Skip to main content

पुणे मुम्बई दोन तासात सायकलव..........

लेखक मनराव
शुक्रवार, 18/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
विनोद पुनामिया या इसमाने...........अवघ्या दोन तासात सायकलीव पुणे डोंबिवली अंतर कापलं अन लिमका वाल्यांनी लगेच नोंदणी करून घेतली............ द्ख्खनच्या राणी पेक्शा हि कमी वेळात साहेबांनी डोंबिवली गाठलं.......... अता दिल्ली मुम्बई ३० तासात कारायचा मानस हाय यांचा.......... अधिक तपशील या दुव्यावर...... पुणे मुम्बई दोन तासात सायकलव..........

वाचने 3316
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

त्यांचे अभिनंदन. त्यांनी या मार्गावर बर्‍याच शर्यती जिंकलेल्या आहेत. बाकी इंग्रजांनी मुंबई ठाणे रेल्वे ज्या वेळात चालवली तोच वेळ आजही आहे.

काय भारीमाणुस आहे ! कौतुकास्पद! (नाहितर मी, स्कुटी चालवता येते तरीही अजुन सायकल नाही चालवता येत :( )

जबरदस्त म्हणावे लागेल .. कारण मला बाईकवर पण वाशी-निगडी येव्हडे अंतर पार करायला २ तास लागतात. विचार करतोय .. कसे शक्य असेल सायकल वर २ तासात ?

लेखणात काही चुक आहे का ? मी णाशिक फाटा ते वाशी हे अंतर बाईक वर सुमारे दिड तासात गाठले होते. त्यामुळे २ तासात सायकल वर हे अंतर पार करणे अशक्य आहे ... अगदी सायकल ला १५० सीसी चे इंजिन बसवले तरी !!

In reply to by टारझन

टार्‍या पेपरातली बातमी बघून मला पण शंका वाटली होती.. पण त्यापुढे असेही लिहिले आहे की विनोद पुनामिया रोज ५०० अंतर सायकलवरून पार करतात आणि तेही सराव म्हणून..

In reply to by पिंगू

सायकलचा टॉप स्पीड जर १३०-१५० किमी ताशी जात असेल तर शक्य आहे. बाकी काही म्हणने नाही. सायकल ५-६ लाखा दरम्यानची असावी :) मस्त आहे

In reply to by टारझन

सायकलचा टॉप स्पीड जर १३०-१५० किमी ताशी जात असेल तर शक्य आहे. बाकी काही म्हणने नाही. फक्त सायकलने जात असल्याने पुणे-मुंबई रस्ता घेण्याऐवजी आजूबाजूच्या रस्त्याने शॉर्टकट घेतला आणि घाट उतरत असल्यामुळे थोडेफार शक्य होईल. तरी देखील जरा जास्तच वाटत आहे. तरी देखील एकूणच प्रकल्प छान आहे. जर टोप्या न घालता होत असला तर इतरांनी किमान सायकल चालवायची प्रेरणा घेयला हरकत नाही. :-) बाकी पुणे-डोंबिवली अंतर कापण्याची बातमी ३ वर्षांपुर्वीची आहे.

In reply to by विकास

गडबड वाटतेय बातमीत.

त्याना नक्की ठाणे म्हणायचे आहे का पुणे? ठाणे - डोंबिवली शक्य आहे बहुदा. असो सायकल छान असणार त्यांची. येकदम विम्पोरटेड!

Three years ago, at the age of 50, Punamiya, who hails from Dombivli, shocked the nation and registered his name in the Limca Book of Records when he cycled from Pune to Dombivli (distance of 140 km) in just two hours, 14 minutes, 14 seconds ” 20 minutes faster than the Deccan Queen train.
१४० कि.मी. अंतर २ तास १४ मिनिटांत म्हणजे ताशी ७० कि.मी. ने सायकल पळवली! अवघड वाटत असलं तरी 'शक्य' असावं.

अविश्वसनीय. चित्रात दाखवलेल्या साकलवर हा वेग मिळवणे अवघड वाटत आहे. त्यात खड्डे, रहदारी, सिग्नल फिग्नल इ. आलंच, शिवाय सतत ७० किमीप्रतितासने सायकल चालवणेही अवघड आहे. वर्ल्ड रेकॉर्डची लिस्ट इथे आहे, पण ह्या साकली एअरोडायनॅमीकली डिझाईन्ड असतात आणि अत्यंत हलक्या पण मजबुत धातुंनी बनवलेल्या असतात. वर्ल्डरेकॉर्ड ज्याच्या नावाने आहे त्याने काही मीटर ते १-२ कीमी इतक्या अंतराचे रेकॉर्ड केले आहेत. पुन्मियांचा रेकॉर्ड खरा असेल तर फुटकळ लिम्कापेक्षा गिनिज मध्ये नाव द्यावे, कुणीतरी त्यांचा एखादा व्हिडिओ सुद्धा घ्यावा.

प्रथमदर्शनी २ तास ही वेळ अतिशयोक्त कमी वाटते आहे. पण टेक्निकली शक्य आहे. पुणे ते मुंबई कदाचित तांत्रिक मुद्द्यावर मान्य करता येईल. (एक्सप्रेसवेने परवानगी मिळाल्यास) पण दिल्ली ते मुंबई २६ तासात मात्र अशक्य वाटते. कारण हाच (पुणे - मुंबई) २ तासांचा परफॉर्मन्स सलग २४+ तास राखण्याची शारिरीक मर्यादा काहीतरी असणारच. आधी या व्यक्तीने ४ दिवसात दिल्ली-मुंबई प्रवास केला आहे असा उल्लेख लेखात दिसतो. तेही कौतुकास्पदच आहे. पण ४ दिवसांवरुन एकदम एक दिवसावर येणे अगदी अशक्य वाटते. (सकाळी ७ ला दिल्लीतून निघून दुसर्‍यादिवशी दुपारी १ पर्यंत मुंबई..!!) त्यातही सकाळी ७ दिल्ली-- सकाळी ११ला जयपूर )२७०+किमी--संध्याकाळी ६ ला थेट अहमदाबाद (२७०+ ~७०० किमी) वगैरे हा हिशोब म्हणजे एकदम लिनीअर लॉजिक वाटले. पण तरीही ५३ वर्षे वयात हे प्रयत्न अफाट आहेतच आणि त्यासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा आहेतच. फक्त अतिशयोक्त अचाट दावे करुन अ‍ॅडव्हान्समधे प्रसिद्धी आणि मग विसरले जाणे अशा मोहात या व्यक्तीने पडू नये.

हाहाहा! हसुन हसुन डोळ्यातुन पाणी आलं. विनोदला दाखवायला हवा हा धागा भेटेल तेव्हा.