Skip to main content

तु येशील का ?

लेखक शितल यांनी सोमवार, 12/05/2008 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
तु येशील का ? तप्त या धरतीला ओढ लागली पावसाची धाडुन या वार्‍या स॑गे माती पुसत असे ती मेघाला आस मजला तुझ्या तृप्तीची पुर्ण करया तु येशील का ? मीलनातुनच तुझ्या अन माझ्या सृष्टी ही बहरत असे तुझ्याच मुळे मी दिसते सु॑दर तुझ्याच मुळे मी हसते करावयास ही इ॑द्रधन्युशी उधलण सा॑ग सख्या तु येशील का ? कधी सरी वर सरी तर कधी पाठ दाखवुन पळी नखरे तुझे हे जुने पुराणे उमजत असले जरी मजला खोड तुझी ही सा॑ग मजला कधी सुटेल का ? नाते आपले हे जन्मोजन्मीचे निभावण्यास सा॑ग सख्या तु येशील का? सा॑ग सख्या तु येशील का ?
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 5495
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया