पाव भाजी

गणपा's picture
गणपा in पाककृती
2 Feb 2011 - 6:10 pm

आपल्या कडे पाव-भाजी न आवडणारा विरळाच असावा. भाज्यांच्या नावे बोटं मोडणारी चिल्ली-पिल्ली पाव भाजीचं ताट समोर आल तर यथेच्छ ताव मारतात असा आज वरचा अनुभव आहे.

सध्या इथे केक खाउन-खाउन तोंड आल असेल म्हणुन पाव भाजी टाकायची गुस्ताखी करतोय.

साहित्यः
२-३ मध्यम आकाराचे कांदे. (बारीक चिरुन.)
२ मध्यम आकाराच्या भोपळी/सिमला मिरच्या (बारीक चिरुन.)
२-४ टॉमेटो. (बारीक चिरुन.)
४ मध्यम बटाटे (उकडलेले.)
१ वाटी मटार (उकडलेले.)
२५० ग्रॅम फ्लॉवर (उकडलेला.)

१-२ चमचे आलं-लसुण पेस्ट.
लाल तिखटं. मीठं चवी नुसार.
पावभाजीचा मसाला. (मी शक्यतो बादशाहचा वापरतो. तो नसल्यास एव्हरेस्टचा. (ही या कंपन्यांची जाहीरात नव्हे :) ) )
बटर/लोणी.
पाव.
कृती:

उकडलेले बटाटे, फ्लॉवर, मटार मॅशरने कुस्करुन घ्यावे.

एका कढईत थोड तेल / बटर टाकुन कापलेला कांदा चांगला पारदर्षक होईस्तव परतुन घ्यावा.

थोड्या वेळाने त्यात बारीक चिरलेली भोपळी मिरची आणि आल-लसुण पेस्ट टाकुन परत चांगल परतुन घ्याव.

नंतर त्यात लाल-तिखट, पाव भाजीचा मसाला आणि टॉमेटो टाकुन परताव. मसाला टाकल्यावर तो लगेच खाली लागण्याची शक्यता असते. अश्यावेळी टॉमेटोचा सुटलेला रस मसाला खाली लागण्या पासुन बचाव करतो. पाणी शक्यतो टाकु नये.

तयार मिश्रण बाजुने तेल सोडु लागल की त्यात वरचे एकत्र केलेले उकडलेले जिन्नस टाकावे.

साधारण एक वाफ काढावी. भाजी एकजीव केल्यावर थोड्या वेळाने मग वाटल्यास थोडं पाणी घालुन भाजीची घनता आवश्यकते नुसार कमी करावी. चवी नुसार मीठ टाकाव.

पाव मधोमध चिरुन तव्यावर लोण्यात शेकुन घ्यावे. आवडत असल्यास तव्यावर बटर मध्ये अर्धी चिमुट पाव भाजीचा मसाला टाकुन त्यात पाव शेकुन घ्यावे.
वरुन कच्चा कांदा, कोथिंबीर आणि लोण्याचा गोळा (तब्येतीला मानवत असल्यास, चिज) टाकुन गरमागरम पावा सोबत वाढावे.

प्रतिक्रिया

आत्ता ही पाकृ फोटोंसकट का टाकलीस रे? :(

ब्रिटिश टिंग्या's picture

3 Feb 2011 - 9:42 am | ब्रिटिश टिंग्या

यशो, आपण आपल्या डलफात खादाडी करु. धम्मुसला बोलावुन घेतो मी! :)

तू मेल्या नुसत्या थापाच मार! डलफात असतोस का तू? की जातोस हिंडायला?

धमाल मुलगा's picture

3 Feb 2011 - 4:32 pm | धमाल मुलगा

हापिसात अडिकलोय की बे आज.

चला, गनाच्या पावभाजीमुळे आज 'अमुल'ची पावभाजी खाऊन दिस साजरा करतो.

मेघवेडा's picture

2 Feb 2011 - 6:17 pm | मेघवेडा

गना धाव रे.. मना पाव रे!!

वीकेंडचा मेन्यु फ़िक्स!!

