तंदूर पापलेट

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
17 Apr 2011 - 4:52 pm

साहित्यः
२ मध्यम किंवा छोटी पापलेटं
२ टेस्पून घट्ट दही
१ टेस्पून आले+लसुण+पुदिना पेस्ट
१ टेस्पून तंदुर मसाला
१/२ टीस्पून गरम मसाला
१/४ टीस्पून काळीमिरीपूड
मीठ चवीनुसार
खायचा लाल रंग ( आवडत असल्यास)

.

पाकृ:

पापलेटाचे शेपूट, डोके, खवले काढून टाकावे, त्यावर सुरीने चिरा पाडाव्यात व माश्यांना लिंबाचा रस, हळद व थोडे मीठ लावून ठेवावे.
दह्यात काळीमिरीपूड सोडून सगळे जिन्नस घालून नीट एकजीव करावे.

.

हा तयार मसाला पापलेटांना नीट सगळीकढून चोळावा.
बेकिंग ट्रे वर तेलाचा हात फिरवून त्यावर पापलेट ठेवावे व वरुन काळीमिरीपूड, तेल किंवा बटर लावून प्री-हिट ओव्हनमध्ये १८० डिग्री वर १०-१२ मिनिटे भाजावे.

.

तयार तंदुर पापलेटवर किंचित गरम-मसाला भुरभुरावा व सॅलॅड सोबत खायला द्यावे.

.

प्रतिक्रिया

किती निगुतीनं केलय सगळं.
फोटू छान आलाय.
आता तुम्ही याला व्हेजी पर्याय द्या.

मस्त.
लाळेर द्या रे कुणी तरी लवकर.

विंजिनेर's picture

17 Apr 2011 - 5:32 pm | विंजिनेर

ओ तुम्ही जा पाहू इथनं अशी प्रतिक्रिया देणार होतो पण म्हटलं असू दे त्रास झाला तरी सहन करू :)

टारझन's picture

17 Apr 2011 - 5:51 pm | टारझन

वा :) मासाहारी पाकृ :)

अवांतर : ही पाकृ अंडे घालुन कशी करता येईल ? :)

- टापलेट

सुनील's picture

17 Apr 2011 - 6:30 pm | सुनील

ही पाकृ अंडे घालुन कशी करता येईल ?
पापलेटच्या ऐवजी अंडे घालून!

ही पाकृ बटाटे घालुन कशी करता येईल ?
पापलेटच्या ऐवजी बटाटे घालून!

बाकी पदार्थ दिसतोय मस्त हेवेसांनल!

एक प्रश्न - फक्त एकाच बाजूने भाजायचे की १०-१२ मिनिटांनतर पलटायचे?

सानिकास्वप्निल's picture

17 Apr 2011 - 9:50 pm | सानिकास्वप्निल

मासे १०-१२ मिनिटे भाजून घ्यायचे पलटायची गरज नाही कारण मासे पटकन शिजतात.
हवे असल्यास बांबु स्क्युअर्स लावून ग्रील ही करू शकता :)

नीलकांत's picture

17 Apr 2011 - 7:20 pm | नीलकांत

आधीच तंदूर आमचा आवडीचा प्रकार

त्यात मासे हा दुसरा आवडीचा प्रकार
आणि आज त्यांचा अत्यंत सुंदर संगमाच्या या खाद्यप्रकाराला काय म्हणू?

खल्लास ... एकदम खल्लास.

पिवळा डांबिस's picture

18 Apr 2011 - 10:55 am | पिवळा डांबिस

आधीच तंदूर आमचा आवडीचा प्रकार
अहो मालक, पण या पाककॄतीत तंदूर कुठे वापरला आहे?
दिसला मासा, धावले लगेच!!!!
:)

(वरील रेसेपीचा स्नॅपशॉट घेतला गेलेला आहे!!!!)

