दुधी हलवा (खर्रा-खुर्रा )

गणपा's picture
गणपा in पाककृती
11 Jan 2011 - 3:33 am

काल कलादालनात दुधी हलव्यावरुन एक पांचट विनोद केला. काही दर्दी मिपाकरांनी निषेधही नोंदवला. सर्वप्रथम त्या बद्दल सर्वांची माफी मागतो.
त्या दुष्कृत्याच ( म्हणजे मी केलेल्या विनोदाच.... त्यांच्या निषेधाच नव्हे) प्रायश्चित्त घ्याव, अस मनापासुन वाटु लागल. हा प्रपंच केवळ त्या दुखावलेल्या मनांसाठीच.

साहित्यः

पाऊण ते एक किलो कोवळा दुधी
१०० ग्रॅम खवा / नसल्यास बर्फीचे २-४ तुकडे.
१/२ वाटी दुध
१ छोटा डबा (७५ ग्रॅम ) कंडेंन्स्ड दुध
चिमुटभर वेलची पुड.
मनुका, काजु, बदाम, पिस्ते, अक्रोड जे आयत्या वेळी हाती लागेल ते.
१०० ग्रॅम साखर.
(जोडीला कंडेंन्स्ड दुध आहेच. तरीसुद्धा जर गोड खाऊ असाल तर साखरेच प्रमाण वाढवल तरी चालेल.)
२ चमचे बटर (लोणी/तुप)

कृती:

दुधी सोलण्याने सोलुन घ्यावा. (सालं बाजुला ठेवुन द्यावी.) आतल्या बिया काढुन मग दुधी खिसणीवर खिसुन घ्यावा. जितकं शक्य होईल तितक हाताने पिळुन दुधीतला रस काढुण तो बाजुला ठेउन द्यावा.

एका पसरट कढईत २ चमचे बटरवर दुधी ७-८ मिनिटं परतुन घ्यावा.

नंतर त्यात दुध आणि कंडेन्स्ड दुध टाकुन मध्यम आचेवर सतत ढवळत रहावं.

मनुका, वेलची पुड टाकावी.

२-३ मिनिटांनी सुका मेवा बारिक तुकडे करुन टाकावा. खवा टाकावा. दुध आटे पर्यंत मध्यम आचेवर परतत रहावं

आवडी प्रमाणे गरमागरम वा थंड करुन कसाही खावा.

आता हे एवढं गोड खाल्ल्यावर कॅलरी च्या नावाने बोंबच ..
हा त्यावरचा उतारा. सकाळी उठल्या उठल्या हा दुध्याचा पौष्टिक रस पिऊन दिवसाची सुरवात चांगली करा :)

दुधीरस : दुधीच्या खीसातुन काढलेलं पाणी + ४ चमचे खीस + ५-६ पुदिना-तुळस पाने + चिमुटभर काळ मीठ. + १/२ पेला पाणी. हे सगळ मिक्सरमध्ये फिरवुन गाळुन घ्यावं.

दुधी रसा बद्दल कालच जागुतै कडुन टिप मिळाली. थोड खोदकाम केल्यावर हा रस हृदयासाठी चांगला असतो असं कळलं.

- लाडोबा ;)

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jan 2011 - 3:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

:-)
गणपा इज ब्याक!

मेघवेडा's picture

11 Jan 2011 - 3:43 am | मेघवेडा

उगाच काय ब्याक? गेला कुठे होता तो? इथंच तर आहे! भरीव कार्य करतो आहे. परवाच नाही का टाकली होती साँदेशची पाकृ. उगाच नाही लाडोबा झाला तो.. अधूनमधूनच कुठलेतरी भडकावू धागे काढून, (त्या धाग्यांवरच काय तर इतर धाग्यांवरही) प्रतिसादांतून काड्या लावून गायब होणारे थोडीच लाडोबा होतात? :P

बाकी पाकृ ए-१ हो लाडोबा! मला वाटलं आता आयडीच बदलता की काय! ;)

प्रियाली's picture

11 Jan 2011 - 3:39 am | प्रियाली

दुधीचा रंग पांढरट आहे, हलव्याचा रंग इतका हिरवा कसा आला? दूध आणि खवा मिसळल्यावरही.

खवा नव्हता मझ्याकडे. मी बर्फी वापरली. बहुतेक त्यात रंग असावा. म्हणुन हलवा इतका हिरवा दिसतोय.

पिवळा डांबिस's picture

11 Jan 2011 - 3:45 am | पिवळा डांबिस

अरे पण चांगली बर्फी होती तुझ्याकडे तर ती खायची सोडून हे दुध्याच शेण करावसं का वाटलं तुला?
:)

सहज's picture

11 Jan 2011 - 8:05 am | सहज

फोटो वरुन दुधीहलवा ... असो जाउदे. पु.पा.शु.

