Skip to main content

राजाराम रेग्याचे प्रकरण

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 27/05/2011 04:01 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.hindu.com/2011/05/26/stories/2011052667061400.htm डेव्हिड कोलमन हेडली नामक नाव धारण करणारा एक पाकिस्तानी, इस्लामी, जेहादी अमेरिकन कोठडीत पोपटासारखा बोलू लागला आहे. त्याच्या कबुलीजबाबातून राजाराम रेगे नामक एक गूढ बाहेर पडले आहे. हा माणूस नक्की कोण आहे? उद्धवचा पब्लिक रिलेशन्स ऑफिसर आहे असे त्याने हेडलीला सांगितले होते. " माझी कनेक्षन पार वरपर्यंत आहेत. आणि आपल्याकडे १० हजार कोटी रुपयांच्या प्रोजेक्टस आहेत. आपण दोघेही मिळून भरपूर कमाई करु या" अशा मजकूराची इमेल रेग्याने हेडलीला पाठवली. आता ही लोणकढी थाप होती का खरोखरच हा रेगे कनेक्टेड होता हे शिवसेनेचा शिवशंभू वा पाकचा अल्लाच जाणे. पण कुठेतरी पाणी मुरत असावे असे मला तरी वाटते. हेडलीने काय मलिदा चारून रेग्याची बोलती चालू केली होती हे कळले नाही. उगाचच कुणी असला बिझनेस प्लॅन एखाद्याला इमेल करणार नाही. शिवसेना म्हणते की २६/११ व्ह्यायच्या आधी ह्या रेग्याची शिवसेनेतून हकालपट्टी झाली होती. मला वाटते सत्ताधारी पक्ष पॉवरफुल विरोधकांना गप्प करायला अशी काही हाडके त्यांच्या दिशेने फेकत असावा जेणेकरुन त्यांची स्वतःची प्रकरणे विरोधक धसास लावणार नाहीत. त्यामुळेच ह्या रेग्याची १०००० कोटीच्या बाता करायची हिंमत झाली असावी. भ्रष्टाचाराला शिवसेना व भाजप फक्त बुळा, तोंडदेखला विरोध करत आहेत त्यावरुन त्यांचेही ह्यात बरबटले आहेत असे वाटते. एकंदरीत पैसे खाण्याचा विषय आला की देशप्रेम, धर्मप्रेम हे खुंटीला कसे टांगले जाते ह्याचा एक उत्तम नमुना. बघू या हेडलीसाहेब आणि काय गमतीजमती सांगतात ते. सामनामधे ह्या विषयावर अळीमिळीगुपचिळी आहे हेही एक विशेष.

वाचने 2684
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

सध्यापर्यंत जे काही वाचले आहे त्यावरून हेडली हा दहशतवादी कृत्य करण्याचा उद्देश ठेवून असल्याचे रेगेला माहिती असल्याचे दिसत नाही. त्यामुळे २६/११ च्या प्रकरणात रेगेला दोष देता येणार नाही. बाकी त्याचे आर्थिक व्यवहार वगैरे जे काय असतील

In reply to by नितिन थत्ते

सध्यापर्यंत जे काही वाचले आहे त्यावरून हेडली हा दहशतवादी कृत्य करण्याचा उद्देश ठेवून असल्याचे रेगेला माहिती असल्याचे दिसत नाही. एवढ्या मोठ्या नगरीत नेमका या दोघांचा संबंध "यथा काष्ठं च काष्ठं च" असा आला असावा का? हे पटत नाही. तसेच महेश भटच्या मुलाचे. त्यालाही काही काही माहीत नव्हतं म्हणे. तो फक्त व्यायामात आणि घर शोधण्यात मदत करत होता. कोणी अभिनेत्री (वेडी ठरवली गेलेली), पोलीसांना फोन करुन सांगायची की मला दहशतवादी कारस्थानाविषयी माहिती आहे.. गेली बिचारी.. असो.. किती भय असेल तिच्या मनात.. तिला या गोष्टी कळण्याचा इतर काय मार्ग होता ?