यशोधरा's picture

17 Apr 2011 - 7:30 pm | यशोधरा

मस्त फोटो आणि पाकृ. आज आमच्याकडे कोलंबी आणि बांगुर्डे. :)
पुढच्या रविवारी असे पापलेट बनवते आता.

मराठमोळा's picture

18 Apr 2011 - 10:26 am | मराठमोळा

>>पुढच्या रविवारी असे पापलेट बनवते आता.

:) कुठे? मी येऊ का ( आयतं खायला)? नाही म्हणजे मी येतोच.. :)

बाकी पाकृ आणि फोटु एक्दम झकास.. यशो ताईंनी बनविले की ते कसे झाले होते ते इथे अपडेट करेन. :)

यशोधरा's picture

18 Apr 2011 - 3:20 pm | यशोधरा

कुठे काय मम्या? घरी :)
ये की :) येताना पापलेटंही घेऊन ये! :D

दीविरा's picture

17 Apr 2011 - 8:37 pm | दीविरा

आज रविवार अगदी जोरात आहे :)

छान फोटो आणि पाक्रु :)

तंदूरी मासे आवडतात

नाटक्या's picture

17 Apr 2011 - 8:53 pm | नाटक्या

मस्तच.. बे एरियाचा पुढचा कट्टा एकदम रंगतदार होणार....

लवंगी's picture

17 Apr 2011 - 9:10 pm | लवंगी

जबरा.. आता लवकरच आणावी लागतील

नगरीनिरंजन's picture

17 Apr 2011 - 9:53 pm | नगरीनिरंजन

मस्त दिसत आहेत, चवदार असणार यात शंका नाही. तंदूरी पापलेट मी स्क्यूअर लावून करतो आणि डोकी उडवत नाही.

योगप्रभू's picture

17 Apr 2011 - 11:08 pm | योगप्रभू

गोव्यात मी कलंगुटला एक अफलातून प्रकार खाल्लाय.
पापलेटच्या पोटात मस्त कोळंबी आणि खोबर्‍याचा ओला मसाला भरला होता. वरुन तंदूर पापलेट आणि फोडल्यावर आत सुरेख मसाला कोळंबी. पुन्हा मसाला आतून-बाहेरुन दोन्हीकडून असल्याने पापलेटची टेस्ट तर काय सांगू?

सानिका,
फोटो सुंदर आलाय. कांद्याच्या रिंग्ज एकदम खुलून दिसताहेत, पण सजावटीत पापलेट नुसतेच डिशमध्ये ठेवण्याऐवजी त्याखाली कापलेल्या कोबी किंवा पालकच्या झिरमिळ्या असत्या तर आणखी मजा आली असती.

तुफ्फान फोटो!
रेवती म्हणते तसे,अगदी निगुतीने केले आहेस!
मस्त!

निवेदिता-ताई's picture

18 Apr 2011 - 7:44 am | निवेदिता-ताई

मी ही असेच म्हणते....
मस्त... मस्त...फोटो खूपच छान.

सहज's picture

18 Apr 2011 - 7:17 am | सहज

फोटो, पाकृ दोन्ही आवडले!!

पियुशा's picture

18 Apr 2011 - 10:17 am | पियुशा

मान गये उस्तादिन :)
" या वर्शिचि बेस्ट शेफ अवार्र्ड तुलाच देउन टा़कला ग ;)

विशाखा राऊत's picture

18 Apr 2011 - 2:01 pm | विशाखा राऊत

मस्त..

परिकथेतील राजकुमार's picture

18 Apr 2011 - 3:27 pm | परिकथेतील राजकुमार

सदर पाकृ मासा न घालता कशी करावी ?

शाकाहारी

मराठमोळा's picture

18 Apr 2011 - 3:30 pm | मराठमोळा

>>सदर पाकृ मासा न घालता कशी करावी ?

