
त्यात आर एस एस/भाजपवालेही होतेच त्यांनी हे आंदोलन हायजाक करण्याचा प्रयत्नहि केला होता
होम-हवन करुन/ अगदि मुंबईलाहि इथे गरिबांना तेल मिळत नाहि आणी खुशाल त्यात साजुक तुप-लोणी भस्म करत होते..
त्यात ऋतंबराला बोलायला देऊन बाबानेहि त्यांना तसे सहकार्य केलेच,
यामुळे खरेतर अण्णा आणी त्यांचे साथीदार चिडले होते त्यामुळे या दोघांमध्ये निदान ७ वाजताच्या लेटेस्ट न्युज पर्यन्त तरि ते बेबनाव व टिका चालू होती पण सरकारने जी कारवायी केली त्यामुळे अण्णांना पुन्हा नाईलाजाने बाबाला पाठींबा द्यावा लागला,नाहितर चित्र थोडे वेगळे असते.

आता कॉंग्रेस सरकारने केलेली कारवायीहि अति उत्साहाने आणी कोणताहि विचार न करता केलेली आहे, इतक्या अपरात्री एवढ्या मोठ्या जन समुदायाला तिथून हाकलवून लावणे खुपच वाईट अन् अयोग्य आहे निषेधार्हच आहे.त्याची फळे कदाचीत त्यांना भोगावी लागतील,

अवांतरः भ्रष्टाचाराविरुद्ध केंद्र सरकारविरोधात सुरू असणाऱ्या रामदेवबाबांच्या आंदोलनावर सरकारने केलेली कारवाई योग्य असल्याचे मत पुरी पीठाचे शंकराचार्य अधोक्षजानंद देव यांनी व्यक्त केले आहे. देव म्हणाले, ""भगव्या वस्त्रांचा वापर रामदेवबाबांनी गैरमार्गासाठी करून घेतला. रामलीला मैदानावर घडलेल्या प्रकारास रामदेवबाबाच जबाबदार आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी माफी मागावी.'' योगविद्येचा वापर रामदेवबाबांनी व्यावसायिक कारणांसाठी केल्याचा आरोपही शंकराचार्य यांनी केला.
[http://72.78.249.107/esakal/20110606/4694246564413535153.htm ]

विकास's picture

7 Jun 2011 - 10:24 pm | विकास

बाबा रामदेवांच्या बाजूने अथवा विरोधात लिहीण्याचा प्रश्न नाही आणि उद्देशही नाही, मात्र त्यांचे शिक्षण कमी असण्याबाबत आधी देखील प्रसिद्धी माध्यमात लिहून आलेले आणि आत्ता वर पाहीले आहे. म्हणून लिहीत आहे.

त्यांचे शिक्षण आठवी पर्यंत झाले म्हणून त्यांची नकळत नालस्ती करणारे अण्णा हजार्‍यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंतच झाले आहे हे सांगतात का?

का असे एकाचे हसे करत दुसर्‍याचे लपवणे हा देखील भ्रष्टाचार? बरं यात हसे करण्यासारखे काय आहे? ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर विद्यापिठातून शिकले नाहीत का शिवाजी शिवाजी विद्यापिठातून... ते झाले जुने. पण तुम्ही आम्ही वापरत असलेले मायक्रोसॉफ्ट विंडोजवाला गेट्स अथवा फेसबुक वाला झकरमन पण हार्वर्ड ड्रॉप आउट आहेत तेच अ‍ॅपलवाल्या स्टीव्ह जॉबबद्दल...

बाकी नंतर...

रणजित चितळे's picture

8 Jun 2011 - 10:34 am | रणजित चितळे

शिक्षण फक्त शाळेत जाऊन, कॉलेजात पाट्या टाकल्याने होते असे नाही.

