गृहिणीच "सोप्प "लाईफ
सकाळ झाली गजर वाजला, निवांत झोपलेला जीव माझा दचकून उठला ,
वाटल होत आज जरास उठाव उशिरा ,नवऱ्याच फर्मान होऊन जाऊदे आज बदाम शिरा ,
बेल एकदाच वाजवायची असते हे दुधवाल्याला कळत नाही ,
दार उघडेपर्यंत त्याच बेलवरच बोट ढळत नाही,
छोट्या सोन्याला उठवायची रोजची आहे कसरत
झोपेत असतो तरी नेम धरून लाथा मारतो ,
त्याला उठवायची नाही होत लवकर हिम्मत
सकाळच्या या गोंधळात छोटी छकुलीही उठते
माझ्याकडे इवले हात पसरत मम्मा मला घे न ,घे ना, करत माझ्यामागे फिरते ,
दोन चार दात तिच्या तोंडात तरी ब्रश करण्याची तिला घाई
किती वेळा समजावलं सोनी पेस्ट ब्रशला लावतात खात नाही
कडेवर छकूलीला घेऊन दोन घोट चहाचे घशाखाली उतरवते
छोट्या सोनुचा प्रश्न "आज आई कटलेट देते की सॅण्डविच देते ?
आज सोन्या भाजी पोळी उद्या नक्की म्हणून कसबस पटवते ,
सासुबैंची देवपूजा एव्हाना आटोपलेली असते त्यांना पाहिजे असतो चहा
"आणते ह लगेच जरा छकुलीला पहा "
आजीच्या चष्म्याची छकुलीला भारी आवड ,मला देना करत चालू होते रडारड
छकुलीच्या लाथांनी हातातला चहा सांडतो
इकडे सोनू बुक नाही सापडत म्हणू माझ्याशी भांडतो
नवर्याची रोजची प्रसन्न (वैतागलेली ) मुद्रा पाहून मला खुदकन हसू येते ,
त्याच तुझ्याशिवाय पानच हलणार नाही हे वाक्य किती मनाला सुखावून जाते
ग्यालरीत पेपर वाचत बसलेले सासरे खुदकन हसतात ,त्यांना पाहून यजमानच लाजतात
सकाळ्ची घाईची वेळ संपली ,झाला स्वैपाक झाली जेवण
ताणून देऊया मस्त नाहीतर ,पाहूया टी व्ही कराव आज तरी पूर्ण स्वप्न
पण माझी छकुली दुपारी झोपतच नाही ,दुसर्या बाळासारखी तू कधी शहाणी होणार ग बाई
वाजले दुपारचे तीन ,डोळे भयंकर पेंगतात
तेव्हड्यात सासू बाई "का ग ह्या साडीवर ह्या बांगड्या छान दिसतात ?
आज काय आहे ? सासूला एव्हडी का घाई ?
अरे आज जोश्याकडे भजन कस विसरले मी बाई
आता कसलं झोपण कसलं टी व्ही पाहन ,कधी पूर्ण होईल जाणे माझ अधूर स्वप्न ,
मारला तोंडावर गार पाण्याचा फवारा ,उशीर होतोय पट पट आवरा
फ्रीज मधला मोगर्याचा गजरा त्यान्च्या आंबाड्यात माळला
सासूने मायेने माझ्या गालावर हात फिरवला
काढली स्कुटी निघाली स्वारी ,छोटी छकुली होर्न वाजवून वाजवून मज्जा घेतेय भारी
येताना आणलीये मंडई तून भाजी मॉल मधली भाजी मला परवडणार कशी ?
झाली संध्याकाळ स्वयपाकाची तयारी ,सोन्याची स्वारी बेल वाजवी दारी
छकुलीची रडारड सोन्याची आदळ आपट,त्यांना सांभाळू कि काम करू पटापट ?