ही पाकृ मासा न घालता केल्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो, १४ दिवस उपाशी राहण्याची शिक्षा ठोठावण्यात येते. त्यामुळे असा प्रकार करु नये. :)

Mrunalini's picture

19 Apr 2011 - 2:09 am | Mrunalini

वा..... खुपच मस्त ग.... :)

निकिता_निल's picture

19 Apr 2011 - 5:49 am | निकिता_निल

व्वा, काय छान आलाय फोटो. एकदम मस्त. हे असे पापलेट डॉलरच्या देशात कुठे मिळतात?

मत्स्यप्रेमि निता

सानिकास्वप्निल's picture

19 Apr 2011 - 6:01 am | सानिकास्वप्निल

डॉलरच्या देशात तर माहीत नाही पण राणीच्या (पाऊंड) च्या देशात मात्र फ्रोझन मिळतात, काही ठिकाणी ताजी मासळी ही मिळते :)

निकिता_निल's picture

19 Apr 2011 - 6:10 am | निकिता_निल

वा ग्रेट , ताजी मासळी ! क्विन एलि़झाबेथ जिन्दाबाद!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Apr 2011 - 6:51 pm | निनाद मुक्काम प...

हो आमचे काही पंचतारांकीत बाल्लावाचार्य मित्र लंडन मध्ये पहाटे च्या ताज्या मासळी बाजारात काही तास प्रवास करून जायचे .
आमचा मात्र खाण्याशी संबंध असायचा
ही पाककृती नक्की ट्राय करेन

गेल्या शनिवारी पापलेट आणावयास गेलो. मोठा पापलेट २००० (दोन हजार अक्षरी मात्र) रु. किलो.
सुरमई १००० (एक हजार अक्षरी मात्र)..

हे सर्व मॉलमधल्या नॉनव्हेज स्टोअरमधे की जिथे बाहेरच्यापेक्षा कमी दरात मासे मिळतात असा दावा केला जातो.

६०० रु. किलोचा रावस घेऊन त्यास पापलेट समजण्यात आले गेले.

त्याच्या आधी २ आठवडे बराच स्वस्त होता म्हणायचे. मोठा पापलेट १००० आणि छोटा पापलेट ६५०.

पाकृ झकास खमंग खुसखुशीत..

भाव उतरले की नक्की करणार. ;) अर्थात ओव्हन नाही. त्यामुळे तो एक प्रश्नच आहे..

कार्कुंडा मध्यमवर्गीय (गवि)

गवि, तुम्ही राहता तरी कुठे? २००० रुपये किलो? ८०० - ९०० वगैरे पाहिलंय.
लहानवालं - ६२० वगैरे.

पुन्हा प्रतिसाद वाचला. मॉलमध्ये.. ह्म्म.. मग बरोबर. असू शकेल.

गवि's picture

19 Apr 2011 - 3:18 pm | गवि

मॉलमधे आणि बाहेर तसा काही भावात फार फरक नसतो. उलट मॉलवाले लेस दॅन एम आर पी असे लिहीतात.

फरक एवढाच : बाहेर रस्त्यातल्या माम्यांकडून घेतले की हा मासा केवढ्याला ऐवजी या माश्या केवढ्याला असे विचारण्याची वेळ येते. बर्फाची नीट सोय नसल्याने टोपलीत मासळीचा चिखल झालेला असतो. कुत्री मांजरे तोंडे घालत असतात..एकूण गलिच्छ वाटते.

म्हणून मॉलातील मत्स्यविभागात जरा स्वच्छ वातावरणात खरेदी बरी वाटते.

तिथे बाहेरच्यापेक्षा इतकेही काही महाग नसते.

कारण एकच आठवडा आधी एका साध्या मासळीच्या दुकानात जाऊन मी सुरमईची चौकशी केली होती आणि तिथेही जवळपास त्या दिवशीच्या मॉलमधल्या भावाइतकेच भाव होते.

असो. कोणाला मुम्बई ठाण्यात स्वस्त मिळाले असल्यास कळवणे. किंवा तशी दुकाने कळवणे.

