Skip to main content

अस्थीपंजर

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 01/05/2008 08:40 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा पुलस्ति यांची अप्रतिम गझल शरपंजर

ग्लासातील संपलेली भर
उजाडले बघ, पुरे अता कर

कुठे जायचे विचारले मी
करून आपली करंगळीवर

'नीळकंठ', 'शंकर्‍या' उचला
मेल्याला, टाका रस्त्यावर 

ह्या प्रश्नाला नाही उत्तर!
कशास प्या झेपत नाही तर

हे "केश्या"चे अस्थीपंजर
भार किती हा या  धरणीवर...

लेखनविषय:

वाचने 3429
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

कुठे जायचे विचारले मी करून आपली करंगळीवर ह्या प्रश्नाला नाही उत्तर! कशास प्या झेपत नाही तर हे दोन तर एकदम सही! चतुरंग

हे "केश्या"चे अस्थीपंजर भार किती हा या धरणीवर... हा हा हा! :)

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार. (आभारी)केशवसुमार