असुर's picture

2 Feb 2011 - 8:12 pm | असुर

वीकेंडचा मेन्यु फ़िक्स!!
बरं झालं! आता हेच आमंत्रण स्विकारुन या विकान्ताला आपले घरी येण्याचे करतो. मला पाव जास्त भाजलेले आवडत नाहीत, तरी बटर लावून नुसते गरम करण्याचे करावे. :-)
या विकान्ताची सोय झाली! ;-)

घ्या!! यांच आपलं भलतंच काही!! ;)
मेव्या.. अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस रे!! मी येईन खायला... !!

प्राजुतै, अगं भलतं सलतं काही नाही, आणि मेव्याला काय वाईट वाटायचंय!! मेव्या हा अतिशय उत्कृष्ट बल्लव आहे. त्याच्या हातचं खाऊनही मी अजून जिवंत आहे हा याचा ठोस पुरावा!!! =)) =))
आणि मेव्याकडे जाणंसुद्धा अवघड नाहीये मुळीच. एक उडी मारुन केंटात उतरलं की झालं काम! ;-)
बाकी, तू सुद्धा ये या विकान्ताला! मेव्या, तुझी पापुल्या रिटी वाढतीये रे!!! =)) =))

--असुर

रेवती's picture

2 Feb 2011 - 10:01 pm | रेवती

ए, या चर्चा खरडवहीत करा.
आमच्या जिभेला त्रास होतो.;)

मेघवेडा's picture

2 Feb 2011 - 10:35 pm | मेघवेडा

असुर्‍या तू पाव घेऊन ये रे. प्राजु तू भाजी घेऊन ये. रेवतीतै तू कांदा, कोथिंबीर, लिंबं, बटर वगैरे घेऊन ये. आपण मस्त हादडूया सगळे मिळून.

टीप : आपापल्या ताटल्या, वाट्या, मडकी, घागरी काय त्या आपल्या आपण आणाव्या. तसेच हे सगळं घासायला विमबार, फेअरी काय हवं ते आपलं आपण आणावं. आमच्याकडे फक्त पाणी मिळेल.

अस्सं काय! तू भेट तर खरा....;)

प्राजु's picture

3 Feb 2011 - 12:15 am | प्राजु

हरकत नाही आम्ही घेऊन येऊ सगळे... आणि तुला न देता तुझ्या घरात बसून खाऊ..! चालेल. काय रे असुर्‍या?? ;)

धमाल मुलगा's picture

3 Feb 2011 - 4:32 pm | धमाल मुलगा

प्राजुताई,
मी काय म्हणतो, निदान ह्या प्रतिसादात तरी '(सर्वचापी) प्राजक्ता' अशी सुधारणा नक्की करता येऊ शकते. :P

मेव्या, रड्या लेकाचा!
एरवी इतका ऐकवतोस काय काय मग खरंच पाव-भाजी करायची वेळ आली तर लगेच शेपूट काय??
या विकान्ताला मी, प्राजुतै, रेवतीतै(काकू, आज्जी..)येतोच आहोत! ते पावभाजी करायचं बघा! आणि नाही जमली नीट तर तापल्या तव्याने चटके देईन तुला!!!

प्राजुतै, मेव्याचे असले लाड करुन उपयोग नाही! वेळच्यावेळी धाक दाखवलाच पाहीजे. पण, तू मेव्याकडे पावभाजी बनवणार असलीस तरी चालेल मला. =)) =))

--असुर

मेघवेडा's picture

3 Feb 2011 - 5:12 pm | मेघवेडा

** प्रतिसाद संपादित **

मी काही एक मदत करणार नाही हां!
माझं वय झालं आता, नाही कारे असूर?

परिकथेतील राजकुमार's picture

2 Feb 2011 - 6:18 pm | परिकथेतील राजकुमार

गणपा अरे एका ठिकाणी छळ की !

मिपाचा पाकृ विभाग म्हणजे छळ छावणी झाला आहे.

स्पा's picture

2 Feb 2011 - 9:57 pm | स्पा

गणपा शेठ,,,,,

__/\__

आम्हाला त्रास देणं बंद करा

कच्ची कैरी's picture

2 Feb 2011 - 6:24 pm | कच्ची कैरी

आताच खावीशी वाटतेय्,एकदम फूल टू फट्याक!!!!!!!!!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 Feb 2011 - 6:26 pm | निनाद मुक्काम प...