मुंबईतले ठाऊक नाही फारसे, एक माहीम/ शिवडीचा बाजार सोडला तर, पण तिथेही माम्या जो बाजार घेऊन बसतात तो स्व्च्छच असतो. तुम्ही म्हणता तितके वाईट पाहिलेले नाहीये. मॉलमध्ये लेस दॅन एमआरपी म्हणून शेंड्याही लावतात.

इथे पुण्यात तारूचे दुकान मासेखाऊंमध्ये प्रसिद्ध आहे, तसेच कॅंप मंडईमध्येही चांगली मासळी मिळते., स्वच्छ, ताजी आणि इतकी महागही नसते.

छ्या त्या चकचकीत मॉल मध्ये जाउन घासा घीस न करता बाजार घेण्यात काय मज्जा?
बाजार घ्यावा तर कसा मस्त पैकी मावशी बरोबर वाद घालत... सौदा नाय पटला म्हणुन पुढे जाताच मावशीने परत 'प्रेमळ'हाक मारुन बोलावल्यावर "अजुन एक टाक गो" असा हट्ट धरत..... करायचा तो खरा बाजार हाट.
मासे वजनावर घ्यायचे हेच मुळी मला पटत नाही. मासा घ्यावा तर तो नगावर वा वाट्यावर.

पप्पु अंकल's picture

19 Apr 2011 - 3:15 pm | पप्पु अंकल

व्वा, ग्रेट, एकदम मस्त ! १००/१००

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Apr 2011 - 3:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो जबरा आले आहेत.

चखण्यासाठी असाच पापलेट असावा. :)

-दिलीप बिरुटे

काजुकतली's picture

20 Apr 2011 - 11:06 am | काजुकतली

तंदुर पापलेट एकदम झक्कास...
त्याच्या पोटात कोलंबी मसाला घालुन तंदुर केल्यास आनंद द्विगुणीत होईल.
(माशांना दही लावावे हे काही पटले नाही. मी दही न लावताच करेन)

गणेशा's picture

18 Jan 2012 - 8:52 pm | गणेशा

जबरदस्त

लालगरूड's picture

16 Sep 2015 - 11:34 pm | लालगरूड

श्रावण संपला

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Sep 2015 - 8:15 am | कैलासवासी सोन्याबापु

तंदूरी पापलेट हे माइक्रोवेव मधे बनेल का?

तरच बनेल. नाही तर सरळ वखारीतून कांडी कोळसा आणा, हार्ड्वेअर मधून जाडसर लोखंडी जाळी आणा [ २ जाळ्या ]. एकावर एक अश्या २ जाळ्या वीट / दगड वापरुन ठेवा. खालच्या जाळीवर कोळसे पसरवा आणी पेटवा. चान्गले पेटले की वरच्या जाळीवर पापलेट / चिकन ई. तन्दूर बनवा. नेहेमी करणार असाल तर घडीचा स्टेनलेस स्टील चा तन्दूर ही मिळतो. घडी घातली की ल्यापटॉप पेक्षाही पातळ घडी बनते.

सौंदाळा's picture

23 Sep 2015 - 4:27 pm | सौंदाळा

तुम्ही असा तन्दूर / बार्बेक्यु स्टँड वापरला आहे का?
ऑनलाईन उपलब्ध आहे का? लिंक द्या प्लीज असेल तर.

आनंदी गोपाळ's picture

24 Sep 2015 - 9:19 am | आनंदी गोपाळ

कोणत्याही डीमार्टमधे मिळतो.

सानिकास्वप्निल's picture

23 Sep 2015 - 4:40 pm | सानिकास्वप्निल

कनव्हेक्शन मोड असेल तर बनेल.
धन्यवाद

कविता१९७८'s picture

24 Sep 2015 - 9:32 am | कविता१९७८

वाह सुगरण बाई