आज ११ मे २००८ ..मदर्स डे अर्थात मात्रुदिन. अमेरिकामध्ये मे महिन्याच्या दुसर् या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. मदर्स डे हा अमेरिकन डे असला तरी हल्ली जगभर साजरा केला जातो.
आई रोजच आपल्यासाठी खूप काही करत असते. आपल्यासाठी तिळतिळ झीजत असते. मुलं कितीही मोठी झाली आणि त्यानाहि मुलं झाली तरी तिचं आईपण कधीच संपत नाही. एखादा दिवस असा हवा की, तिच्यासाठी आपल्याला काही करता येईल. ...तिला खास वाटेल असे काहीतरी. या भावनेतून मदर्स डे साजरा केला जाऊ लागला. पाश्चांत्यांचे अन्धानुअकरण नको पण मदर्स डे मागचा उद्देश अतिशय चान्गला असल्याने आपणही तो साजरा करायला काही हरकत नाही.
सकाळी आईच्या आधी उठून आपण तिच्यासाठी तिच्या आवडीची न्याहरी बनवू शकतो. तिच्या आवडीच्या फुलांचा गुच्छ तिला भेट देऊ शकतो. आपल्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकातून थोडासा वेळ काढुन तिच्याशी मस्त गप्पा मारु शकतो. तिला आवड असेल तर नाटकाला वा सिनेमाला नेऊ श़कतो. तिच्यापासून लाम्ब असलो तर तिला छानसे पत्र लिहू शकतो.
काहींना वाटेल की मात्रुदिन हा वेगळा असा का साजरा व्हायला हवा...आईवरील प्रेम , तिच्या मायेची जाणीव रोजच व्यक्त व्हायला हवी.
ते ही बरोबर आहे . पण तरीही आजच्या धकाधकीच्या , तणावाच्या ,धावपळीच्या जीवनात तिने आपल्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक त्याग सहजपणे नजरेआड केला जाऊ शकतो, आईला सगळ चालतं म्हणुन काही गोष्टी ग्रुहीत धरल्या जाऊ शकतात. आईची काही ईच्छा असेल, तिला काहीतरी वेगळं करावंसं वाटत असेल हे आपल्या गावीहि नसतं. हे सर्व टाळून तिला स्पेशल फील व्हाव यासाठी आजच्या मात्रुदिनाचा उद्देश.
माझी आई माझ्यापासून हजारो मैल लाम्ब असल्याने मी तिला फोनवरूनच शुभेच्छा देणार आहे. तुम्ही काय करणार आहात किन्वा काय केले हे वाचायला जरूर आवडेल.
मीपावरील सर्व मातांना आणि समस्त मीपाकरांच्या माताना मात्रुदिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा !!!
-- ईश्वरी
वाचने
14480
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
मातृदिन असे लिहावे
मातृदिन
तृ..
In reply to मातृदिन by ईश्वरी
मातृदिन...
काय हरकत आहे?
आपल्या
सहमत
In reply to आपल्या by पक्या
हरकत नाही..
In reply to आपल्या by पक्या
काल आमच्याही घरी
In reply to हरकत नाही.. by प्रभाकर पेठकर
पटले.
In reply to काल आमच्याही घरी by वेलदोडा
मातृदिन..
मातृदिन
In reply to मातृदिन.. by स्वाती दिनेश
आपला मातृदिन
मातृदिनानिमित्त
सहाव्या
In reply to मातृदिनानिमित्त by प्रियाली
--
In reply to मातृदिनानिमित्त by प्रियाली
गेल्या वर्षी
In reply to -- by विसोबा खेचर
शेवटची ओळ
In reply to मातृदिनानिमित्त by प्रियाली
तिला आई नाही, गेल्या वर्षी कॅन्सरने वारली.
In reply to मातृदिनानिमित्त by प्रियाली
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.....
In reply to मातृदिनानिमित्त by प्रियाली
प्रियाली,
काल मातृदिन होता?!
छान
एक प्रश्न