सोनूचा होम वोर्क घेता घेता स्वयपाक करते ,एकीकडे छकुलीला वरण भात भरवते
झाली जेवण चालू साफ सफाई ,नवर्याची वाट पाहत बसलेय मी बाई
दोन घास खात खात नवरा चॅनल बदलत असतो
माझा शिणलेला अवतार पाहून तो पन भांडी विसळू लागतो
"अहो राहू द्या कि , मी करते हो "
कारण तो हि दिवसभर शिणलेला असतो
भांडी लावता टेबल पुसता आम्ही मारतो रोज गप्पा
किचनचा ओटा बनून जातो आमच्या गप्पाचा कट्टा
दिवसभराच शीण कसा १० मिनटात पळून जातो
पुन्हा झोपताना साडेपाचचा गजर पुन्हा लावला जातो
कुणी नाही लादला ,कुणी नाही थोपवला
पूर्ण वेळ गृहिणीचा जॉब मीच निवडला
कारण हाच जॉब मला मनापासून आवडला :)
वाचने
8790
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम मस्त! सगळं काही सही सही
+१
In reply to एकदम मस्त! सगळं काही सही सही by मी ऋचा
चान चान ग्यालरीत पेपर वाचत
मुक्तक छान आता कसलं झोपण कसलं
छानच ग
खुप छान लीहलेयस पियुशा,
मस्त
या वाक्यामुळे चित्र पालटले.
In reply to मस्त by अन्या दातार
छान मुक्तक...
+१
In reply to छान मुक्तक... by प्रभाकर पेठकर
+१
In reply to छान मुक्तक... by प्रभाकर पेठकर
@ पेठकर काका अहो हे फक्त मि
In reply to छान मुक्तक... by प्रभाकर पेठकर
मान्य...
In reply to @ पेठकर काका अहो हे फक्त मि by पियुशा
मि एक मुलगि आहे त्यामुळ
In reply to मान्य... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद....
In reply to मि एक मुलगि आहे त्यामुळ by पियुशा
@ पेठकर काका (कारण फक्त
In reply to मान्य... by प्रभाकर पेठकर
नाराज नाही....
In reply to @ पेठकर काका (कारण फक्त by पियुशा
>माझा शिणलेला अवतार पाहून तो
+१
In reply to >माझा शिणलेला अवतार पाहून तो by सविता
अप्रतिम
>माझा शिणलेला अवतार पाहून तो
छान लिहिलय. टिपिकल दिनक्रम
छान कविता... एकंदरीत महिला
आयला, ही पियूशा लग्नाळू
झकास लिहीले आहेस. तुझ्या
हम्म
छान पॉराणिक (!!) कविता (किक
छान पॉराणिक (!!) कविता(किक
स्पीचलेस
<<<स्त्रीमूक्तीच्या फाजील
In reply to स्पीचलेस by आत्मशून्य
.स्वतंत्र विचाराच्या /
In reply to <<<स्त्रीमूक्तीच्या फाजील by शिल्पा ब
<<<एक स्त्रीच स्त्रीची खरी
In reply to .स्वतंत्र विचाराच्या / by आत्मशून्य
त्याचा काहीएक उपयोग होणार
In reply to <<<एक स्त्रीच स्त्रीची खरी by शिल्पा ब
नाईलाज आहे...आम्हाला उगाच फार
In reply to त्याचा काहीएक उपयोग होणार by आत्मशून्य
आपण फारच भावनीक भासता
In reply to नाईलाज आहे...आम्हाला उगाच फार by शिल्पा ब
स्त्रीमुक्तीच्या कल्पना या कधीच फाजील नव्हत्या
In reply to स्पीचलेस by आत्मशून्य
ह्या कवितेच्या निमित्ताने
In reply to स्त्रीमुक्तीच्या कल्पना या कधीच फाजील नव्हत्या by वाहीदा
फाजीलकौतुक केल्याबद्दल आमचे देखील अभिनंदन.हॅ ! हॅ !हॅ !
In reply to ह्या कवितेच्या निमित्ताने by परिकथेतील राजकुमार
स्त्रीमुक्तीच्या कल्पना या
In reply to स्त्रीमुक्तीच्या कल्पना या कधीच फाजील नव्हत्या by वाहीदा
स्त्री मुक्ती...
In reply to स्त्रीमुक्तीच्या कल्पना या कधीच फाजील नव्हत्या by वाहीदा
मस्त आहे कविता
छान
मला हे सुचल...
मस्तच!!
In reply to मला हे सुचल... by पिलीयन रायडर
अरे व्वा पिलियन भाउ छान लिहिल
पिलियन भाऊ???
In reply to अरे व्वा पिलियन भाउ छान लिहिल by पियुशा
अहो....
In reply to अरे व्वा पिलियन भाउ छान लिहिल by पियुशा
स्वारि ह ताइ ! पन मला काय
In reply to अहो.... by पिलीयन रायडर
हे काय
In reply to स्वारि ह ताइ ! पन मला काय by पियुशा
बायका नेहमीच 'ड्रायवर सीट'वर
In reply to हे काय by रमताराम
....
In reply to स्वारि ह ताइ ! पन मला काय by पियुशा