फोटो सहित पाव भाजी एकदम
मुंबईतील खाऊ गल्ली / जुहू चौपाटी व सी एस टी समोरील केनोन च्या पाव भाजीची आठवण झाली .
जीव नुसता घायकुतीला आला आहे हा फोटो पाहून
''कुठे फेडशील हि पाप ''
बाकी पाककृती पाहून घरात करायला हरकत नाही .असे वाटते .
दाबेलीची मिळेल का पाककृती ?
त्यावरील डाळींब घातलेली तूप किंवा बटर मधील दाबेली
तोंडाला पाणी सुटले हि पावभाजी व( दाबेलीची आठवण झाल्याने )

पिवळा डांबिस's picture

2 Feb 2011 - 11:56 pm | पिवळा डांबिस

फोटो मस्त आले आहेत!!!
आणि हो, आमच्याही मते बादशाह मसाला विन्स ओव्हर एव्हरेस्ट!!
:)
सी एस टी समोरील केनोन च्या पाव भाजीची आठवण झाली .
मलाही अगदी तीच आठवण झाली.
कॅननच्या पावभाजीचा विशेष म्हणजे तिथे चिरलेला कांदा न देता अख्खा कोवळा कांदा देत असत...
आमच्या कॉलेजापासून जवळ्च असल्याने तिथे अनेकदा जाणं होत असे. त्यामुळे थोडीफार ओळखही झाली होती!
तिचा फायदा म्हणजे आमच्या भाजीत जरा एक्स्ट्रा बटर पडत असे. त्यात आणि बटरने माखलेले पाव!!!
वल्ला!! जवाब नही!!!
:)

विंजिनेर's picture

3 Feb 2011 - 5:47 am | विंजिनेर

दाबेलीची मिळेल का पाककृती ?
त्यावरील डाळींब घातलेली तूप किंवा बटर मधील दाबेली
तोंडाला पाणी सुटले हि पावभाजी व( दाबेलीची आठवण झाल्याने )

परवाच केली होती दाबेली निनादराव! अगदी डाळिंबाचे दाणे वगैरे घालून, बटर मधे गरम केलेले पावासकट. वेड झाली होती - फटु वगैरे भानगडीतच पडलो नाही - सरळ आडवा हात मारला.
इकडे या तुम्ही. खाऊ घालतो तुम्हाला. हा का ना का.

मैत्र's picture

3 Feb 2011 - 9:39 am | मैत्र

विंजिनेर / गणपा... कोणीही टाका ... पण जरूर लिहा... थोडा त्रास होईल पण सहन करु....

पुणे मुंबई करांनी पाव भाजी चे फोटो पाहून त्रास करण्याचे कारण नाही.. त्यांना पर्याय तरी असतात...
बंगळूर हैदराबाद, चेन्नई आणि कुठल्या तरी कोपर्‍यात जगात असलेल्यांना त्रास होतो...

अतिशय उत्तम पाककृती गणपा... बेश्ट !! धन्यवाद !!

भानस ताईंनी दिलेली. कच्छी दाबेली

ही कच्छी दाबेली भन्नाट होते. मी पाहिली होती करून. मस्तच!!

नरेशकुमार's picture

2 Feb 2011 - 6:36 pm | नरेशकुमार

कातील तेरी पावभाजी..........

जगदंब जगदंब ... आम्ही आमच्या प्रिय चिकन वरही पाणी सोडलंय हल्ली ... चमचमीत खाणे वर्ज्य आहे .. त्यामुळे पाकृ पाहुन अंमळ कससंच झालं ..
जळजळ कमी करण्यासाठी , आम्ही गणपतीत एकदा सारसबागेतल्या एका पावभाजी वाल्याने ओढुन बळजबरी पावभाजी खाऊ घातली होती .. त्या पावभाजीची चव आठवल्यावर अजुनही आमची भुक आटते :)

- खावभाड

झकास !
आजपासून ७ दिवस डाएट पाळले गेले तर बक्षिस म्हणुन ही डिश पक्की !

मुलूखावेगळी's picture

2 Feb 2011 - 6:58 pm | मुलूखावेगळी

वा मस्त आहे पाव भाजी :)
माझी फेव डिश आहे

डावखुरा's picture

2 Feb 2011 - 7:17 pm | डावखुरा

वर्मावर बोट ठेवले... आता निघतोय खायला...

