खूप पूर्वी मनात आलेलं आणि लिहिलेलं काही आज पुन्हा दिसलं आणि आणि त्यातले काही पॉईंट्स उचलून चर्चेला आणावेसे वाटले म्हणून.. खाली जे काही लिहिलंय ते आडपडदा न ठेवता किंवा मुद्दाम "न्यूट्रल" राहण्याचा कोणताही प्रयत्न न करता "ज्याचे अनेक (जवळ जवळ सर्वच) रोजच्या कट्ट्यावरचे मित्र परदेशात गेले आहेत आणि कायमचे राहिले आहेत" अशा भारतात "उरलेल्या" म्हणा किंवा "राहिलेल्या" म्हणा, माणसाच्या मनातून हे लिहिलं आहे :
--------------------------
जो कोणी अमेरिकेला (किंवा यू.के. वगैरेला) जातो.. तो "आयुष्यातून" जातो..
तिकडे गेलेल्यांचा पहिला पहिला संपर्क हा (अगदी नॅचरली) भारून गेलेला आणि आपलं तिथलं जीवन कसं वेगळं आणि समृद्ध आहे हे इकडच्या भारतीयांना भरभरून सांगण्यासाठी असतो. तास तासभर आय एस डी चालतोच.
तिथे कॅसिनोत गेलो, नग्न नृत्य पाहिलं, रस्ते स्वच्छ, सगळ्या घरांत वॉशिंग मशीन,ए.सी. डिशवॉशर, ओव्हन, वॉल टू वॉल कार्पेट, वगैरे असतं हे सांगितलं जातं.. आणि बेसिनला पिण्याइतकं स्वच्छ पाणी येतं हे ही. .. एखाद दोन महिन्यातच "कार घेतली" चे आवर्जून फोन ई-मेलवर फोटो येतात.
इकडचे सगळं खूप ऐकतात वाचतात. (पुन्हा वरच्याप्रमाणेच हेही अगदी नॅचरली..)वेळोवेळी "जळतात" ही "तिकडच्यां"च्या नशिबावर..
पण वारंवार सतत कौतुक केलं जातंच असं नाही. एकतर आता इथेही बर्याच गोष्टी मिळत असल्या तरी एक नैसर्गिक हेवा असतो आणि पुन्हा आपल्या "इकडच्या" रोजच्या रहाटगाडग्याशी जुळणारं असं "तिकडच्यां"च्या बोलण्यात काही सापडत नसल्याने नुसतंच ऐकायचं आणि "वा..आयला..सही" असे उद्गार काढायचे याला बहुधा "इकडचे नंतर कंटाळत असावेत.
आपल्या "इकडच्या" आयुष्यात मात्र "तिकडच्यां"ना नवीन वाटेल अशा नवीन डेली घटना फारशा नसतात. म्हणून शेवटी "मग तुझं काय चाललंय?" या तिकडून येणार्या प्रश्नाला फार दीर्घ उत्तर देता येत नाही.. "चाललंय आपलं, नेहमीचंच.." म्हणून इकडचे नंतर नंतर गप्प बसतात.
"तिकडच्यांना"ही इकडून भरभरून रिस्पॉन्स मिळत नाही असं लक्षात येऊन तेही सांगणं कमी करत जातात.
तिकडचे झालेले अनेकजण "भारतीय सिस्टिम" ला सकारण नावं ठेवतात.. करप्शन, पोल्युशन वगैरे मुद्दे जेन्युइनही असतात.
त्यावर उत्तर किंवा बचाव म्हणून "इकडचे" कधीकधी आपल्या देशाचे गोडवे गातात..(असेना का करप्शन वगैरे..संस्कृती बघा..)
असं म्हणणार्यांमधे मनापासून दुखावल्याने म्हणणारेही असतात आणि आपल्याला "तिकडे" जाता येत नाही (कर्तबगारीत कमी पडल्याने) याची खंत असलेलेही अनेक असतात.
