"अशोकच" जेव्हा शुंभा सारखे वागतात
तेव्हा लोकशाहीचे चारी स्तंभ
धाडकन कोसळतात.
हे बघुन स्वर्गात नारदही हादरतात
'नारायणं ' 'नारायणं ' म्हणताना
जीभ चावतात
आता नाव घ्यावं असा
देवच उरला नाही म्हणतात !
इतक्यात स्वर्गाच्या दाराजवळ
एक हतबुद्ध झालेला बुद्धपुरुष
सत्य आणि चरखा विकायला
बसलेला त्यांना दिसतो.
" या मुल्यवान वस्तु ,
का विकतो आहेस तु"
नारद विचारतात, त्या बाबाला
तो महात्मा खिन्नपणे म्हणतो
" माझ्या चरख्याचा अर्थ
चर आणि खा असा काढतील
असं वाटलं नव्हतं.
आणि सत्याच्या प्रयोगाचा अर्थ
ते सट्टयाचे प्रयोग असा लावतील
असही वाटलं नव्हतं मला.
पण सचिनच्या ब्याटचीही किंमत
येणार नाही इथे, तुझ्या चरख्याला
नारद त्या माहात्म्याला म्हणाला
"इथे वस्त्रांची गरजच नाही कुणाला
कारण इथे महावीरच येतात रहायला
आणि सत्त्याला तर काहिच मूल्य नाही इथे
कारण असंख्य सत्यवान रहातात इथे
तुला सत्याचं मुल्य तिथेच मिळेल
जिथे ते दुर्मिळ होत चालालं आहे
त्या भुममंडळारील एक मद्य सम्राट
विकत घेतो म्हणे सत्य ,
वाटेल तेवढी किंमत देउन.
इथे क्षुल्लक किंमत मिळेल ,तुझ्या सत्त्याला.
चालेल मला , तो महत्मा म्हणाला
मला फक्त एकच पिस्तुल हवी आहे
त्या नथुराम कडून आणि
धन्यवाद द्यायचे आहेत त्याला
माझा वध केल्या बद्दल.
त्याने मला एकदाच मारलं
त्यावेळी मी "हे राम"
म्हणालो खरा
पण हे हरामखोर मला रोजच मारतात
सहन होत नाही आता मला
मला आता त्या नथुराम कडून त्याची पितुल हवी आहे
हे नथुराम..!
मला पितुल हवी आहे....
हे नथुराssssssssssम...!!!!!
तो महात्मा अलिकडे छाती वरील जखमेवर हात
ठेउन पिस्तुल मागत फिरत असतो म्हणे...वेड्या सारखा
.................................................
मला वाटतं त्याचा अश्वत्धामा झाला असावा ....बहुदा.....!!!
तेवढी
किंमत देउन
कलि
कारण ते मुबलक मिळते इथे"
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
3215
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे नथुराssssssssssम...!!!!!
उत्तम
मला आता त्या नथुराम कडून
निव्वळ अप्रतिम आणि मार्मिक!
जबरा!
एक्दम जबरदस्त
अत्यन्त मार्मिक....
गोखले साहेब, हे घ्या! बापू
कविता आवडली. (ह. घ्या. हा
हे पण असूद्या!
हे मस्त..
In reply to हे पण असूद्या! by यकु
छान कविता आहे ...