अवांतरः दुबईत माझे लई भाईलोक ओळखीचे आहेत लगेच सुपारी देतोय मी.....

रेवती's picture

4 Feb 2011 - 4:28 am | रेवती

खी खी खी.

शुचि's picture

2 Feb 2011 - 8:08 pm | शुचि

वा! हे मस्त काम झालं.

गणपा, दुष्टा, कुफेहेपा??? किती छळ!!! भल्याची दुनियाच राहीली नाही आता!!!

फक्त पाकृ विदाऊट एनी आमंत्रण इज अ मेजर फौल गणपाषेट! तुमच्यासारख्या ज्येष्ठ बल्लवाने अशा क्षुल्लक चुका कराव्यात हे पाहून घैवरुन आले!

"यापुढे मिपावरील या बल्लवावर पाकृमध्ये फटू टाकण्यावर बंदी घालावी" असा एका ओळीचा प्रस्ताव मी मिपाकरांपुढे मांडू इच्छितो.

--असुर

गणपा किती त्रास देशील?
फोटू छान आलेत.
तुझ्या शत्रूसंख्येत वाढ झालीये का रे?;)

स्वाती दिनेश's picture

2 Feb 2011 - 8:45 pm | स्वाती दिनेश

फोटू सॉल्लिड आहे, आता केली पाहिजे पावभाजी...बरी आठवण करुन दिलीस, बरेच दिवसात झाली नाहीये...
स्वाती

प्रचेतस's picture

2 Feb 2011 - 10:28 pm | प्रचेतस

घरी केली होती. आधी खाल्ली. मगच तुझी पोस्ट वाचली. तुझी कृती अंमळ सरसच. :)

दीविरा's picture

2 Feb 2011 - 11:31 pm | दीविरा

छान फोटो !!

पाव अगदी बोलवत आहेत मला.

लवकरात लवकर खावीच लागेल :)

मस्तानी's picture

2 Feb 2011 - 11:40 pm | मस्तानी

मी पण अगदी अस्शीच करते हे वाक्य गणपा यांच्या पाक्रु वरील प्रतिक्रियेत लिहिता आल्याने आज मी धन्य झाले !

सखी's picture

3 Feb 2011 - 1:31 am | सखी

फोटु अगदीच जीवघेणे आहेत. आता केलीच पाहीजे, त्याशिवाय चैन नाही. यावेळेस एवरेस्टला सुट्टी देऊन बादशहा ट्राय करुन बघेन.

नंदन's picture

3 Feb 2011 - 1:43 am | नंदन

पाकृ बेश्टच, पण शेवटचा फोटो तर अगदीच जीवघेणा. आता सरदार, कॅनन ह्या तीर्थक्षेत्रांची आठवण मनात जागी झाली :)

सन्जोप राव's picture

3 Feb 2011 - 4:48 am | सन्जोप राव

ला इलाह इल्लिल्ला, महंमद इलाहि रसुलिल्ला!
टु घी ऑर नॉट टु घी?

जबर्‍या, हे आपल्याला जमेल असं वाट्टंय. थोडी टेस्ट करुन बघता आली असती तर काय बहार आली असती. कुठे गेले ते मिपाचे एडमिन्स? करा की अशी काहीतरी सोय.

विंजिनेर's picture

3 Feb 2011 - 5:49 am | विंजिनेर

गणपुल्या मस्त फटु. आमचे येथे ए-१ पावभाजी होते. साहित्य + प्लान तयार आहेच. त्यामुळे फार जळजळ झाली नाही :)

सहज's picture

3 Feb 2011 - 6:47 am | सहज

सहीच..

फोटो उत्तम आहेतच, प्रत्येक स्टेपला फुल मार्कस, तयारीतील कौशल्य, पुढे मसाला न लागण्याकरता टोमॅटॉ बरोबर एकत्र टाकायची टीप दिलीस.. एखाद्या शिक्षकाने, हे पहा उत्तरपत्रीका अशी हवी म्हणून एका हुशार विद्यार्थ्याचा पेपर वर्गातील इतरांना दाखवावा तशी ही आदर्श पाकृ....

