आशीर्वाद

धोणी's picture
धोणी in क्रिडा जगत
25 Feb 2011 - 2:17 pm

महेंद्र

नमस्कार मित्रांनो,

होय मीच, दचकू नका
मी महेंद्र सिंघ धोणी
मागच्या आठवड्यात सचिन ने या संस्थळाची माहिती दिली, आणि इथलं वातावरण बघून मी याचा सदस्य झालो.
मित्रांनो मला आज तुमच्या आधाराची फार गरज आहे
विश्वचषकाची धामधूम सुरु आहे , आपल्या संघाला याबाबतीत फेवरेट मानलं जातंय , खरं आहे, आहे आपला संघ बलवान.
पण या सगळ्याचं दडपण आलंय हो माझ्यावर, आता तुम्ही म्हणालं त्यात कसलं दडपण, एवढे करोडो रुपये तर कमावतोस.
पण तसं नाहीये, पैसे हि गोष्ट वेगळी, पण तुम्हा करोडो भारतीयांच्या अपेक्षा २४ तास डोक्यावर बाळगणं, खूप कठीण गोष्ट आहे.
माझा इतिहास तुम्हाला सांगत बसत नाही, तुम्हाला तो माहित आहेच, पण मी सुद्धा साधारण माणूसच आहे
मी सुद्धा चिडतो, मला सुद्धा राग येतो, पण एवढ्या कमी वयात कर्णधार पद अंगावर आल्यामुळे अचानक पोक्तपणा आला आहे, (मी केस कापले ते याच साठी, तो थिल्लर पण वाटायचा )इकडची धमाल वाचली आणि परत लहान झाल्यासारखं वाटलं

तर या चषकादरम्यान मी तुमच्यात असणार आहे, नंतरच माहित नाही. पण हे दोन महिने तर नक्की. कारण सध्या खूप ताणात वावरतो आहे
मला तुम्ही सूचना करू शकता, टिप्स देऊ शकता. मी सुद्धा तुम्हाला माझी मत विचारेन, माझे प्लान discuss करेन .
प्रत्येक सामन्याच्या आदल्या दिवशी मी इथे असेन. मला तुमची खरच मदत हवी आहे

पर्वाचा सामना कसाबसा जिंकलो, आपले गोलंदाज कमी पडत आहेत, पण रविवारचा सामना " साहेबांबरोबर " आहे.
मी कोणाला गोलंदाज म्हणून निवडू ?
टोस जिंकण्यासाठी कुठल्या देवाला साकडं घालू ?

प्रश्नच प्रश्न.
मदतीच्या आणि तुमच्या आशीर्वादाच्या अपेक्षेत

---- धोणी

क्रिकेट

प्रतिक्रिया

गणपा's picture

25 Feb 2011 - 2:26 pm | गणपा

इथे वेळ दवडण्या परीस नेटा(त)नं सराव करा. ;)
आशिर्वाद देण्या एवढे म्हारारे नाय आम्ही पण शुभेच्छा मात्र भरगोस आहेत. :)

पर्वाचा सामना कसाबसा जिंकलो, आपले गोलंदाज कमी पडत आहेत, पण रविवारचा सामना " साहेबांबरोबर " आहे.
मी कोणाला गोलंदाज म्हणून निवडू ? >>>

माझ सिलेक्शन होईल का ? फिल्डिंग ;) पण चांगली आहे माझी .

स्पा's picture

25 Feb 2011 - 2:27 pm | स्पा

हा हा हा हा

जरा ब्याटींग सुधारा

आणि त्या श्रीसंत ला आधी हाकलवून लावा

परिकथेतील राजकुमार's picture

25 Feb 2011 - 2:31 pm | परिकथेतील राजकुमार

पैशासाठी नको तर देशासाठी खेळा.
म्हणजे आग्रह नाही, पण बघा जमले तर :)

रमताराम's picture

25 Feb 2011 - 7:32 pm | रमताराम

पैशासाठीच खेळा फक्त त्यातले थोडे आमच्याकडेही येऊ द्या. तुम्हाला जाहिराती मिळतात कारण आम्ही त्या पाहतो म्हणून, खरं ना? मग प्रॉफिट शेअरिंग होऊ द्या की थोडे, कसं म्हंता?

परा, अरे 'सहनौ भुनक्तु...' वगैरे वाचले नाहीस का.

नगरीनिरंजन's picture

25 Feb 2011 - 2:37 pm | नगरीनिरंजन

बरं झालं भेटलात. परवाच ऐकलेला हिंदी ज्योक सांगतो तुम्हाला.

भारतीय क्रिकेट और टॉयलेटमें कुछ भी फर्क नही.
धोनी इधरभी है धोनी उधरभी है.

हा हा हा हा हा हा हा

ननी कहर






५० फक्त's picture

25 Feb 2011 - 2:38 pm | ५० फक्त

तिच्यायला कोणालाबी साहेब म्हणणं सोड्ल्याशिवाय तुम्ही कसें जिंकणार हो, असो चालु घडामोडींवरुन नवा आयडि / डु आयडि घेउन लिहायची पद्धत आवडली.

अवांतर - श्री. मालक, आम्हाला कलमाडी / ए.राजा / निरा राडिया अगदिच गेला बाजार श्री. व सॉ. जोशी / होश्नी मुबारक / अनिल अंबानी असे आयडि मिळतील काय ?

असुर's picture

25 Feb 2011 - 5:49 pm | असुर

कोण साहेब??
साहेब स्वत: आपल्या टीममध्ये असताना कशाला दुसर्‍या कुणाला साहेब म्हणताय राव!!! त्या शेवागला सांगा की उगा पुन्हा साहेबांना आऊट करु नको, नैतर कप जिंकला तरी लोक शेण घालतील तोंडात!!!
आणि त्या गोर्‍यांना हाणा चौफेर, अजिबात कुणाला सोडू नका. रैवारी तुम्ही जिंकलात की मी इकडे हापिसातल्या गोर्‍या मित्रांना हाणायला मोकळा!! :-)

--असुर

अमोल केळकर's picture

25 Feb 2011 - 6:09 pm | अमोल केळकर

धोनी साहेब आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार बंगलोर मधे पाऊस पडत असल्याने वरुण देवालाच साकडे घाला की बाबा अडी अडचणीच्या वेळेला धावून ये. :)

अमोल

तुमचं भविष्य काय म्हंतंय वो केळकरबुवा? पाउस पडनं काय? कप मिळनं काय?

भावड्या, कप जिंकला नाहीस तर याद राख !

'भावड्या, कप जिंकला नाहीस तर याद राख ' - तुझा वरिजन्ल आणि डुप्लिकेट सगळे आयडि भाईर काढिन. समजला काय. मग आपण लई भारी आय्टि लेबर हाय, समदं कळतं आपल्यालाबी, हां ते स्टॅटिकर आणि ड्यान्मिक्ल, हां क्रिप्तिश्ट्क्न आणि डिप्रिक्टिन

आयला पत्रिसाद दिला नाय तिथं म्हणजे काय चिपळुनहुन आलो असं वाट्लं का काय ?