गरम गाजर हलवा + एक मोठा स्कूप व्हॅनीला आईस्क्रीम मधे दंग असताना हा दुधी हलवा...

मिपावरच्या शेफस मंडळींना एक विनंती (जागू, गणपा, स्वाती तै, खादाड्तै इ इ ) काही दिवस जरा विश्रांती घ्या किंवा पाकृ प्रकाशीत करायचे दिवस ठरवून घ्या. गेले काही दिवस जरा जोरदार मेजवानी होतायत असे वाटते. पुरेसा न्याय तुमच्या पाकृंना देता येत नाही आहे.

बाकी गणपा तुझे ठीक आहे पण कोण्या हौशी इसमाने तुझी पाकृ वाचून घरातली जराशी जुनी बर्फी वापरुन हलवा केला व नेमकी काही गडबड झाली म्हणजे? अस्सल शेफ, पदार्थातील घटकांच्या वापरात अजिबात तडजोड करत नाही.

पिवळा डांबिस's picture

11 Jan 2011 - 10:37 am | पिवळा डांबिस

मिपावरच्या शेफस मंडळींना एक विनंती (जागू, गणपा, स्वाती तै, खादाड्तै इ इ ) काही दिवस जरा विश्रांती घ्या किंवा पाकृ प्रकाशीत करायचे दिवस ठरवून घ्या.
सहजकाका, तुमचं अर्थातच म्हणणं बरोबर आहे...
पण त्यांना ते जमणार नाही!
कारण....
ते पेटले आहेत!!!!!!!!!!!!
:)

स्पा's picture

11 Jan 2011 - 2:45 pm | स्पा

डांबिस काक्काना अनुमोदन

मिसळपाव's picture

11 Jan 2011 - 4:25 am | मिसळपाव

जाउन आलो!

विकास's picture

11 Jan 2011 - 4:48 am | विकास

नेहमी प्रमाणे मस्तच! :-)

दुधी रसात कॅलरीज कमी असतात का? (हा माहितीखातर प्रश्न विचारत आहे)

तुझ्या सगळ्या पाककृत्या आवडतात रे पण हा हलवा कुछ जम्या नही !:(

तुझ्या सगळ्या पाककृत्या आवडतात रे पण हा हलवा कुछ जम्या नही ! :(

आमच्या सर्वात जास्त आवडत्या हलव्याचा रंगच नाही पटला... :(

प्रीत-मोहर's picture

11 Jan 2011 - 7:41 am | प्रीत-मोहर

भुललास वरलिया रंगा???

प्रभो's picture

11 Jan 2011 - 9:14 am | प्रभो

साईझप्रमाणेच रंगही मॅटर्स.... ;)

टारझन's picture

11 Jan 2011 - 10:36 am | टारझन

हा दुधी भोपळा म्हंटला की आम्हाला आमच्या शाळेत श्लिवलेस घालुन येणार्‍या गोखले बाईंचीच आठवण होते. त्या बाई शिकवायच्या इंग्लिश. आणि दर शनिवारी व्होकॅबिलरी ची टेस्ट घ्यायच्या. आलं नाही की गारठ्याच्या जाम छड्या पडायच्या. तेंव्हा त्यांच्या त्या दुधी भोपळ्यासारख्या दंडांवर वेव्ज तयार व्हायच्या हे आम्ही आमच्या स्लो मोशन दृष्टीने पहायचो. गोखले मॅडम अंमळ गोर्‍यापान , गुटगुटीत तरीपण सुंदर होत्या. पण चेहर्‍यावर कडक कांजी केल्या सारखे हावभाव असल्याने त्यांच्याकडे पहायलाही भिती वाटे :) तात्पर्य गोखले मॅडम कोणालाच आवडत नव्हत्या. म्हणुन मला दुधी भोपळ्याची अ‍ॅलर्जी आहे. गणपाने केवळ नॉनव्हेज कृती टाकाव्यात. व्हेज टाकल्या तर त्या चटकमटक स्टार्टर्स वाल्या.
न आवडत्या भाज्यांचं डिपार्टमेंट तसंही जागु मावशींकडे आहेच :)

-(फक्त णॉणव्हेज प्रेमी) टारोबा स्टार्टर

प्राजु's picture

11 Jan 2011 - 9:14 am | प्राजु

हो रे गणपा भौ..! हलव्याचा रंग बघून कालवलेल्या मेहेंदीची आठवण झाली.
आधी वाटले तू दूधी हलव्याचा फोटो म्हणून पालक पनीर/ आलू-पालक्/पीज पालक.. अशा कोणत्या भाजीचा फोटो दिला आहेस की काय!!

बर्फी वापरायला नको होतीस.. असे वाटते.

स्मिता.'s picture

11 Jan 2011 - 12:31 pm | स्मिता.

+१

आमोद शिंदे's picture

11 Jan 2011 - 10:26 am | आमोद शिंदे

कालचा विनोद बरा होता..

