Skip to main content

घोरणे

Published on मंगळवार, 02/11/2010
घोरणे हा एक भयानक रोग/सवय आहे..अश्या माणसाच्या सहवासात झोपणे म्हणजे कठिण काम असते.. पुण्याल होस्टेल मधे असताना माझा एक राजापुरचा पार्टनर होता... त्याला घोरायची सवय होति..झोप लागली कि काहि मिनिटातच हा प्राणी घोरणे सुरु करायचा.. बर घोरण्याचा आवाज हि टिपेला असायचा..सारे होस्टेल दणाणुन सोडायचा.. एका लयीत त्याचे घोरणे चालायचे..पण मधेच ट्रक जसा गिअर बदलतो तसा हा गिअर बदलायचा.. तो पर्यंत लय व आवाजाचा डेसीबल बदलायचा मग गीअर पडला कि पुन्हा जुन्या लयीत घोरणे सुरु..बायका पण दुपारी.लवंडल्या कि घोरतात.. लग्न घरात तर लोक इतके घोरतात ..सामुदायिक घोरणे...कि एस टी स्टंड वर झोपलो कि काय असा भास होतो काहि माणसे का घोरतात? हा रोग आहे का? नवरा घोरतो म्हणुन परदेशात घटस्फोट झाल्याचे वाचले आहे. यावर उपाय म्हणुन एक यंत्र पण आले आहे असे समजते.. आपले अनुभव..मत..चिकित्सा वाचण्यास उत्सुक आहोत

वाचन संख्या 5166
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

सगळेजण घोरतायत, म्हणून अजून कोणी जागे झाले नाहियेत प्रतिक्रिया लिहायला...

तरी बरं! वेबसाईट्सवर लोकांच्या घोरण्यांचे आवाज येत नाहीत. ;) अनिरुद्ध

नवरा घोरतो म्हणुन परदेशात घटस्फोट झाल्याचे वाचले आहे. घटस्फोट कोणाचा होतो????? लग्न झालेल्यांचा. बरोबर ना अविनाशकाका? ;) आणि भारतात झालेले ऐकले आहेत का तुम्ही????? :(

"नवरा घोरतो म्हणुन परदेशात घटस्फोट झाल्याचे वाचले आहे." >> हो मी पण असे ऐकले आहे. ज्या लोकाना मेदाचा (fat) चा गंभीर प्रॉब्लेम असतो ते लोक खुप घोरतात आणी आपल्याला घेरतात...;) असा सर्वसाधारण समज आहे. मी mp3 प्लेयर वर ३ तासाचं आमच्या रुममेटचं घोरणं रेकॉर्ड केलं होतं आणि त्याला समोर बसवुन ऐकवलं होतं तेव्हा त्याला खात्री पटली होती. तोपर्यंत साहेबांना कळ्ळंही नव्हतं. त्यांच घोरणं म्हणजे डरकाळ्या फोडणं होतं. - वाघोबा

पण ते फक्त जेव्हा मोठी उशी घेतो तेव्हा :) श्वास घ्ययला अडथळा होतो तेव्हा लोक घोरतात....

इंग्रजीमधे चांगल्या झोपेला sound sleep का म्हणतात????????? (अविनाशकाका टॉपीकला जन्म देउन निघुन जातात हे माहिती असले तरी उत्तराची अपेक्षा करतो)

नितिन भाऊ....खरे तर आमचे टोपिक अगदी ...निरुपद्रवि..कुणाचीच खोड न काढणारे..व अति क्षुद्र व टी.पी ..असे असतात..मग हा कोलाहाल का? कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या?

In reply to by अविनाशकुलकर्णी

काय झाले अविनाशकुलकर्णी साहेब? ते वर थत्ते चाचा वगैरे आहे ते या धाग्याविषयी नाहीये.

इथे वाचा....... http://www.aphroditewomenshealth.com/news/20060101231155_health_news.shtml http://www.google.co.in/#hl=en&expIds=17259,24416,26637,27218,27356&xhr=t&q=divorce+due+to+snoring&cp=22&pf=p&sclient=psy&aq=f&aqi=g4g-o1&aql=&oq=divorce+due+to+snoring&gs_rfai=&pbx=1&fp=2d399e75236bc81

मी पण घोरतो असे सगळे म्हणतात, पण मला का ऐकु येत नाही?

In reply to by आप्पा

आमचे एक आंजा मित्रही अशीच तक्रार करत होते. शेवटी त्यांच्याच घरी बसून रात्री उशीरापर्यंत पब्लिक गप्पा छाटत असताना स्टिंग ऑपरेशन करण्याची संधी मिळाली! मग काय, डान्स पे चान्स मार लिया।

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्टिंग ऑपरेशन करायचे एकीने, श्रेय लाटायचे दुसरीनेच!!! म्हणजे आम्ही तेवढ्या शापांचे धनी आणि मलई मात्र..... असो, त्या पहाटे तोंडावर हात ठेवून हसू दाबता दाबता काय पुरेवाट झाली ते पाहायला तू खरंच जागी असायला हवी होतीस!!!

In reply to by मस्त कलंदर

माझ्या वरच्या प्रतिसादातच मी स्टिंग ऑपरेशन करणार्‍यांना श्रेय देणार होते. पण उघडउघड नाव दिल्यास सदर बेडर कार्यकर्त्यांस त्रास होईल (काय आहे, त्या अ"घोरी" मित्राचे हात वरपर्यंत पोहोचले आहेत.) म्हणून मुद्दामच सौजन्य दाखवलेलं नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्या स्टिंग ऑपरेशनच्या भीतीनेच बहुधा वरपर्यंत हात नसलेले आपले दुसरे आंजा काका रात्रभर झोपले नसावेत. हो ना हो काका?

In reply to by मस्त कलंदर

बहुधा वरपर्यंत हात नसलेले आपले दुसरे आंजा काका
हा कोण आता?