लता मंगेशकर - चवथी पास आहेत.
सोनिया गांधी किती शिकलेत (इंग्रजी येते म्हणजे शिकलेले असे गृहीत धरले म्हणजे बोलणेच संपले) त्या बद्दल प्रश्न आहे.
राहूल गांधी किती शिकला त्या बद्दल प्रश्न आहे.

शिक्षणापेक्षा दृष्टीकोन काय आहे. दूरगामी, उत्तुंग विचार, दूरदृष्टी व व्हीजन ह्याचे निकष लावले तर बरे होईल.

नितिन थत्ते's picture

8 Jun 2011 - 10:51 am | नितिन थत्ते

>>शिक्षण फक्त शाळेत जाऊन, कॉलेजात पाट्या टाकल्याने होते असे नाही.

सहमत आहे. तसेच मंत्री वगैरेंचे शिक्षण किती आहे याचीही उठाठेव करू नये असे वाटते*.

*हे श्री. चितळे यांच्यासाठी नाही पण बर्‍याच वेळा आपले राज्यकर्ते किती शिकलेले आहेत / असावेत याची "सुशिक्षितांमध्ये" चर्चा चालते त्यासाठी आहे.

कुंदन's picture

8 Jun 2011 - 10:56 am | कुंदन

चाचा , तुम्ही इतके शिकलेले नसता तर तुम्हालाही एक खाते देवविले असते प्रा डॉ ना सांगुन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jun 2011 - 11:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणा-याचे कुठे शिक्षण तपासू लागले राव. भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा अधिक धारदार केला पाहिजे. बाकी, चालू द्या.

-दिलीप बिरुटे

विकास's picture

8 Jun 2011 - 4:31 pm | विकास

तसेच मंत्री वगैरेंचे शिक्षण किती आहे याचीही उठाठेव करू नये असे वाटते*.

मला माहीत आहे तुम्ही "वगैरे" हा शब्द घातला आहे :-)... तरी देखील, कुणाच्याच शिक्षणाची उठाठेव करू नये असे म्हणले तर जास्त योग्य ठरेल.

अजातशत्रु's picture

8 Jun 2011 - 11:40 am | अजातशत्रु

सोनीया गांधी बद्दल माहिती नाहि,
राहूल गांधी यांनी केंब्रीज विद्यापिठातून एम.फिल केले आहे,

राहिला मुद्दा शिक्षणाचा तर कुणाच्याहि शिक्षणावरुन कुणाची योग्यता ठरत नसते*

रामदेव बाबाचा आलेला शिक्षण विषयक उल्लेख हा त्या अल्पपरिचयाचा भाग होता ,
असे कृत्य जर अण्णा हजारें कडून घडले असते तर त्यांच्या अल्प परिचयातहि तो मुद्दा आलाच असता आणी दिलेली उपाधी त्यांनाहि मिळाली असती निदान आमच्या कडून तरी.

विकास's picture

8 Jun 2011 - 4:35 pm | विकास

रामदेव बाबाचा आलेला शिक्षण विषयक उल्लेख हा त्या अल्पपरिचयाचा भाग होता ,

शक्य आहे आणि मी तुमच्यावर अविश्वास दाखवत नाही अथवा आरोपही करू इच्छित नाही. मात्र त्यांच्याबद्दल शिक्षणावरून हेडलाईन देऊन अत्यंत सहजतेने जनतेच्या मनात भरवण्याचे उद्योग आधी माध्यमात पाहीले होते, ते लक्षात असल्याने हा मुद्दा स्पष्ट करणे गरजेचे वाटले...

अवांतरः
राहूल गांधी यांनी केंब्रीज विद्यापिठातून एम.फिल केले आहे,

बरोबर. त्याआधी त्यांनी देखील (गेट्स प्रमाणे) हार्वर्ड सोडले होते. कारण होते ते सुरक्षा आणि ते फ्लोरीडात होते... तेथे त्यांचे शिक्षण हे सुरक्षेच्याकारणासाठी "राहुल विंचि" नावाने झाले होते.

