सवयीच्या तऱ्हा
सगळी माणस सारखीच म्हणजे हाती पायी सारखीच दिसायला पण प्रत्येकाचा चेहरा वेगळा, त्याच अंतरंग वेगळं,
त्याचा स्वभाव वेगळा, त्याच रंगरूप वेगळ इतकच काय प्रत्येकाच्या सवयीहि वेगवेगळ्या, माणूस एक सवयी अनेक व्यक्ती तितक्या प्रकृती तद्वत व्यक्ती तितक्या सवयी. आणि या सवयीतरी किती प्रकारच्या.सवय म्हटलं कि ती त्या माणसाच्या अंगवळणी पडते.
म्हणजे त्या माणसाची इच्छा असो अगर नसो ती गोष्ट त्याच्या हातून घडून जाते.
सवयीच्या नाना तर्हा आपल्याला पहायला मिळतात. जशा काही चांगल्या सवयी असतात तशा काही वाईटही
सवयी असतात. परन्तु चांगली सवय लागायला वेळ लागतो या उलट वाईट सवय चटकन लागते.
सवय म्हटली की ती सहजासहजी सुटत नाही. मग ती चांगली असो अगर वाईट.
एखाद्याची सवय कायमची लक्षात रहाते तर एखाद्याच्या सवयीचा दुसरयाला उपद्रव होतो.
कोणाला सकाळी लवकर उठायची सवय तर कोणाला रात्री जागायची सवय. कोणाला झोपेत बोलायची सवय
तर कोणाला नको ती इन्द्रिये खाजवायाची सवय तर कोणाला नुसतच डोक खाजवायाची सवय,
कोणाला वारंवार नाकाला हात लावण्याची सवय तर कोणाला बोलता बोलता डोळे मिचकावण्याची सवय.
कोणाला मध्ये मध्ये लुडबुडायची सवय तर कोणाला मूग गिळून बसण्याची सवय. कोणाला अति
कामाची सवय तर कोणाला काही न करता स्वस्थच राहण्याची सवय. कोणाला ओरडून घेण्याची
सवय तर कोणाला ओरडतच राहण्याची सवय. कोणाला टाळी देण्याची सवय तर कोणाला टाळी
घेण्याची सवय. कोणाला बोलता बोलता बर का बर का म्हणायची सवय तर कोणाला तर ना
तर ना म्हणायची सवय.
खाण्यापिण्याच्या सवयी तर अनेकांच्या अनेक असतात. कोणाला अंथरुणातच चहा प्यायची सवय
तर कोणाला चहा नंतर तंबाखू, सिगारेट्स प्यायची सवय. कोणाला चमचमीत खायची सवय तर
कोणाला झणझणीत खायची सवय तर कोणाला अगदीच मुळमुळीत खायची सवय. शेवटी माणूसच
तो सवयीचा गुलाम होऊन जातो.
अनिल आपटे
वाचने
2802
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान निरिक्शन आहे.
२१ ओळीत ३६ वेळा सवय हा शब्द
छान
In reply to २१ ओळीत ३६ वेळा सवय हा शब्द by ५० फक्त
.........एक करेक्शन
In reply to छान by मिसळलेला काव्यप्रेमी
हं...हे तर एकदम छान निरीक्षण
In reply to .........एक करेक्शन by सुधीर१३७
.........एक करेक्शन
In reply to हं...हे तर एकदम छान निरीक्षण by पाषाणभेद
या लेखाचा पॉईंट काय आहे?
पॉइंट?
In reply to या लेखाचा पॉईंट काय आहे? by शिल्पा ब
पॉईंट टु बी नोटेड मिलॉर्ड, की
संवयी
श्री हेरंब मी मिसळपावचा सभासद
In reply to संवयी by हेरंब
हेरंब तुमच्या त्या लेखाची
In reply to संवयी by हेरंब
लिखाण 'पाठ केलेलं धडाधड
लेखनाची शैली मिपाचे एक सदस्य