In reply to by नितिन थत्ते

एक म्हणजे हेडली असे स्वच्छपणे सांगेल का की मी एक अतिरेकी आहे आणि मला ठाकरे कुटुंबियांचा निकाल लावायचा आहे मला मदत करा असे? आणि तसे सांगितले तर रेग्याची शामत होती का मदत करायची अर्थातच नाही. पण मुद्दा वेगळा आहे. खिशात हजारो कोटीचे प्रकल्प आहेत ही रेग्याची बढाई खरी होती का दर्पोक्ती होती हे नीट कळलेले नाही. शिवसेनेची, सामन्याची ह्या आघाडीवरील शांतता बरेच काही पाणी मुरत असल्याचे सांगते आहे. उठता बसता नारोबा, लखोबा ह्यांच्या नावाने शिवीगाळ करणारे ह्या खळबळजनक बातमीविषयी गप्प का? मला वाटते हेडलीने आपला गृहपाठ उत्तम केला होता. त्यामुळेच योग्य व्यक्तीशी योग्य बोलणी करुन त्याला इतका आतपर्यंत शिरकाव करता आला. त्यानेही तसेच "रसरशीत" गाजर दाखवले असणार. दोन्ही गोष्टी चिंताजनक आहेत. एक की हेडलीने इथवर मुसंङी मारली हे. म्हणजे पैशाचे योग्य आमिष दाखवल्यास हेही वश होतात. आणि हजारो कोटींच्या प्रकल्पाच्या गमजा इथेही चालतात. म्हणजे कलमाडीला एकट्याला का शिव्या द्यायच्या? हेही तसेच की. हत्तीचे ऐकले होते. पण इथे वाघाचेही खायचे दात आणि दाखवायचे दात निराळे दिसत आहेत.

In reply to by नितिन थत्ते

सध्यापर्यंत जे काही वाचले आहे त्यावरून हेडली हा दहशतवादी कृत्य करण्याचा उद्देश ठेवून असल्याचे रेगेला माहिती असल्याचे दिसत नाही. सहमत त्यामुळे २६/११ च्या प्रकरणात रेगेला दोष देता येणार नाही. कदाचीत. किमान जो पर्यंत उलटे सिद्ध होत नाही तो पर्यंत. बाकी त्याचे आर्थिक व्यवहार वगैरे जे काय असतील म्हणूनच आर्थिक व्यवहारासंदर्भात आणि पर्यायाने भ्रष्टाचारासंदर्भात राजकारण्यांपासून ते जनसामान्यांपर्यंत सर्वांवरच अंकूश ठेवण्याची आणि त्यासाठी मुलभूत बदल करण्याची गरज आहे असे वाटते. कसा बदल घडवावा आणि घडेल ही एक वेगळीच चर्चा होऊ शकते.

शिवसेना भाजपचे हात भ्रष्टाचारात गुंतलेले असतील? म्हणजे काय तुम्हाला अजून खात्री नाही वाटत आहे. आहेतच, उगाच येवढ्या मोठमोठ्या प्रॉपर्ट्या आहेत त्यांच्याजवळ? कोणताही पक्ष असो भ्रष्टाचाराशिवाय चालूच शकत नाही. जनताही कार्यकर्त्यांच्या, लाभधारकांच्या रुपाने त्या भ्रष्टाचारात सामिल असतेच की. उगा कशाला कोणा एकाला बोलू लावायचा. खाणारा प्रत्येकजणच आहे फक्त ज्याची त्याची तुंबडी वेगळी.

देणारा व घेणारा हे दोघेही सारखेच दोषी, ही व्याख्या (जी मला मान्य नाही) जर गृहीत धरली, तर भारतात जवळजवळ सगळेच भ्रष्टाचारी आहेत, फक्त ज्याला आपले काम करुन घेण्यासाठी पैसे खर्च करण्याची ऐपत नाही आणि तरीही जो स्वतःसाठी लांच घेत नाही अशा मूठभर लोकांचा अपवाद सोडला तर. संपूर्ण देश हा भ्रष्टाचाराने पोखरला आहे आणि शिवाय त्याला राजमान्यता तर मिळालीच आहे पण लोकमान्यताही मिळत आहे हे दुर्दैव!