धमाल मुलगा's picture

8 Jun 2011 - 5:25 pm | धमाल मुलगा

साहेब,
तुम्ही ब्लॉग लिहिता का हो?

अंगाशी आता गाडी रूळावर आली.

तिमा's picture

7 Jun 2011 - 8:51 pm | तिमा

एक बाबासाठी मिपावरची किती डोकी खपली! लई भारी!!!

अनेक भोंदू लोक पदोपदी समाजात आपल्याला दिसतात. लोकांना खुल्लमखुल्ला गंडवतात. आपण त्यांचे काय करतो?

रामदेवबाबांमुळे अथवा कोणामुळेही सरकारवर भ्रष्टाचाराबाबत दबाव येणार असेल तर हरकत काय आहे?

रामदेवबाबांवर टिका करणार्‍यांपैकी कुणी तिथे असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे जे आपल्याला दाखवण्यात आलं त्यावरून किती बोलायचं हा सुद्धा प्रश्नच आहे.

तात्याच्या आयुष्यातला पहीला बिनडोक लेख वाचु आता पटले की भारताचे काहीच होवु शकत नाही. रामदेव बाबाच्या बद्दल टीक करणार्या लोकां करीता............स्वत: काही करनार नाही...आणी दुसरा काही करत असेल तर त्याच्या *डीत बोट टाकतील.

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jun 2011 - 11:19 am | परिकथेतील राजकुमार

साला बाकी काय आसो नासो पण आमच्या तात्यानी चार ओ़ळी खरडल्या रे खरडल्या की अनेक पिशाच्चे थडग्यातुन बाहेर येतात आणि प्रतिक्रिया देउन जातात ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Jun 2011 - 10:57 pm | llपुण्याचे पेशवेll

पर्‍या मेल्या,
मला पिशाच्च म्हणतोस होय. दिली ना तुला ओवरी कर की निवांतपणे पुनर्लेखन.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Jun 2011 - 11:04 am | परिकथेतील राजकुमार


पुप्या मेल्या तु जिवंतच असतोस रे. मी महिनोन महिने थडग्यात पडलेल्या आणि तात्याचा किंवा खास लोकांचा लेख आल्यावर जाग्या होणार्‍या पिशच्चांविषयी बोलत होतो.

बाकी ते ओसरी दिली म्हणजे? च्यायला वाडा आमच्याच राजाचा पैशानी बांधलेला आणि आम्हालाच भिक दिल्यागत करतो होय रे ? थांब आता एक सशस्त्र ब्रिगेडच उभी करतो मी.

बाबा परादेव

महेश_कुलकर्णी's picture

8 Jun 2011 - 11:20 am | महेश_कुलकर्णी

अतिशय खेद्जनक लिखाण.
-१०००

हुप्प्या's picture

8 Jun 2011 - 11:45 am | हुप्प्या

शिक्षणाच्या बाबतीत अण्णा हजारे, लता मंगेशकर आणि कुण्या अडाणी गणंग मंत्र्याची तुलना करायचा अभद्रपणा करु नये.

लता मंगेशकरांचे कर्तृत्व आकाशाएवढे आहे. त्याबद्दल काहिही लिहायची गरज नाही.
अण्णा हजारेंचे राळेगणशिंदीतले काम लखलखीतपणे समोर उभे आहे. नि:स्वार्थीपणाने, जिद्दीने, नेटाने त्यांनी काम केले आहे हे उघड दिसते आहे.

कुण्या गणंग मंत्र्याची योग्यता तो केवळ अण्णा वा दीदींप्रमाणे अर्धशिक्षित आहे म्हणून त्यांच्या बरोबरीची होत नाही.

अजून काही मुद्दे
शिक्षणमंत्र्याने अंगूठाछाप असून चालेल का?
आजच्या काळात आधुनिक संगणकीकृत शस्त्रास्त्रे असतात. ती विकत घ्यायची सत्ता असणार्‍या संरक्षणमंत्र्याला अर्धशिक्षित असून कसे चालेल? तीच गोष्ट अर्थमंत्री वगैरेचीही.

अन्य कर्तृत्व असेल शिक्षणाकडे दुर्लक्ष करता येईल पण तसे काही नसेल तर शिक्षणही विचारात घेतले पाहिजे.

प्यारे१'s picture

8 Jun 2011 - 12:26 pm | प्यारे१

सु'शिक्षित' असणे आणि सु'संस्कृत' असणे यात फरक आहे आणि असावा असे वाटते.
लादेन ला 'लादेनजी' म्हणणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण असू शकते असे नम्रपणे सुचवू इच्छितो.

बाकी, 'अ जात' ( हे इंग्रजी आहे का?)शत्रूंच्या क्रिया आणि प्रतिक्रिया म्हणजे ज्ञान संपादनाची सु'वर्ण' संधी हे पुन्हा एकदा नम्रपणे सुचवू इच्छितो.

चालू द्या.

अजातशत्रु's picture

8 Jun 2011 - 4:44 pm | अजातशत्रु

बाकी लादेन ला 'लादेनजी' म्हणल्यामुळे तो पुन्हा जिवंत तर होणार नाहिना..
या भितीने काहिंनी दिग्गी राजांना टार्गेट केले असावे..

बाकी हा माणूस खरेच जाम फाटक्या तोंडाचा आहे,आयमीन कोट्या करण्यात जाम हुशार आहे,
बाबाचे आंदोलन चिरडल्यामुळे हर्षवायु झाल्यामुळे की दु:खाने?
(साधारणपणे दु:खात माणुस नाचत नसावा)
सुषमा स्वराज आणी पार्टि यांनी दिल्लीला राजघाटवर जिथे प.पु.बापुंची समाधी आहे तिथे बेफाम डॉन्स केला,
तेव्हा श्री.दिग्विजयसिंग म्हणाले भारतिय जनता पार्टि नचनियोकी पार्टि कबसे बन गयी,
म्हणजे भारतिय जनता पार्टि हि नाच्यांची पार्टि केव्हा पासून झाली..

या माणसाचा काहि नेम नाहि..

बाकि डॉन्स भारि होता ;)

तिमा's picture

8 Jun 2011 - 6:29 pm | तिमा

तो बाबा आता सशस्त्र ब्रिगेडच्या गोष्टी करतोय! तरी त्याला पाठिंबा देणार का ?

कुठल्याही सशस्त्र क्रांतिला आपला विरोध आहे. जे काही करायचे ते गांधीबाबाच्या मार्गाने करा.

निल्या१'s picture

9 Jun 2011 - 2:03 am | निल्या१

बाबांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. सशस्त्र सेना उभी करणार म्हणे. अशा उथळ माणसांना पाठिंबा न देणेच हितकर.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Jun 2011 - 10:52 am | llपुण्याचे पेशवेll

बाबांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.
सहमत आहे. त्यांचे आदोलन धाकधपटशाने दडपल्यामुळे त्यांचे संतुलन बिघडल्यासारखे वाटत आहे.

सशस्त्र सेना उभी करणार म्हणे.
कशाला अशा गोष्टी मूर्खासारख्या बोलायच्या? उगाच गरजेल तो बरसेल काय याची पुष्टी होते. काय ती सशस्त्र सेना गूपचूप उभी करायची. दडपशाहीचा प्रयत्न झालाच तर डिग्गी, सिब्बी, चिदू सारखे १-२ लोक द्यायचे उडवून चूपचाप. शेवटी हक्क हा झगडूनच मिळवायला लागतो तो भिक मागून मिळत नाही.

अशा उथळ माणसांना पाठिंबा न देणेच हितकर.

सहमत आहे मी पण. तरीही सध्या आमचा पाठींबा चालू राहील.

नितिन थत्ते's picture

9 Jun 2011 - 11:33 am | नितिन थत्ते

>>उगाच गरजेल तो बरसेल काय याची पुष्टी होते.