बाकी पावभाजी उत्तम होण्याकरता (पक्षी: विकतच्या पावभाजीसारखी टेस्ट येण्यासाठी) दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी म्हणजे पावभाजी मसाला व बटर. कुठला पावभाजी मसाला दिलास ते उत्तम केलेस कारण बाजारात बरेच प्रकारचे पावभाजी मसाले मिळतात व फार थोड्यांना तशी टिपीकल पावभाजी टेस्ट येते. बिलिव्ह मी फक्त कांदा, बटाटा, टोमॅटो व उत्तम पावभाजी मसाला व बटर असले तरी उत्तम भाजी होते. फ्लॉवर, भोंगी मिर्ची, मटर इ घातले नाही तरी काही बिघडत नाही.

किती पावभाजी मसाला व बटर त्याचे प्रमाण दिले असतेस तर द परफेक्ट पाककृती म्हणालो असतो....

आजानुकर्ण's picture

3 Feb 2011 - 9:29 am | आजानुकर्ण

क्या बात है गणपाशेठ. लई भारी.

शिल्पा ब's picture

3 Feb 2011 - 10:28 am | शिल्पा ब

मेल्या!!!

निनाद's picture

3 Feb 2011 - 10:56 am | निनाद

आताच करावीशी वाटतेय! :)

धागा वाचला नाही. फटु पाहिला नाही.

धन्यवाद

प्यारे१'s picture

3 Feb 2011 - 11:19 am | प्यारे१

अगदी असेच.

छळ मांडियेला मिपावरी भाई ।

गाळती बादलीभर लाळ रे ॥

ठ्ठल, ठ्ठल, ठ्ठल,.....

इन्द्र्राज पवार's picture

3 Feb 2011 - 11:42 am | इन्द्र्राज पवार

पु.ल.देशपांडे यांच्या एका सुंदर लेखाचे नाव आहे "माझे खाद्यजीवन". त्यातील खाण्याच्या विविध पदार्थांचे जिभेला पाणी सुटायला लावणारे चमचमीत वर्णन वाचून सीमेवर दक्ष घालत असलेल्या एका सैनिकाने [जो काहीशा निराशेपोटी आत्महत्या करण्याच्या बेतात होता...] पु.लं.न लिहिले, "छे, छे....निदान तुमच्या वर्णनातील हे सर्व पदार्थ खाण्यासाठी तरी मला जगलेच पाहिजे...."

आज श्री.गणपा यांच्या पाककृती [पु.ल. फोटोज् देवू शकले नव्हते...त्या काळात ते शक्यही नव्हते] पाहून एखाद्याच्या मनात निराशा दाटली असेल तर तिचे मळभ क्षणार्धात दूर होईल, असा विश्वास वाटतो. ' गणपांची ही विविध व्यंजने खाऊन निराशा चुटदिशी पळून जाईल...'

सिम्पली वंडरफुल....पावभाजी....न खाताही चव जिभेवर रेंगाळली आहे.

इन्द्रा

sneharani's picture

3 Feb 2011 - 11:54 am | sneharani

पाकृ. अन् फोटो ही अगदी सुरेख!
:)

महेश काळे's picture

3 Feb 2011 - 12:16 pm | महेश काळे

एकच नंबर ..

माझी आवडती डिश आहे.फोटो सु॑दर आला आहे.

च्यायला या माणसानं पदार्थ कढईत घालताना पण कलाकुसर केलीय !!
मानलं तुम्हाला गणुजी !

वहिनी's picture

3 Feb 2011 - 10:45 pm | वहिनी

वा वा वा?

सखी's picture

3 Feb 2011 - 10:48 pm | सखी

गणपा २-३ शंका आहेत, त्याचे निरसन झाल्यास आभारी राहील.

  1. भाज्या ज्या उकडल्या आहेत - मटार, फ्लॉवर - त्या कुकरमधे उकडल्या का? कारण मटार कुस्करल्यावर अगदी बारीक झालेले दिसतात.
  2. बटर साधारण किती वापरावे, माझी एक मैत्रिण चांगली पावभाजी करायची, पण प्रत्येक भाजी परतल्यानंतर २ चमचे बटर बाजुने टाकायची. मला नक्की कळत इतक्या बटरची गरज असते काय?
  3. बटर शक्यतो अमूलचेच वापरावे का? मी इथे जे बिनामिठाचे (unsalted) मिळते ते वापरते पण अमूलने फरक पडत असेन तर ते इंडियन दुकानात मिळेल.
गणपा's picture