म्हणून कधीकधी अशा ठिकाणी आपल्या देशाचा अभिमानही "डिफेन्सिव्ह मोड", बचावात्मक पवित्र्यात बाळगला जातो की काय असं वाटतं.
तशी (उदा.) अमेरिकासुद्धा अजिबात "कमी" नाही.. ..कोणताच देश कमीजास्त नाहीच..
पण पैशाच्या, डॉलरच्या शक्तीच्या खेळामधे आपण सगळे क्षुद्र ठरतो..
मी बर्याचदा बघितलंय :
"तिकडचे" इकडे आले की सगळ्यांनी त्यांना भेटायला गावोगावाहून यायचं.. काही परफ्यूम,चोकलेट्स वगैरे आणली असतील ती घ्यायला जाण्याचाच "इकडच्यां"चा उत्साह जास्त दिसतो..
तिकडचे आलेले स्वत:हून इकडच्यांना घरी भेटायला क्वचित येतात..(कारण सामान घेऊन फिरणं अवघड जातं इ.इ.).. एकदम एअरपोर्ट ते गाव...गाव ते एअरपोर्ट..व्हिसा रिन्युअल किंवा इतर कारणांनीही मुंबईला खूपदा येतील पण बोरिवली, ठाणे , डोंबिवली अशा आडबाजूच्या मित्रांकडे केवळ भेटायला कितीजण येतात, शंका आहे.
"इकडचे" त्यांना खास देशी बेत, पिठलं भाकरी वगैरे बनवून जेवायला बोलावतात ..किंवा पुरणपोळी..
यात काही वेगळं घडलं तर "यांचा" "त्यांना" अपमान..आणि कधी "त्यांचा" "यांना"..अशा घटना भारतभेटीनंतर कटुता ठेवतातच..
विचारण्याचा मुद्दा असा आहे की मनुष्य अंतराने दूर गेल्यावर त्याच्यात आणि आपल्यात काहीच (आर्थिक, रोजच्या घटना, वातावरण इ.इ.इ) "सिमिलर" राहात नाही. आणि त्याच्या परदेशातल्या "नाविन्या"पेक्षा आपापल्या देशांत आणि आपल्याच गावात "उरलेल्या" देशी मित्रांसोबत "सिमिलॅरिटीच्या" बेसिस वर आपलं नातं जास्त दृढ होत जातं आणि परदेशी मित्र मागे मागे पडत जातात. .. असं सगळ्यांच्या बाबतीत होतं का?
परदेशी गेलेला मित्र..त्यासोबतचं नातं तुटत जातं..मधेच ते आले की भेट जमवून आणली तरी आणि होऊ नाही शकली तरी ते नातं नुसतंच ढवळलं जातं.. अवघड सिच्युएशन होते..
आणि ही झाली इकडे बसून लिहिलेली एकतर्फी बाजू..
"तिकडे" गेलेल्याचंही काय? तिकडचं कष्टाने कमावलेलं वैभव बघायला आणि कौतुक करायला जोपर्यंत इकडचे कोणी येत नाही तोपर्यंत त्यांनाही काय वाटत असेल ?
कारणं काही असोत.. योग्य किंवा अयोग्य..
पण शेवटी "इकडचे" आणि "तिकडचे" ही दरी पडतेच आणि वाढत जातेच..
बरोबर आहे का मी म्हणतो ते? इथे इकडचे आणि तिकडचे दोन्हीकडचे खूप मिपाकर आहेत. कोणीही प्लीज पर्सनली घेऊ नये ही विनंती. आपल्यातले काहीजण (इकडचे आणि तिकडचे दोन्हीही) असे वागत नसतीलही..मागे असंच माझ्या ब्लॉगवर लिहिलं तेव्हा "आपण नक्की कोणाकडे पाहून टीका करत आहात. मी स्वतःहून भारतात सगळ्यांना भेटायला जातो" अशा स्वरुपाच्या नाराज प्रतिक्रिया आल्या.