सहमत आहे. पूर्वी एकदा स्थापन झालेल्या लष्कर - ई- शिवबा ची उगाच आठवण झाली. :)

विकास's picture

9 Jun 2011 - 4:30 am | विकास

कुठल्याही सशस्त्र क्रांतिला आपला विरोध आहे. जे काही करायचे ते गांधीबाबाच्या मार्गाने करा.

१००% सहमत.

मला वाटते, रामदेवबाबा ९५% म्हणाले असतील असे वाटते आणि त्याला माझा विरोध आहे. उरलेले ५% मिडीया, यु नो! पण जर रामदेवबाबा १००% खरच असे म्हणाले असले तर आता ते अण्णा हजार्‍यांच्या ऐवजी अरुंधती रॉय यांच्याशी पब्लीसिटी स्पर्धा करत असावेत.

Either way, change will come. It could be bloody, or it could be beautiful. It depends on us. – Arundhati Roy

तात्याकडून अशा लेखाची अपेक्षा नव्हती.
अतिशय खेद्जनक लिखाण.
"+" आणि "-" ची सोय चालू असती तर नक्कीच -१००० दिले असते.

सर्कसचा खेळ चालू आहे सगळा. प्रत्येक जण दुसर्‍याच्या दोरीवर कसरत करता नाही आली की आपापली दोरी बांधून नविन कसरत सुरू करतो आहे.!!

>>>**२) ५०० आणि १००० च्या नोटा लग्गेच फर्मान काढून रद्द करा..!
- अहो पण याला काही अन्य पर्याय..?

तात्या , ओन लैन ट्रांस्फर विसरलास होय ?
बरोबर आहे , विसरणारच तु.

सहज's picture

9 Jun 2011 - 8:55 am | सहज

कुंदनसेठ तुमची अफरातफर आणी भ्रष्टाचारात गल्लत होते आहे का?

बॅकेत ट्रान्सफर पारदर्शक आहे त्यामुळे भ्रष्टाचारी नकोच म्हणेल पण अफरातफरीवाल्याला चालते.

वेताळ's picture

9 Jun 2011 - 11:06 am | वेताळ

हे संसारी संन्याशी आहेत का बालब्रम्हचारी संन्यासी?
त्याना इतक्या मोठ्या मालमत्तेची गरजच काय?
संन्यासी माणसाला कपड्याची तरी हाव का असावी?
त्यासाठी बायाचे कपडे घालुन पळुन जाण्याची गरज नव्हती.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Jun 2011 - 12:13 pm | llपुण्याचे पेशवेll

हे संसारी संन्याशी आहेत का बालब्रम्हचारी संन्यासी?

त्यामुळे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात काय फरक पडणार आहे?

त्याना इतक्या मोठ्या मालमत्तेची गरजच काय?
कोणालाही मोठ्या मालमत्तेची काय गरज असते? तीच संन्याश्याला पण असते. गाडगेबाबांना गोरगरीबांसाठी धर्मशाळा स्वच्छतागृहे बांधण्यासाठी पैशाचीच गरज पडली नुसत्या वैराग्यावर आणि झाडलोटीवर धर्मशाळा उभ्या राहील्या नाहीत. जर ही मालमत्ता वैध मार्गानं मिळवली असेल तर त्यात काय गैर आहे.

संन्यासी माणसाला कपड्याची तरी हाव का असावी?

सन्यासी असला तरी त्याने देहरक्षणापुरते कपडे घालावेच असे धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे संन्यासी हा शब्द गाळावा. संन्याश्याने कपडे घालू नयेत असे कुठेही सांगितलेले नाही. बादवे रामदेवबाबा या मनुष्यास आताच्या आंदोलनातले बायकांचे कपडे सोडले तर मी तरी कायम एक भगवी लुंगी आणि भगवे उपरणे या वेषातच पाहीले आहे. वेगवेगळे २ पीस ३ पीस सूट घालून फोटोसेशन करताना पाहीलेले नाही. असो.

