वासांसि जीर्णानि यथा विहाय
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि |
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥२- २२
ज्याप्रमाणे मनुष्य जुनी झालेली वस्त्रे टाकुन देऊन नवीन वस्त्रे धारण करतो त्याचप्रमाणे शरीराचा त्याग करुन आत्मा नवीन देह धारण करतो. सांख्यांनी मांडलेल्या तत्वज्ञानानुसार त्या तत्वज्ञानाचे स्वरुप विशद करुन सांगतांना भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे संवादातुन सांगितले त्यातले एक महत्वाचे वाक्य असे या श्लोकाला म्हणता येईल.
जुन्या वस्त्रांच्या त्यागानंतर नवीन वस्त्रं धारण करणे हा दाखला आपल्या रोजच्या आयुष्यात आपण नेहमी पहात असतो असे म्हटले तर वावगे होणार नाही. अनेक गोष्टी असतात ज्या आपण आता जून्या झाल्या असे मानून सोडून देतो. कधी कधी तीच ती वस्तु वापरुन आपल्याला तिचा कंटाळा येतो. तेच ते काम करण्याचा आपल्याला कंटाळा येतो. मग त्यात बदल करावा वाटतो. कधी कामात बदल केला जातो तर कधी कामापासुन दूर जात मनाला पुन्हा ताजे केले जाते. कधी कधी मात्र नोकरी वा व्यवसायच बदलावा वाटतो. अनेक जण तसे केल्यावर बरे वाटले असा अनुभव घेत असल्याचे आपण पहातोच. कधी कधी रहात्या घराचा सुद्धा कंटाळा येतो अशा वेळेस नवे घर पाहिले जाते. थोडक्यात काय मनुष्य हा सतत बदल करत असतो कधी जाणतेपणाने कधी अजाणतेपणाने.
बदल होत रहावा.
बदल होत नसेल तर जीवन थांबते.
बदल अनेक मार्गांनी घडत असतो.
घडत नसेल तर घडवावा लागतो.
मनुष्याचे प्रयत्न, स्वतः मनुष्य, स्थान आणि उपलब्ध साधने या सर्वांचा परिपाक होऊन मनुष्याची कृती घडत असली तरी दैव नामक अदृश्य फल सोबत असतेच. बदलाचे परिणाम ठरवण्यात हे पाचही अवयव आपापली भुमिका बजावत असतात.
असाच एक बदल करण्याचे मनात योजून हा लेख लिहिला आहे. बदल कसा होईल, काय होईल, कधी होईल इत्यादी तपशील भविष्यकालात योग्य वेळ होताच ठरवू असा विचार करून जून्या गोष्टींचा त्याग हे पहिले पाऊल उचलले आहे. पूढे परमेश्वराची जशी मर्जी असेल तसे !!
अवलिया या सदस्य नामाने मी आजवर तुमच्यात होतो. अनेकांनी दिलेल्या सुचना, केलेले मार्गदर्शन यामुळे सुरवातीला मोडक्या तोडक्या एखाद दोन ओळींचे लेख लिहिणारा मी, आज किमान चार पाच ओळी सरळ लिहू शकतो हे तुम्हा सर्वांचे माझ्यावर असलेले ऋण आहे जे कधीही फिटणार नाही. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासुन आभारी आहे.
अनेकांना जाणते अजाणते लेखनातुन वा खरड्/व्यनीतुन दुखावले आहे/असेल त्यांची मनापासुन माफी मागतो.
केलेले लेखन अनेकांना पटले असेल त्यांचा आभारी आहे. अनेकांना पटले नसेल त्यांचा सुद्धा आभारी आहे. अनेकांना नीरस कंटाळवाणे वाटले असेल त्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे.
आमचे हितचिंतक (!) आणि टीकाकार अनेक आहेत. त्यांच्याबद्दल इतकेच म्हणतो -
ये नाम केचिदिह न प्रथयन्त्यवज्ञां
जानन्ति ते किमपि तान् प्रति नैष यत्नः।
उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्मयं निरवधिः विपुला च पृथ्वी।।
अजुन काय बोलु?
येतो आता !
प्रतिक्रिया
कुठं चाललात?
आधी
कुठे चाललात?
च्यायला !!
साथीचा रोग पसरतो आहे का?
अवलियाजी, पामराला विसरु
शुभेच्छा.
एप्रिल फुल चा प्रकार आहे का
हम्म्म्म...
नाना..तुसी ना जावो
शांति: शांति: शांति:
अरेरे! ख्रिस्ती कबर आणि
महापुरुषांचा पराभव हा लेख
ए नानबा.....
नानाच्या लेखांचा नियमित
काय हा चेंगटपणा
काय करायचं ते करावं, उगाच
+१
नानासाहेब काही आगळीक झालीय
नानासाहेब काही आगळीक झालीय
शेवटी मनाची तयारी झाली तर...
अज्ञातवासास शुभेच्छा.
अवलिया'जी... तुम्ही मिपा
वुई विल मिस यु नाना.
एक खांदा तुटल्या सारखे वाटते
=)) मला पण हाच दाउट आहे
नाना चाललेत कुठे? जुनी
नाना, काही शेवटची
हेच म्हणतो
असाच एक लेख नविन आय्डि घेउन
ज्याप्रमाणे मनुष्य जुनी
हम्म्म..
अवलिया!
कीती दिवसांचं आमरण उपोषण
हो ना नाना...या अनुभवी कडुन
आहेत का गेले?
चौपाटी
नाना जाऊ नका
जाऊ बाई जोरात
..............परत
नाना जाता जाता एक समस्त
एकदा तुम्हाला
(No subject)
नानाला हे शोभत नाही.. असो
शुभेच्छा
शुभेच्छा!
धन्यवाद मित्रांनो !! जय
खरंच नाना चालले की काय? वाईट
धन्यवाद
रामदासा.... नाना नावे धारण
Pagination