पर्नल नेने मराठे's picture

11 Jan 2011 - 12:00 pm | पर्नल नेने मराठे

गणपाने परत एकदा मेन्दी कालवुन हा .दुधी हलवा. असा जोक केला आहे.
तरीही ह्या दुष्कृत्याच त्याने परत एकदा प्रायश्चित्त घ्याव ( नविन पाक्र्रु टाकुन ;) )

डावखुरा's picture

11 Jan 2011 - 12:21 pm | डावखुरा

स्पष्टपणे चुका दाखवुन कान धरल्या बद्द्ल धन्यवाद मंडळी. चुकांतुनच माणुस शिकतो.
कधी कधी पाककृती चवित फसते तर कधी दिसण्यात. या वेळी ती फसली हे मान्य.

बहुमताचा आदर करत सध्या मिपाच्या या विभागातुन आपली रजा घेतोय.
लोभ होता तो तसाच रहावा हीच इच्छा. :)

गवि's picture

11 Jan 2011 - 3:09 pm | गवि

रजा नामंजूर करण्यात आली आहे.
उद्या रेसिपीसह हजेरी लावणे अपेक्षित.. :)

कवितानागेश's picture

11 Jan 2011 - 2:43 pm | कवितानागेश

दुधीच्या सालांचे बाजूला ठेउन काय करायचे ते दिले नाहिये.

आमच्याकडे त्याची तिळ्कूट घालून ओली चटणी करतात.
किंवा फोडणीवर परतून लसूण, शेंगादाणे घालून चिवडाचटणी करतात.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jan 2011 - 3:03 pm | परिकथेतील राजकुमार

गणपाभौ आपल्याला तर आवडला बॉ हा हलवा :) आपल्याला तर येवढेपण करायला जमणार नाही.

असो...

तू लाडोबा असल्याने अजुन छान छान प्रतिक्रीया येतीलच.

अरे वा गणपा तु तर छानच रस बनवलास. आता मी पण असा करुन बघेन.

दुधी हलवा (खर्रा-खुर्रा )

मला वाटल आता किसणीवर किसताना फोटो असेल त्याचा आवाज खर्रा-खुर्रा येतो हे दाखवणारा.

डावखुरा's picture

11 Jan 2011 - 6:02 pm | डावखुरा

बहुमताचा आदर करत सध्या मिपाच्या या विभागातुन आपली रजा घेतोय.
लोभ होता तो तसाच रहावा हीच इच्छा.

नामंजुर..आमच्या जिभेला चटक लाउन असा रजा घेण्याचा विचार कसा करु शकता??

गणपाने बर्फीबरोबर चांदीचा वर्खही वापरलाय दुधी हलव्यावर.... ह्याला म्हणतात रीयुज!
हलवा चवीला मस्त असणार हे निश्चितच पण आमच्यासारख्या दर्शनमात्रींसाठी त्याचा लूक (रंग) च महत्वाचा .. त्यामुळेच लोकांनी रंगाबद्धल प्रतिक्रिया दिल्यात. पण गंपाशेट, कृपाकरून "पाकृविभागातून रजा-बिजा" असलं काही बोलू नका हो!
"तुम्ही पाकृ टाकायची नाही तर कुणी...." (संदर्भःबटाट्याची चाळ (उपास))

अवांतरः आतंर्जालातून सुवास आणि चव मिळण्याची सोय कधी येणार??? इथे डोळ्यापुढे संगणकाचा उंदीर चाटून बघणारे मिपाकर डोळ्यांपुढे आलेत.. ;-)

सखी's picture

11 Jan 2011 - 11:26 pm | सखी

"तुम्ही पाकृ टाकायची नाही तर कुणी...." +१ --- अगदी हेच म्हणणार होते.
गणपा तुमची एक पाकृ लोकांना फसली असे वाटले तर रजा कशाला घेता? तुम्ही म्हणालात तसे चुकांमधुनच माणुस शिकतो. लोकांनी प्रामाणिकपणे सांगितले आणि तुम्हीही मोठेपणा दाखवुन ते मान्य केले - मग मॅटर खतम!

डावखुरा's picture

12 Jan 2011 - 12:19 am | डावखुरा

सखी तै=मांडवली बादशाह.. ;)

सखी's picture

12 Jan 2011 - 1:20 am | सखी

हा हा... मी कसली आलीये मांडवली बादशाह..
बादशहा वगैरे पदवी गणपा, स्वातीताई यांना शोभुन दिसतीया :)

प्राजु's picture

11 Jan 2011 - 8:47 pm | प्राजु

रजा नामंजूर!!!
विषयच मिटला! उद्या च्या उद्या (आजच्या आजच रादर!) नवी पाकृ हवीये. विकेंडला काय नेहमीचे प्रकार करू का घरी?? व्वा!! (इथे रागावल्याची स्मायली)