त्यासाठी बायाचे कपडे घालुन पळुन जाण्याची गरज नव्हती.
हे तुम्ही कसे काय म्हणू शकता? जर त्यांना असे वाटत असेल की ते स्थानबद्ध झाले किंवा मारले गेले तर आंदोलन संपेल आणि आंदोलन चालू राहणे गरजेचे आहे तर त्यांनी स्वतःचे रक्षण केले असेल त्या उद्देशाने तर त्यात वावगे काय? का त्यांनी त्यांचे स्वबळावर उभे केलेले आंदोलन कसे चालवावे हे देखील इतरांनी ठरवायचे.

वेताळ's picture

10 Jun 2011 - 10:51 am | वेताळ

१) पहिला मुद्दा ते संसारी संन्यासी असले कि परत त्याच्या पुढच्या पिढ्या आपल्या डोक्यावर मिरे वाटायला तयारच असतील.बालब्रम्हचारी म्हटले कि जरा समाधान मिळते कि ह्याला मिळवुन काय फायदा नाही.आता भारतात जेव्हढे बाबा,बुवा किंवा बापु आहेत त्याची लग्ने झालेली आहेत व त्याची मुले त्याच्या संस्था चालावायला तयार झाली आहेत.
२)गाडगेबाबांच्या खेटराची सर रामदेव ला यायची नाही. गाडगेबाबा मिळालेला पैसा समाज कार्यासाठी वापरत असत.त्यानी त्याचा वापर वातानुकुलीत गाड्या,पंचतारांकित हाटीलात राहणे किंवा विमानातुन फिरणे ह्या करिता कधीच केला नाही.बाबा जनतेचा पैसा स्वःताच्या व्यवसाय वृध्दी करिता वापरत आहे.
३)सत्याग्रह आंदोलन करताना बाबाला सर्व गोष्टींची कल्पना असायला हवी होती. त्यात ते संन्यासी असल्यामुळे त्याना सर्व कामविकारांवर ताबा मिळवलेला असावा असे ग्रहित धरले तर त्यांना त्याच्या नग्नतेची लाज वाटली नसती.पण तुमच्या म्हणण्यानुसार स्त्रीवेष धारण करण्यापेक्षा ते लंगोटवर देखिल पळुन जावु शकले असते. पंरतु सत्याग्रहाचा मुलमंत्रच असा आहे कि कोणत्याही दडपशाहीला न घाबरता शांततेच्या मार्गाने त्याला विरोध करणे हेच ते विसरले व आपल्या अनुयायाना तिथेच टाकुन स्त्रीवेष करुन ते पळुन गेले.

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Jun 2011 - 11:06 am | llपुण्याचे पेशवेll

१) पहिला मुद्दा ते संसारी संन्यासी असले कि परत त्याच्या पुढच्या पिढ्या आपल्या डोक्यावर मिरे वाटायला तयारच असतील.बालब्रम्हचारी म्हटले कि जरा समाधान मिळते कि ह्याला मिळवुन काय फायदा नाही.आता भारतात जेव्हढे बाबा,बुवा किंवा बापु आहेत त्याची लग्ने झालेली आहेत व त्याची मुले त्याच्या संस्था चालावायला तयार झाली आहेत.
गांधीबाबांना, लोकमान्य, सावरकर या सर्वांना मुलेबाळे होती, त्यांनी ते चालवत असलेल्या संस्थांसाठी बर्‍यापैकी धनसंचय केला होता म्हणून ते या संशयास पात्र ठरतात का?
२)गाडगेबाबांच्या खेटराची सर रामदेव ला यायची नाही. गाडगेबाबा मिळालेला पैसा समाज कार्यासाठी वापरत असत.त्यानी त्याचा वापर वातानुकुलीत गाड्या,पंचतारांकित हाटीलात राहणे किंवा विमानातुन फिरणे ह्या करिता कधीच केला नाही.बाबा जनतेचा पैसा स्वःताच्या व्यवसाय वृध्दी करिता वापरत आहे.

