प्राण्यांवर दया करा ?
सकाळी वॉकला निघाल्यावर एक दॄष्य पहावयास मिळते. रस्त्यावर ठिकठिकाणी लहान लहान बिस्किटे पडलेली आढळतात. जैन बांधव ज्या ठिकाणी जास्त आहेत, अशा ठिकाणी हे दॄष्य हमखास दिसते. मी अनेक लोकांना पुडीतील बिस्किटे कुत्र्यांसमोर टाकताना पाहिले आहे. ती बिस्किटे अशीच पडून राहतात, बहुतेक कुत्र्यांना ती आवडत नसावीत? मुक्या प्राण्यांवर दया दाखवण्याची ही पद्धत वाईट नाही. पण फक्त सकाळी त्यांच्या पुढ्यात ही विशिष्ट बिस्किटे टाकली की त्यानंतर कुत्रे ती बिस्किटे खातात की कचर्या त जातात हे या बांधवांपैकी कुणी पहात असेल, असे वाटत नाही. जैन बांधवांचे अनुकरण आपले काही मराठी बांधवही आजकाल करताना दिसतात. याचा परिणाम असा की रस्तोरस्ती रांगोळ्या काढल्याप्रमाणे सकाळी ही बिस्कीटे नजरेस पडतात. माझ्या मते अशी दया दाखवण्यापेक्षा पांजरपोळाच्या धर्तीवर समस्त जैन बांधवांनी एक जागा निश्चित करुन सदर कुत्र्यांची राहण्याची सोय करावी. त्यात महानगरपालिकेच्या मदतीने कुत्रे पकडून आणून त्यांना कायमचे खाऊपिऊ घालावे, त्यांच्यावर औषधोपचार करावे. याचा परिणाम म्हणजे शहरातील भटक्या कुत्र्यांचा त्रास सामान्यांना होणार नाही आणि आपल्या जैन बांधवांचे हे दान सत्पात्री पडेल. या लेखामुळे जैन बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल क्षमस्व.
याद्या
2405
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
अंगावर काटा येतो
+100