शब्द होती मूक तेव्हा रंगते ही भैरवी..
आंतरजालावर ई पेपर वाचत असताना, ई-सकाळ वर एक अतिशय भन्नाट धागा सापडला आहे.मुलतानी ते भैरवी या शीर्षका खाली दिलेली रागमाला आवर्जुन ऐकवी अशी आहे. त्या बद्दल पुरविलेली महिती अशी:
न्यू जर्सीच्या विश्र्व नाट्यसंमेलानात पुण्याच्या भरतनाट्य संशोधन मंदिराने सादर केलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाने मराठी माणसांची मने जिंकली. याच नाटकातली गाजलेली रागमाला भरतच्या सहकार्याने ई-सकाळच्या वाचकांसाठी सादर केली आहे.
पुरूषोत्तम दारव्हेकरांची लेखणी आणि पं. जितेंद्र अभिषे्की यांच्या संगीत दिग्दर्शनातून साकारलेली ही रागमाला आपणाला नक्कीच आनंद देईल याची खात्री आहे.
प्रतिक्रिया
दुवा ऐकू येत नाही..
कत्यार काळजात घुसली!
कत्यार काळजात घुसली!
धन्यवाद