जर त्यांची व्यवसायवृद्धी सन्मार्गाने होत असेल तर त्यात इतरांनी जळण्याचे कारण काय? बाबांनी त्यांची मालमत्ता ११०० कोटींची आहे हे जाहीर केलेले आहे आणि ती सगळी कायदेशीररीत्या वैध आहे असेही म्हटले आहे. मग त्यांनी मालमत्ता मिळवली आहे त्यात काही गैर वाटत नाही.

३)सत्याग्रह आंदोलन करताना बाबाला सर्व गोष्टींची कल्पना असायला हवी होती. त्यात ते संन्यासी असल्यामुळे त्याना सर्व कामविकारांवर ताबा मिळवलेला असावा असे ग्रहित धरले तर त्यांना त्याच्या नग्नतेची लाज वाटली नसती.पण तुमच्या म्हणण्यानुसार स्त्रीवेष धारण करण्यापेक्षा ते लंगोटवर देखिल पळुन जावु शकले असते. पंरतु सत्याग्रहाचा मुलमंत्रच असा आहे कि कोणत्याही दडपशाहीला न घाबरता शांततेच्या मार्गाने त्याला विरोध करणे हेच ते विसरले व आपल्या अनुयायाना तिथेच टाकुन स्त्रीवेष करुन ते पळुन गेले.
सत्याग्रह हा आंदोलनाचा एक मार्ग आहे. जर रामदेवबाबांच्या स्थानबद्धतेमुळे जर आंदोलन संपेल असे त्याना जर वाटले असेल तर ते योग्य आहे. म्हणून स्वतः आंदोलनासाठी का होईना जिवंत राहणे त्याना आवश्यक वाटले असेल तर ते योग्यच आहे. मग त्या उद्दीष्टासाठी कोणताही अभिनिवेष न बाळगता ते स्त्रीवेष घालून तिथून निसटण्याच्या प्रयत्नात असतील तर ते विवेकीपणाचे आणि म्हणूनच कौतुकास्पद आहे.

योगप्रभू's picture

9 Jun 2011 - 12:47 pm | योगप्रभू

या धाग्याच्या निमित्ताने तात्यास्वामींचे समर्थक आणि टीकाकार यांच्यात जंगी कुस्ती होईल, या अपेक्षेने वाट बघत बसलो होतो, पण पब्लिक काही रामदेवबाबाचे झाड सोडायला तयार नाही. अरेरे!

रामदेवबाबा बायकांचे कपडे घालून पळून गेले, यावर इतकी चर्चा करण्याचे कारण काय? आमचे परमपूज्य बाबा काही नेहमी नेहमी बायकांचे कपडे घालत नाहीत. जीव वाचवण्यासाठी एखाद्यावेळी घातले, तर काय बिघडले? बालगंधर्व चार दशके रंगभूमीवर बायकांचे कपडे घालून वावरले तर त्यांचे इतके कौतुक. अहो १०० वर्षांनीसुद्धा ही कौतुकाची परंपरा कायम आहे. ('अशी ही बनवाबनवी'मधल्या सचिननंतर आता 'बालगंधर्व'मधल्या सुबोधपर्यंत 'कित्ती क्युट दिसतो नै' ही महिलावर्गाची प्रतिक्रिया आहे.) मग आमच्या गुरुदेवांनीच काय घोडे मारले आहे. टीकाकारांनी आपापल्या चड्डीत राहावे, असा इशारा 'स्नेहांजली चिकित्सालया'च्या वतीने आम्ही देऊ इच्छितो.

सन्यासी माणसाला कपड्यांची हाव का असावी? असा प्रश्न कुणीतरी विचारला आहे. परमपूज्य बाबांना कपड्यांचे हाव/आकर्षण नाही. कमरेला भगवे वस्त्र आणि खांद्यावरती एक वस्त्र याखेरीज बाबा अन्य कपडे वापरत नाहीत. खरे तर ते निव्वळ लंगोटावरही वावरु शकतात, पण जनसमूहाला लाज वाटू नये म्हणून कमरेला धोतरासारखे वस्त्र घालतात.

