Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गवि on गुरुवार, 02/24/2011 - 19:58
जांभुळ संध्या गडद निळाई.. कुपात बूर्ज्वा मंडूक राही.. वरील काही समजत नाही.. चक्षु मुमुक्षु आर्त प्रवाही.. सुके धुके परि वखवख काही.. वरील काही समजत नाही.. प्रसव वसव किती वेणा साही.. पार्थिव देही गांडीव वाही.. वरील काही समजत नाही.. जूनून बोसा इश्क तबाही.. शब्द घोळ अन काही बाही.. वरील काही समजत नाही..

Submitted by स्पंदना on गुरुवार, 02/24/2011 - 20:05

Permalink

गवी गेले कामातुन. तुम्ही

गवी गेले कामातुन. तुम्ही विमानातच बरे होतात हो! खाली उतरल्या बरोबर जालंदर बाबांनी दिली ना दिक्षा? अवांतरः शब्द बंबाळ काव्य अतिशय सुरेख जमलय.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 02/24/2011 - 20:33

In reply to गवी गेले कामातुन. तुम्ही by स्पंदना

Permalink

हा हा हा!

आयच्यान १००१% वेळा सहमत गं अपर्णा! आता काही खरं नाही गविंचं! आता दिसला शब्द की फिरव चरकातून, दिसला शब्द की फिरव चरकातून.... नुसतं भुस्काट पाडणार हे सुध्दा! अवांतरः शरदिनी, अगं आहेस कुठं? बघ तुला कांपिटिशन आली..आता तुझ्या व्यग्रतेतून थोडा वेळ काढून दर्शन दे भक्तांना. ;) ओ नानबाऽऽ.. ह्या शरदिनीलाही घ्या बरं जरा डोक्यात तिडीक आणणारे मिपाकरमध्ये. :D
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 02/24/2011 - 20:11

Permalink

शरदिनी

शरदिनीबै सारखं एखादं फक्कड नाव तरी घ्यायचं होतं! गगनविहारिणी वगैरे....
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on गुरुवार, 02/24/2011 - 20:16

Permalink

बरेच शब्द खरेच कळत नाहिये

बरेच शब्द खरेच कळत नाहिये ... आता कवीनेच वरील कळत नाहि म्हंटल्यावर .. बिच्चार्‍या वाचकाने गप्पच बसावे .. अवांतर : गगनविहारी यांची कविता म्हंटल्यावर पहिलीच की काय असे वाटुन आता पाहिले, क्लिक करते पर्यंत असे वाटत होते की ... विमान प्रवासावर तर नाहि ना विमानाचे मनोगत : (असेच टाईमपास) जांभुळ संध्या गडद निळाई.. (मस्त शब्द आहेत हे तुमचे ) विमानाची या मस्त सफारी .. कुणा कसे हे समजत नाही हवा निराळी मस्त प्रवाही ढगांचे धुके मस्त लहरी कुणा कसे हे समजत नाही इकडुन तिकडे कीती उडावे इंजीनाचा धुराडा होई कुणा कसे हे समजत नाही बसलेत सारे .. मस्त विमानी धावपट्टीची वेगळीच कहाणी कुणा कसे हे समजत नाही --- गगनविहारींचे विमान
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on गुरुवार, 02/24/2011 - 20:23

In reply to बरेच शब्द खरेच कळत नाहिये by गणेशा

Permalink

ओ हो! गणेशा? विडंबनावर काव्य?

ओ हो! गणेशा? विडंबनावर काव्य? उलटा प्रवास.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 02/24/2011 - 20:42

Permalink

इमान किंवा हवाई अड्डा या पैकी

इमान किंवा हवाई अड्डा या पैकी नक्की काय गंडल ? ;) कॄ.ह.घे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश१११ on गुरुवार, 02/24/2011 - 20:44

Permalink

गगनविहारी -खूप मस्त वाटले

गगनविहारी -खूप मस्त वाटले .छान. खूप जुनी आठवण झाली . लहान होतो.बाबा सरकारी कचेरीत त्यांचे ईंग्रजी अक्षर बघून मी त्यांनीच आणलेल्या कागदाची छान वही करून तसेच काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला काम करणारा रामाने ती वही बघितली .दादाचे कामाचे असेल म्हणून बाजूला ठेऊ लागला मला मोठी गमत वाटली हमभी कुछ कामके आपले वाचून जुनी आठवण चालवली. मजा आली. आपण मात्र खूप छान लिहिले. वाटले. जुन्या आथ्व्निबद्दल खूप खूप आभार
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Fri, 02/25/2011 - 01:51

Permalink

शरदीनीतैंना घेउन गेल्ता का

शरदीनीतैंना घेउन गेल्ता का काय इमानातुन फिरवायला?
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Fri, 02/25/2011 - 11:09

Permalink

सुरेख शब्दखेळ ... शब्दकळा

सुरेख शब्दखेळ ... शब्दकळा !!! ..... कविता थोडीफार समजते आहे असे वाटते . क्रमशः आहे का ?
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2712 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com