वेडेपणा... (गझल)
काळीज माझे गुंतले अन भोवला वेडेपणा
'शहरात या तू एकटा!' म्हणला मला वेडेपणा
रात्री कुणी हाकारले ओळख मला ना लागली
मी बोललो 'तू कोण रे?' तो बोलला ' वेडेपणा!'
एकांत हा दःखी करे वणवण जिवाची ना टळे
आम्ही पुरे कंटाळलो कंटाळला वेडेपणा
माझ्या रथाला हाकता तू सोबती तू सारथी
ना माहिती आहेस तू माझ्यातला - वेडेपणा!
साकी विचारे सारखी 'आहेस का रे तू सुखी?'
ओलावल्या दुःखातुनी मी कोरला वेडेपणा
स्वप्नात माझ्या सारखा तो चंद्र येतो एकटा
माझ्या परी त्याच्या जगी आकारला वेडेपणा
- स्वानंद
प्रेरणा:
http://www.youtube.com/watch?v=qH5q-v8tvF4
छान! एकांत हा दु:खी करे वणवण
ओलावल्या दुःखातुनी मी कोरला
रूपांतर आवडलं