हा काळ्या पैशांचा मुद्दा मध्येच आला म्हणून. अन्यथा आमच्या गुरुदेवांना 'योगा'खेरीज दुसर्‍या कशातही रस नाही. कपालभाती, प्राणायाम, भस्त्रिका याखेरीज दुसरी भाषा नसते त्यांच्या तोंडात. बाबा ब्रह्मचारी असोत किंवा नसोत, पण नित्यानंद स्वामी, रजनीश यांच्यासारखे बदनाम तर नाहीत.

बाबांच्या पॉवरला कमी लेखण्याचे कारण नाही. त्यांच्या अकरा हजार राष्ट्रसैनिकांना शस्त्रच काय, पण लाठ्याही हाती घेण्याची गरज नाही. त्यांच्याकडे आणखी एक अहिंसेचे शस्त्र आहे. सध्याचे उपोषण थांबवून बाबांनी आपले ११ हजार सैनिक आणि ५० हजार अनुयायी यांना दिल्लीत जाऊन दोन्हीवेळा भरपेट खाण्याचा आदेश द्यावा आणि रोज रात्री त्यांना आपल्या कंपनीतर्फे त्रिफळाचूर्णाचे मोफत वाटप करावे. मग बघाच काय चमत्कार होतो ते? सरकारही घाईला आल्याशिवाय राहणार नाही.

सविता's picture

9 Jun 2011 - 1:40 pm | सविता

सुपरलाईक!!!!!

नर्मदेतला गोटा's picture

9 Jun 2011 - 7:00 pm | नर्मदेतला गोटा

तिरशिंगराव माणूसघाणे
>>कुठल्याही सशस्त्र क्रांतिला आपला विरोध आहे

तुझ्या विरोधाला जुमानतो कोण

जयनीत's picture

9 Jun 2011 - 9:50 pm | जयनीत

सहमत.

अविनाशकुलकर्णी's picture

10 Jun 2011 - 11:07 am | अविनाशकुलकर्णी

आपला भारत देश म्हणजे मुर्खांनी भरलेला बाजार झालेला आहे..
आई शप्पत...टाळीचे वाक्य....
जगी या खास वेड्यांचा पसारा मातला सारा. ..

arunjoshi123's picture

15 Dec 2017 - 4:24 pm | arunjoshi123

आपला भारत देश म्हणजे मुर्खांनी भरलेला बाजार झालेला आहे..

हे वाक्य आपण बंगालच्या उपसागरात दोन्ही पाय ठेऊन म्हणत आहात का?

विशुमित's picture

15 Dec 2017 - 4:26 pm | विशुमित

हा हा हा ..!!

सुनील's picture

15 Jun 2011 - 12:56 pm | सुनील

सरकरकडून संपूर्ण दुर्लक्षित करण्यात आल्यानंतर रामदेव बाबांनी श्री श्री रवीशंकर ह्यांच्या सांगण्यावरून उपोषण अवघ्या ९ व्या दिवशी मागे घेतले. आणि आता तर त्यांच्या योगशास्त्राच्या ज्ञानाबद्दलच शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत!

मनिम्याऊ's picture

15 Dec 2017 - 4:06 pm | मनिम्याऊ

..

कुठे जुनी पोष्ट शोधायला गेलात .... आता सगळीच परिस्थिती बदलली आहे ...

arunjoshi123's picture

15 Dec 2017 - 4:40 pm | arunjoshi123

जमल्यास तुझ्या योगसामर्थ्याच्या बळावर मस्तपैकी एकसे एक स्त्री शिष्यांना पटव ( तूर्तास तसं काही नसावं हा माझा अंदाज! ;) )

तुझीच का नाही देत?