Skip to main content

पुण्यातली स्थळे ( फिरस्ती साठी)

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 29/04/2008 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात आपल्याकडे आवडते पाहुणे आल्यावर त्याना कोठेतरी फिरायला नेत असतो. पुण्यात /पुण्याजवळ तशी खूप स्थळे आहेत( स्थळ = प्रेक्षणीय भौगोलीकठिकाण). पण बर्‍याचदा अस अनुभव येतो की सारस बाग ,कात्रज उद्यान ,डेक्कन, कॅम्प , शनिवार वाडा ,लाल महाल या पेक्षा जास्त ठिकाने आपल्याला आठवत नाहीत्.आणि उगाच मॉल / मल्टीप्लेक्स धुंडाळत फिरतो. खरे तर फारशी माहीत नसलेली थोडी वेगळी ठिकाणे आपण जर इथे सर्वाना सांगितली तर एक चांगला कोष तयार होइल. फक्त ठिकाण सांगताना तिथे कसे जायचे/ काय काय पहायचे हे पण सांगुयात. मी सुरुवात करतो १) रजनीश आश्रम/ नाला पार्क : हे कोरेगाव पार्क भागातले नीतान्त सुन्दर ठिकाण्.येथे ओशो आश्रम तसेच त्यांच्या शिष्यानी तयार केलेली बाग खूपच सुन्दर आहे.आपण पुण्यात आहोत की जपान/युरोप मधे अस प्रश्न पडतो.वर्दळ गर्दी धूळ असे इथे काही नसते.पण पाव भाजी वगैरे स्टॉल सिद्धा नाहीत. २) रेल्वे म्युझीयम : कर्वे रोड वर संगम प्रेस च्या रस्त्यावर. रेल्वे च्या मिनीएचर मॉडेल चे झकास म्युझीअम ३)बनेश्वर : पुणे बेन्गलोर रस्त्यावर साधारण कात्रज सोडल्यावर नसरापुर/भोर जवळ उजव्या हाताला शंकराचे सुन्दर मन्दीर आहे.बाग पण छान आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 30209
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया