Skip to main content

उकडीचे मोदक

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 23/03/2011 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य उकडसाठी: २ वाट्या सुवासिक तांदुळाची पिठी २ वाट्या पाणी २ टेस्पून तेल चिमूटभर मीठ पा़कृ: जाड बुडाच्या पातेल्यात २ वाट्या पाणी +२ टेस्पून तेल घालून उकळत ठेवावे. उकळी आली की त्यात मीठ व २ वाट्या सुवासिक तांदुळाची पिठी घालून चांगले ढवळावे. गॅस मंद करुन चांगल्या दोन वाफा आणाव्यात. उकड गरम असतानाच खूप मळून घेणे. साहित्य सारणः २ वाट्या खोवलेले ओले खोबरे दीड वाटी चिरलेला गूळ २-३ टेस्पून साखर (ऐछिक) १ टीस्पून वेलचीपूड १/२ टीस्पून जायफळपूड पाकृ: गूळ्,खोबरे व साखर एकत्र करुन शिजवणे. सारण बोटाला चिकट लागले की गॅसवरून उतरवून त्यात वेलचीपूड-जायफळपूड घालणे. सारण ओलसरच हवे फार कोरडे नको. पारंपारीक पद्धतीत उकडेचा गोळा घेऊन त्याची वाटी तयार करतात व मुखर्या पाडतात.त्यात सारण भरून मग मोदकाचे तोंड बंद करतात. मला अजुन ते नीट जमत नाही म्हणून मी मोदकाचा साचा वापरते. साच्याला तेल लावावे. उकडीचा छोटा गोळा घेऊन तो नीट साच्यात भरावा व बोटाने सगळीकडे आतून दाबावा. त्यात सारण भरून साच्यातुन बाहेर आलेल्या पिठाला खालून पसरवून नीट बंद करावे (मोदकाचा बेस बंद करणे). मोदकपात्रात, चाळणीवर ओला रूमाल ठेवावा व त्यावर पाण्यात बुडवून मग मोदक ठेवावे (असे केल्याने मोदक फुटत नाही). १५ मिनिटे उकडणे. साजुक तुपाबरोबर खायला देणे. .

वाचने 13809
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

अगदी सुंदर दिसताहेत मोदक! मुखर्‍या करता येत नसल्यास साच्यात केलेला मोदक छान दिसतो, अन्यथा वेडेवाकडे मोदक बघावे लागतात. अर्थात अश्या चुका मी भरपूर केल्यात.;)

या ऐवजी लोणी घालुन मोदक करावेत. एकदा करून बघा. पारीत किती फरक पडतो तो. बाकी छान. नेहमीच्या मोदकात थोडा बदल हवा असल्यास येथे पहावे.

मला पण या मोदकाच्या (उकडेच्या ) मुखर्‍या घालता येत नाहित. पण जेंव्हा कणिकेच्या करते तेंव्हा फार सुन्दर मुखर्‍या येतात. मोदक लाजवाब!!

In reply to by स्पंदना

हो तळायचे मोदक करताना मी पण कणिकेचे करते तेव्हा छान मुखर्‍या पडतात :)

In reply to by सूड

@सानिकातैंची रेशिपी आणि साच्यातले मोदक ? ये बात कुछ हज़म नही हुई।>>> यहीच बोल्ता है...अगदी मनापासुन बोल्ता है।

In reply to by सूड

अजून हाताने पारी करून , मुखर्‍या बनवायला जमत नाही :( असो ह्यावेळेस पुन्हा प्रयत्न करणार आहे .....

In reply to by सानिकास्वप्निल

ओके, मी माझ्या माहितीप्रमाणे पारी आणि मुखर्‍या बनवायची सोपी पद्धत सांगायचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम, उकड काढलेल्या पीठीचा पेढ्याच्या आकारात गोळा बनवून घावा. त्यानंतर त्या गोळ्याला बाहेरच्या बाजूने चिमटीने हळूहळू दाब देत पसरट करत न्यावे, जेणेकरुन पीठीचा मधला भाग फुगीर राहील. आता हा पीठाचा फुगीर भाग चिमटीने हळूहळू बाहेरच्या दिशेने पसरत न्यावा, म्हणजे वाटीच्या आकाराची पारी तयार होईल. आता अंदाजे सारण भरावं. मुखर्‍या करताना हाताची तर्जनी पारीच्या आतल्या भागात ठेवावी आणि तर्जनी ठेवलेला पारीचा भाग अंगठा व मधल्या बोटाने अलगद चिमटीत पकडून तर्जनी उचलावी. याच पद्धतीने सर्व मुखर्‍या कराव्यात. हळूहळू मोदक वळत बंद करत आणावा. मोदक काहीसा असा दिसेल.

In reply to by सूड

छ्या.... नकटा मोदक बघून जीव कळवळला.. :'( शेवटचा फटू तरी नीट टाकायचा रे....

In reply to by मोदक

सगळेच मोदक मोठ्या नाकाचे नसतात मित्रा !! काहींची नाकं अंगलटीला शोभेलशीही असतात.

In reply to by मोदक

खाता येईना तोंड वाकडं अशातला प्रकार दिसतो आहे.