4 Feb 2011 - 12:42 am | गणपा

1.हो सगळ्या कुकरला ३ शिट्ट्या लावुन उकडल्या आहेत. (बटाट्यांसाठी मी ३ शिट्ट्याच घेतो.) मटार आणि फ्लॉवरसाठी परत वेगळा कुकर कोण लावणार. :)

2. एवढ्या बटर ची गरज नसते. तब्येतीला मानवणार असेल तर हरकत नाही. मी सुरवतीलाच भाज्या परत्तताना एकदा टाकतो आणि झाल्यावर १ चमचा वरुन. वाढताना परत १/२ चमचा पुरेसा आहे.

3. मला तर अमुलची चव फार आवडते. पण इकडे मिळत नाही. पण अन-सॉल्टेड पेक्षा नॉर्मल (सॉल्टेड) बटरच वापरण करतो. त्याची एक वेगळीच चव येते.

गणपाजी , आंगठा देणार नाही पण तुम्हाला गुरु केलं आजपासुन.

पुणेकर मिपावाले, करायचा का पावभाजीचा बेत , माझ्याकडुन खुलं आमंत्रण आहे, फक्त जरा मदतीला यावं लागेल. आपण पण असेच फोटो टाकुन ज़ळवु सगळ्यांना.

पावभाजी या एकाच पदार्थाने आजपर्यंत कमीत कमी तुटायची भिती असणारे १०-१२ मित्र परत मि़ळ्वलेत मी.

हर्षद.

संदीप चित्रे's picture

3 Feb 2011 - 11:37 pm | संदीप चित्रे

कार्टं त्रास द्यायला तयारच असतं :)

विजुभाऊ's picture

3 Feb 2011 - 11:53 pm | विजुभाऊ

ए गणपा ..... तू लेका मिपावरच्या लेकीसुनाना बिघडवतोय्स,
तो नरेशकुमार देखील बिघडलाय तुझ्यामुळे.

५० फक्त's picture

4 Feb 2011 - 12:30 am | ५० फक्त

+१ टु विजुभाउ आणि या दोघांमुळे पुण्यात बटाट्याचे भाव पण वाढलेत असे आत्ताच मा. क्रुषिमंत्र्यांनी सांगितलं आहे मुलाखतीत.

हर्षद.

गणपा's picture

4 Feb 2011 - 12:43 am | गणपा

सगळ्या रसिक खवय्यांचे/वाचकांचे खुप खुप आभार. :)

दिपाली पाटिल's picture

4 Feb 2011 - 1:16 am | दिपाली पाटिल

मस्तच गणपाभौ...मिपावर ब्लॉगसारखे अवॉर्ड्स नसतात नाहीतर आत्तापर्यंत ४-५ नक्की मिळाले असते.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Feb 2011 - 11:57 am | llपुण्याचे पेशवेll

गणपा,
पावभाजीत फ्लॉवर घातला तर तो मसाल्याचा वास मारत तर नाही ना. मागे एकदा पावभाजीत असाच उकडलेला फ्लॉवर टाकला तर भाजीचा घमघमाटच सुटेना. मग तशीच सपक वाटणारी भाजी खाल्ली .

पाव भाजीच्या घमघमटा बद्दल म्हणशील तर ते बरचस मसाल्यावर अवलंबुन आहे. पाव भाजीत बादशहाचा मसाला सर्वोत्तम, असा आज वरचा अनुभव आहे. तुझा गत अनुभव लक्षात घेता फ्लॉवरच प्रमाण थोड कमी केलस तरी चालेल. बरेच जणांना फ्लॉवरचा उग्र वास आवडत नाही.
मी फ्लॉवर नसलेली पाव पावभाजी ही खाल्ली आहे. पण मला तरी व्यक्तीशः थोडा फ्लॉवरचा फ्लेवर आवडतो :)

आचारी's picture

20 Feb 2011 - 6:50 pm | आचारी

गणपा अरे यार पाव भाजी मसाल्याची पा क्रु पण दिली असतीस तर अजुन बरे झाले असते

असंका's picture

13 Aug 2014 - 6:00 pm | असंका

७० लोकांसाठी पावभाजी करायला बटाटे, कांदे, टमाटे, मटार, फ्लॉवर, किती किलो घ्यावे लागतील?