>>अवांतर: पतंगाच्या मांज्यामुळे जखमी झालेल्या रक्तबंबाळ पक्षांचे होर्डींग सुरतमध्ये पाहिले होते. Sad
हेच म्हणतो...एवढया प्रमाणात पतंग उडवल्यावर जखमी पक्ष्यांच काय??? त्यांच्या साठी काही उपाय्योजना असतात की नाही??? मुम्बैत तरी अशा संस्था आहेत. तेथे असतात की नाही???
आम्हीही दर वर्षी संक्रांतीला नंदूरबारलाच (महाराष्ट्र-गुजरात सीमेवर)असतो तिथेही संक्रांत खूपच उत्साहाने साजरा करतात सकाळी ६ ते ७ वाजल्यापासुनच सगळे गच्चीवर असतात खूपच मजा येते .यावर्षीही खूप मजा केली ,हात कापले गेले होते मांज्याने
मस्त हो विजुभाऊ :)
गुजराती संस्कृतीचा हा पैलू देखील लै झकास. आमचे विजुभाऊ नुसते गुजराती खाद्य संस्कृतीचेच नाही तर पतंगोत्सवाचे देखील किती छान वर्णन करु शकतात बघा. उगाच ताईत नाहीत ते मिपाच्या गळ्यातले.
Only Some Massages Have Happy Endings ...
आसारी
बास बास हाच शब्द चक्री, फिरकी च्या ऐवजी आपल्याकडे वापरतात.
या वर्षी जयपूरला होतो संक्रांतीला. तिथेही पब्लिक दुर्वा आणल्यासारख्या पतंगांच्या २०-२० च्या ५-६ जुड्या घेऊन येतं. १०-१० आसार्या असा सगळा थाट असतो. आपला पतंग उडवण्यापेक्षा दुसर्याचा काटण्यातच रस जास्त (सगळे शूरवीर पराक्रमी शक्तीशाली रजपूत इतके वर्ष मुसलमानी अंमलाखाली कसे काय राहीले याचे थोडेसे उत्तर मिळाल्यासारखे वाटले.) असतो. पतंग काटला की काSSSSSSटो करून जोरात ओरडतात. सकाळी १० ते सायं ५ या पिक टाईम मधे शहरात प्रत्येक मिनीटाला १०० तरी पतंग कापले जात असतील. गुल होऊन आलेला पतंग, मांजा लुटायचा आणि त्याला आपला मांजा बांधून तोच परत वर चढवायचा इतकाच उपक्रम हौशीनी करणारे "लुटेरे" देखील असतात. दिवसभर गच्चीतच खाणे पिणे चालते. वालाच्या डाळीची भजी हौशीनी खाल्ली जातात. मिठाया, गज़क(तिळ, गूळ इ. वापरून केलेला तिळगूळाचा आतेभाऊ) अगदी भजी देखील किलोच्या मापात विकत आणतात. हौशी लोक लाऊड स्पीकरवर गाणी लावून गच्चीत पतंगनृत्य करत असतात. (गणपतीतलं नाचणं बघितलेल्या पतंगनृत्य म्हणजे काय ते वेगळं समजवायला नको). आख्खे कांदे, बटाटे व पनीर घातलेली एक तिखट भाजी केली जाते. त्याबरोबर हरभरा, बाजरी अशा मिश्र पीठाचे तूपमाखले रोट रात्री खायचे.
थोडक्यात काय मज्जा मज्जा असते. विजुभौंमुळे त्या सुंदर आठवणींना उजाळा मिळाला.
मस्त वाटलं हो विजुभौ तुमचा हा धागा पाहुन.
अगदी ५ ते १० पैश्यांन्या पतंग विकत घेतल्याच आठवतय.
बचपन के दिन भी क्या दिन थे. :)
आवांतर : तिरंग्याचा पतंग दिसायला छान असला तरी आवडला नाही. या पतंगाची अवस्था नंतर काय होते ते आपण सर्व जाणतोच.
लंपनच्या फाटकसाहेबाची आठवण झाली.
वा विजूभाऊ ,सुंदर लेख .
उत्तरोत्तर तुमची कंपनी तुम्हाला अशीच ठिकठिकाणी पाठवू देत आणि आम्हाला असेच छान लेख वाचायला मिळू देत अशी जगन्नियत्याच्या चरणी प्रार्थना.
तुम्ही मिपाचे राघोभरारी.