हे सार्वत्रिक आहे का एवढंच बघायचंय.
मला वाटतं नीट जमत नसूनही माझा मुद्दा मी पुरेसा मांडलाय..!!
तरी मत मांडायला एक ठाम मूळ मुद्दा हवाच म्हणून खाली एका वाक्यात लिहितोय..:
मित्र परदेशी जाणं ही "मैत्री " या नात्यांमधली "दुर्घटना" आहे की नाही ?
याद्या
21664
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम चर्चाविषय...
डाणराव ... आपण नवसंपादक आहात
In reply to उत्तम चर्चाविषय... by छोटा डॉन
जेनपती टारझनराव, हेहेहे.
In reply to डाणराव ... आपण नवसंपादक आहात by टारझन
छे छे ...
In reply to डाणराव ... आपण नवसंपादक आहात by टारझन
काय त्यांचे छाण छाण स्वभाव
In reply to डाणराव ... आपण नवसंपादक आहात by टारझन
उत्तम चर्चाविषय... ह्यावर मी
In reply to उत्तम चर्चाविषय... by छोटा डॉन
+१ हेच बोल्तो आणि रजा घेतो.
In reply to उत्तम चर्चाविषय... ह्यावर मी by परिकथेतील राजकुमार
आमचे सर्वच मित्र भिकारचोट आहेत
In reply to +१ हेच बोल्तो आणि रजा घेतो. by अवलिया
आधी दिलेले मिळाले का?
In reply to आमचे सर्वच मित्र भिकारचोट आहेत by कुंदन
परत कधी भांडवल मागा लेकोहो
In reply to आमचे सर्वच मित्र भिकारचोट आहेत by कुंदन
नावांचा क्रम?
In reply to उत्तम चर्चाविषय... by छोटा डॉन
आयला मी म्हटलं सध्या
+१
मला हल्ली 'को' दिसत नाही रे
In reply to +१ by स्पा
कार्यकारी अध्यक्ष च्या आधी
In reply to मला हल्ली 'को' दिसत नाही रे by टारझन
-
In reply to कार्यकारी अध्यक्ष च्या आधी by स्पा
+१
In reply to +१ by स्पा
>>असं म्हणणार्यांमधे
राहून गेलं...
In reply to >>असं म्हणणार्यांमधे by सूड
+१ अनेक वेळेला कर्तृत्व आणि
In reply to >>असं म्हणणार्यांमधे by सूड
..चुकीची दुरुस्ती....चुकीची दुरुस्ती....चुकीची दुरुस्ती..
In reply to +१ अनेक वेळेला कर्तृत्व आणि by llपुण्याचे पेशवेll
.
छान चर्चा
'असे बर्यान्चदा होतेच' असे
तुम्ही मांडलेली बरीचसी
म्हणजे: मित्र परदेशी जाणं ही
In reply to तुम्ही मांडलेली बरीचसी by Nile
आयुष्यभरात ठराविकच मित्र
In reply to म्हणजे: मित्र परदेशी जाणं ही by गवि
धन्यवाद..
In reply to आयुष्यभरात ठराविकच मित्र by Nile
व्याख्या
In reply to धन्यवाद.. by गवि
व्याख्या ?!
In reply to व्याख्या by Nile
काँट्रॅडीक्शन
In reply to व्याख्या ?! by गवि
ठीक.. Tee phakt vyakhya
In reply to काँट्रॅडीक्शन by Nile
गवि, दोन प्रकारच्या
In reply to धन्यवाद.. by गवि
हे हे. थँक्स.
In reply to गवि, दोन प्रकारच्या by रन्गराव
गवी ह्यांनी धाग्याची पुन्हा
In reply to हे हे. थँक्स. by गवि
तू गप रे!
In reply to गवी ह्यांनी धाग्याची पुन्हा by परिकथेतील राजकुमार
हा काथ्याकूट आहे. कथा/ललित
In reply to तू गप रे! by धमाल मुलगा
धन्यवाद.
