Skip to main content

आशीर्वाद..?

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी रविवार, 29/05/2011 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
झ-यांनी आजकाल दगडातून फुटणं सोडून दिलय पक्षांनिही आजकाल किलबिलणं बंद केलय फुलांनी आजकाल फुलणं’ सोडून दिलय पावसाने तर आपलं कोसळणच बंद केलय त्यांना म्हणे माणसां कडून उत्तर हवय .. की ही हिरवीगार जंगलं तुम्ही का तोडलीत...? " माहितीच्या अधिकाराच्या कायद्यात तुम्ही बसत नाही" असं माणूस त्यांना म्हणाल्याचं ऐकतोय..! " हो पण झाडे तोडणे हा गुन्हा आहे.. असं तुमचा कायदाच सांगतो..ना.." असे असित्वाने त्याला विचारले असंही ऐकतोय..! "हो गुन्हा आहे म्हणून आम्ही त्याचा दंड ही भरतो.की." असं माणूस त्यांना म्हणाला, आणि गुन्हा आहे पाप तर नाही ना..? असेही माणूस अस्तित्वाला म्हणाला...असं ऐकतोय तेव्हा मात्र सारा आसमंत खदखदून हसला आणि म्हणाला " " बा मानवा तु थोर आहेस!, सर्व शक्तीमान आहेस जा तुझ्या राज्यावरचा सूर्य कधीच मावणार नाही.." माणूस आनंदाने निघून गेला.. त्याला वाटलं या प्रकृतीनं आपल्याला केवढा मोठा आशीर्वाद दिला........!!!??
लेखनविषय:

वाचने 849
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया