गाभार्यातील शिव शंभो ..!!
त्या छोट्याश्या अरुंद गल्लीत
जुन्या पुराण्या वाड्यात
मध्यभागी खोलवर उतरत गेलेल्या
त्या पायर्या
आत शंकराचा गाभारा
मिट्ट काळोख .
मिणमिणता दिवा
टिपुकल्या प्रकाशाची काळोखाला साथ
मामा शिवशंभो करीत वाजवायचा ती
छोटीशी घण्टा
किणकिण नाद उडवून जायची काळोखाची पाखरे
अंधाराला भोके पाडीत
घुमायचा नाद गोल चौफेर
भीती वाटायची मला
मी गप्प घाबरून ..
मामाचा नाद घुमायचा
शी ssss व शsss भो ...!!
माझे कान गच्च .....!!!
खूप वर्षांनी गावी गेलो
गल्लीत गेलो
उध्वस्त झालेला वाडा
नि चकाचक नवी ईमारत
उत्तम बांधणीची
भळभळून प्रकाशाची
शंकराचा गाभारा सुंदर मार्बलचा
प्रकाशाने ओघळलेला
सुशिक्षित वाटला
पण मन नाही झाले प्रसन्न
मन शोधात बसलेय
त्या गच्च काळोखाचा गाभारा
त्यातला मिणमिणता दिवां
काळोखाला प्रकाशाची
टिपुकली साथ
मी आठवून हरवून जातोय
त्या जुन्या गाभार्यात
मामाचा आवाज
घुमणारा ..
हरवून गेलाय कधीचा ......!!
छान कविता... उद्या
आपली कविता छान आहे, श्री.
अप्रतिम
गणेशा चा अभ्यासपुर्ण प्रतिसाद
ही ओळ
टिपुकला प्रकाश .. काळोखाची
एकदम छान. जुन्या आठवणी
सुंदर परिणाम
राम्य ते बाल्पन आन तेव मांतरलेयलेले दीअस...........