लेखकचन्द्रशेखर गोखलेयांनी शनिवार, 18/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
असावी एक "संजय दृष्टी" आपल्या जवळ
आपल्याच मनातले महाभारत पहाण्यासाठी.
कारण, वागत असतो कधी कधी आपण
धृतराष्ट्रा प्रमाणे , जन्मजात आंधळे असल्या सारखे
किंवा स्वतःच बांधुन घेतो स्वत:च्याच डोळ्यांवर पट्टी
गांधारी सारखी, पतिव्रतेचा आव आणून.....!!!
प्रतिक्रिया