ही प्रतिक्रीया माझी स्वतःची असल्याचे सत्यकथन मी करीत आहे.
सही!
माझा एक चुलत भाऊ गिरगावात राहायचा. तिथे लहानपणी मकर संक्रांतीच्या निमित्ताने एकदाच जाणं झालेलं पण ती मजा अजून आठवतेय... इथे तर त्याच्या तिप्पट जल्लोश आहे!
शेअर केल्याबद्धल धन्यवाद विजूभाऊ!
विजुभाऊ,
लेख आणि छायाचित्रे आवडली. मस्त!
'मुकुंद' कंपनीत काम करताना संक्रांतीच्या दिवशी आमचे बरेच गुज्जूभाई सहकारी या कारणास्तव अदृश्य व्हायचे व इतरांना (जास्त काम पडल्याने) त्यांची 'आर्ततेने' आठवण व्हायची!
आणखी गुजरात-परिचय येऊ दे.
सध्या उज्जैनमध्ये आहे तिथेही काल जाम माहोल होता. मी स्वतः जवळपास १० पतंग उडवले. १० च्या १० ही काटले गेले आणि तेवढेच मिळाले. ;)
करोना काळात तेवढाच विरंगुळा असल्यामुळे व घराच्या गच्चीवरुन ह्या सार्वजनिक खेळात भाग घेता येत असल्यामुळे असेल ह्यावेळी एकुण धिंगाणा वगैरे अमळ जास्तच वाटला.
व्वा, झकास रिपोर्ताज, विजूभाऊ !
कोणताही प्रचि गायब झाले नाही याचे कौतुक वाटले. फ्लिकर बरंच विश्वासार्ह दिसतंय !
दोन वर्षांपुर्वी पतंगोत्सव आणी उत्तरायचा अनुभव अमदावादेत ( हे स्थानिक नाव, उदा. बेटावद, कलावद, कसरावद ई. सारखे. यातील वद हा प्रत्यय वाडी... वाड ... वाड ... वद असा तयार झाला असावा. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा) भरपूर अनुभवला. एक आठवडा मुक्काम होता ! सगळी जनता गच्चीत आणि रस्ते सुमसान म्हणजे काय याचा याचीदेही याचीडोळा अनुभव घेतला ! रिव्हरफ्रण्ट तीरावरच्या मोठ्या मैदानात कारपेट टाकून पर्यटकांना पतंगबाजीची सोय केली होती, तेथेही धमाल करता आली !
प्रतिक्रिया
बेस्ट रिपोर्ताज विजुभाऊ. सगळं
>>अवांतर: पतंगाच्या
जखमी पक्षांवर उपचार करणारी
जबर्या आढावा घेतलाय
मजा आली
मस्त हो विजुभाऊ हा
वा विजुभाऊ वा !@@ गुजरातवरुन
आसारी बास बास हाच शब्द
मस्त वाटलं हो विजुभौ तुमचा हा
बचपन के दिन भी क्या दिन
खा प्या पतंग उडवा मजा करा
झकास फोटू विजू भाव तेवढे
चोक्कस बीजूभाई....!!!
छान आनि सुन्दर चित्रे मस्त
क्लास वन !.
छान
काSSSSSSयपो छे....
खुप छान अमोल
पतंगसाहेब
मस्त
फोटो न दिसल्याने निराशा झाली
उत्तम सांस्कृतिक शब्दचित्र.
सही! माझा एक चुलत भाऊ
मस्त लेख आणि फोटो.
असेच म्हणतो ..छान फोटो आणि
छान फोटो आणि लेख !
+१
धागा सरस छे ! कंदीलवाला पतंग
झक्कास!
पण सालं मांजा विकत घ्यायचा?
छान
आणखी गुजरात-परिचय येऊ दे.
मस्त...
छान.
एकदम झकास पतंगवर्णन विजूभौ!
व्वो क्काट...
मस्त लेख इजुभाऊ... फोटो बी
सुंदर वर्णन आणि फोटो.
लै भारी हं विजुभौ.
झकास !
मस्त!
गुजरातमधल्या संक्रांतीची
दहा वर्षा पूर्वी याच दिवशी
सध्या उज्जैनमध्ये आहे तिथेही
व्वा, झकास रिपोर्ताज, विजूभाऊ
त्याचेही रिपोर्ताज केलेले आहे
सुदंर
झकास