In reply to हा काथ्याकूट आहे. कथा/ललित by परिकथेतील राजकुमार
पुरस्काराबद्दल हाबार.
In reply to गवी ह्यांनी धाग्याची पुन्हा by परिकथेतील राजकुमार
आम्ही पुढचा धागा न टाकता एकदम
In reply to पुरस्काराबद्दल हाबार. by गवि
चालेल..
In reply to आम्ही पुढचा धागा न टाकता एकदम by परिकथेतील राजकुमार
हाण्ण तिच्यायला!
In reply to चालेल.. by गवि
>>सरजी....मैं मूळ
In reply to हे हे. थँक्स. by गवि
माझ्यामते हा प्रश्न फक्त
मस्त.. मी म्हटलेला आणि
In reply to माझ्यामते हा प्रश्न फक्त by कानडाऊ योगेशु
सध्या सासर्या बरोबर सौना
ह्म्म्म...छान लिहलं आहे,
बर्याच अंशी सहमत.
>>पण जुनी मैत्री जी कालपर्यंत
In reply to बर्याच अंशी सहमत. by धमाल मुलगा
दुर्दैव
In reply to >>पण जुनी मैत्री जी कालपर्यंत by रन्गराव
पर्याय नसतो हे खरं आहे. पण
In reply to दुर्दैव by धमाल मुलगा
>>>पण जुनी मैत्री जी
In reply to बर्याच अंशी सहमत. by धमाल मुलगा
+ १
In reply to बर्याच अंशी सहमत. by धमाल मुलगा
छान उत्तर! धमु चे
In reply to बर्याच अंशी सहमत. by धमाल मुलगा
योग्य विश्लेषण...
In reply to बर्याच अंशी सहमत. by धमाल मुलगा
ही फ्रेम ऑफ रेफरंस
In reply to योग्य विश्लेषण... by चिगो
@आयुष्यभरात ठराविकच मित्र
तुम्ही जगाच्या कोपर्यात
In reply to @आयुष्यभरात ठराविकच मित्र by निनाद मुक्काम …
मला मुळात इकडंच आणि तिकडचं
आमचं मत
व्वा?
In reply to आमचं मत by छोटा डॉन
मैत्रीत कसली आलीये दुर्घटना??
तिकडे राहणारे
इकडे- तिकडे
होय दुर्घटनाच!!
डॉन्रावांनी माझं नाव पहिल्याच प्रतिसादात टाकल्यामुळे
घरात स्वच्छ पाणी असणे
In reply to डॉन्रावांनी माझं नाव पहिल्याच प्रतिसादात टाकल्यामुळे by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to घरात स्वच्छ पाणी असणे by विजुभाऊ
काही प्रश्न पडले आहेत. एका
चांगला
ओचोसिंको रॉक्स!!
In reply to चांगला by नंदन
हम्म!!!!
सहमत
In reply to हम्म!!!! by पिवळा डांबिस
मित्र परदेशी जाणं ही "मैत्री
हल्लीच कुठेशी वाचलं कि राजाला
मी एक अनिवासी ह्या नात्याने
एक स्वतंत्र लेखच लिही ना..
In reply to मी एक अनिवासी ह्या नात्याने by निनाद मुक्काम …
बाकी आमच्या डान्रावांना मागे
In reply to एक स्वतंत्र लेखच लिही ना.. by प्राजु
धरुन?? खरंच???
In reply to बाकी आमच्या डान्रावांना मागे by विंजिनेर
नायल्या, नायल्या, अरे आंजावर
In reply to धरुन?? खरंच??? by Nile
आंजावर.... ... मन सुद्धा
In reply to नायल्या, नायल्या, अरे आंजावर by विंजिनेर
काही विचार
कर्तबगारी
माझं मत
नातेवाईक
तिकडे गेल्यामुळे स्वभाव
In reply to नातेवाईक by आंसमा शख्स