मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फ्रुट कस्टर्ड व चेरी व्हॅनीला शेक

प्राजक्ता पवार · · पाककृती
फ्रुट कस्टर्ड : साहित्य : दुध - अर्धा लिटर , कस्टर्ड पावडर - २ चमचे , साखर - ४ चमचे , फ्रेश क्रीम - ४ चमचे , फळे - सफरचंद , द्राक्षे , पपई , डाळींब , संत्रे इ Image removed. कृती : प्रथम अर्धी वाटी दुध वेगळे काढुन घ्या व त्यात कस्टर्ड पावडर घालुन एकत्र करा. उरलेले दुध , साखर घालुन गरम करा . एक उकळी आल्यावर त्यात कस्टर्ड पावडरचे मिश्रण ह्ळुहळु घाला व चमच्याने मिसळा. दोन मिनिटे दुध गरम करुन नंतर ते थंड करायला ठेवा. त्यात फ्रेश क्रीम घालुन मिसळुन घ्या. Image removed. सर्व फळांचे तुकडे करुन घ्या. Image removed. त्यामध्ये तयार केलेले कस्टर्ड घालुन नीट एकत्र करा व थंड करुन सर्व्ह करा. Image removed. चेरी व्हॅनीला शेक : साहित्य : चेरी ( canned ) - १ वाटी , दुध - १ कप , व्हॅनीला आईसक्रीम - २-३ स्कुप , व्हॅनीला इसेंस - अर्धा छोटा चमचा. कृती : प्रथम चेरी व थोडे दुध ब्लेंडरमध्ये घालुन एकत्र करुन घ्या. नंतर त्यात उरलेले दुध , व्हॅनीला आईसक्रीम व व्हॅनीला इसेंस घालुन पुन्हा एकदा ब्लेंडरमध्ये नीट मिसळुन घ्या व थंडगार सर्व्ह करा. Image removed.

वाचन 5899 प्रतिक्रिया 17