>>em>अमानवीय गांधीवादी,
भावना पोहोचल्या.
एक नम्र विनंती, वैयक्तिक लिहू नका. इथे सर्वे जन संयमित भाषेत लिहित असतो.
जर वाचेची लगाम सोडली तर मिपाचे 'संसद' व्ह्यायला एक दिवसही लागणार नाही.
>>तुम्ही इथे कौलांवर कौले काढून काही होणार आहे का?
तुम्हाला काय वाटते. काय होईल ?
दुसर्या क्वालिफिकेशनचा कोणी पंतप्रधान अजूनपर्यंत झालेला नाही.
ही क्वालिफिकेशन असूनही अडवाणींना/लालूंना/मुलायमसिंगांना अजून पंतप्रधान होता आले नाही. (त्यांच्याकडे अमाप पैसा होता/आहे याबाबत माहिती नाही).
पवारांकडे पहिली दोन्ही क्वालिफिकेशन्स आहेत.
वरुण गांधींकडे तिनही क्वालिफिकेशन्स आहेत. पण या असंगाशी संग केल्यामुळे याजन्मी तरी ते पंतप्रधान होतील असे त्यानासुद्धा वाटणार नाही.
(प्रथेप्रमाणे आमचा एक छोटेखानी लेख.) एकूण प्रतिक्रिया १५.
सर्प्रथम मला एक स्पष्ट करून द्यात कि 'घराणेशाही वाईट आहे' असे मी म्हणत नाही. पण 'घराणेशाही नाही' असे कोणीही कितीही स्पष्टीकरण दिले तरी मी मानणार नाही. 'पात्रता असणे' आणि 'पाठीशी पुरेसे बळ' असणे ह्यात जमीन आस्मानचा फरक आहे. हे मी वेळोवेळी माझ्या प्रतीक्रीयामधून दर्शविलेले आहे.
आज पंतप्रधान होण्यासाठी, बॉलीवूड मध्ये हिरो हिरोईन होण्यासाठी , क्रिकेट मध्ये चमकण्यासाठी, अजून बर्याच क्षेत्रात लाखो/करोडो तरुण-तरुणींची पात्रता असेल, पण समान संधी आहे काय ? ह्याचे प्रामाणिक उत्तर द्यायचे झाले तर त्याचे 'नाही'असेच द्यावे लागेल.
घराणेशाही मुळेच घरातील नवीन सदस्याला लहानपणापासूनच त्या क्षेत्राचे विस्तृत धडे मिळतात, जे मिळविण्यासाठी कित्येकांना वर्षानुवर्षे अनेकांचे उंबरे झिझावावे लागतात. ते करून सुद्धा ज्ञान प्राप्त होईल कि नाही, हि शंका असतेच. कोणत्याही क्षेत्रात लागणारे 'अत्यंत महत्वाचे' असे शिक्षण हे प्रत्येक कॉलेजात मिळतेच असे नाही, अन्यथा प्रत्येक मेकॅनिकल विद्यार्थ्याने पदवी मिळताच स्वताची फॅक्टरी चालू केली असती. पण त्याला आयुष्याची पहिले १०/१५ वर्षे हे दुसर्या माणसाकडे नोकरी करून , सगळे अनुभव पणाला लाऊन पुढील पाऊले उचलावी लागतात. हे सर्व करून सुद्धा कायम डोक्यावर कोणाचा न कोणाचातरी हात असावा लागतोच, नाहीतर गुंड, पोलीस, कायदा ह्यांचा ससेमिरा कधी मागे लागेल हे सांगता येत नाही.
घरातूनच बाळकडू मिळण्याने एका व्यक्तीला त्या विशिष्ट क्षेत्रात पारंगत व्ह्यायला पर्यायाने कमी कष्ट घ्यावे लागतात, त्यातून ती व्यक्ती ठराविक भागावर लक्ष केंद्रित करून, अजून त्यात अधिकाधिक प्राविण्य मिळवू शकते. तिचा फायदा ती स्वतःला तसेच समाजाला करून देऊ शकते. उदा: ज्यांचे पालक डॉक्टर असतील अशा विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्यासाठी(झाल्यानंतर) कायम मदतीचा आणि हक्काचा एक हाथ सहज उपलब्द असतो. इथे हक्काचा आणि सहजतेने हे अतिशय महत्वाचे आहे. आणि त्याच्याच बरोबर त्या क्षेत्रातील उतार-चढाव हे देखील अगोदरच बघितले असल्याने ती व्यक्ती लवकरच डॉक्टरकि क्षेत्रात पारंगत होऊन स्थिर होऊ शकते. एखाद्या नवीन विद्यार्थ्याला मात्र ह्या क्षेत्रातील उतार-चढाव स्वत अनुभवावे लागतात, कदाचित ह्या उतार चढावात त्याची नौका बुडू सुद्धा शकते, आयुष्यभराचे कष्ट वाया जाऊ शकतात. प्रयत्नांना योग्य दिशा, त्या दिशेने निरंतर प्रवास हि हमी घरातल्या व्यक्तीं मुळेच मिळू शकते. अशीच उदाहरणे अनेक क्षेत्रांबाबत देता येतील. त्यामुळे खरे तर घराणेशाही एक प्रकारे चांगलीच आपण म्हणू शकतो. कारण ह्यामुळे प्रयत्नांना योग्य दिशा देऊन समाज हित साधले जाऊ शकते. (कधीकधी घराणेशाही मुळे मुलांवर अतिरिक्त अपेक्षेचे ओझे लादले जाते, त्यातून कदाचित अघटीत सुद्धा घडू शकते, पण हा मुद्दा वेगळा. )
आता मूळ मुद्द्याकडे वळूया.
माझ्या मते राजकरणात करियर करण्यासाठी इतर सर्व क्षेत्रांपेक्षा जास्त बुद्धिमत्ता लागते आणि जितका कस इथे लागतो तो अजून कोणत्याही क्षेत्रात लागत नाही. आपण जे काही निर्णय आज घेतो ते उद्याच्या इतिहासात नोंदविले जातात. आपले घेतले गेलेले निर्णय हे संपूर्ण समाजावर दीर्घकालीन परिणामकारक ठरतात. सरकारतर्फे ह्या क्षेत्राची जाहिरात करण्यात येते कि 'तरुणांनी पुढाकार घेऊन राजकारणात प्रवेश करावा', सज्जन / चागल्या लोकांनी ह्या क्षेत्रात भाग घ्यावा. पण निरीक्षण केले असता,दिसून येते कि, हे क्षेत्र घराणेशाही पासून सुटलेले नाही. सरकारने (समान संधी उपलब्द न करता) कितीही जाहिरात केली तरी, कोण ह्या क्षेत्रात येण्याच्या फंदात पडत नाही. आज सर्व लोकांना माहित आहे कि, राजकारणात उतरणे हे केवळ खर्चिकच नाही, तर जीवितास धोक्याचे सुद्धा आहे. तसेच ह्या क्षेत्रात लागणारी ताकत आणि क्लिष्टता हि दिवसेंदिवस वाढतच चालेलेली आहे. नवीन तरुण याला समर्थपणे तोंड देऊन इथे भवितव्य करणे निव्वळ अशक्य.
म्हणून ह्या क्षेत्रात घराणेशाहीने आपली बीजे भक्कम रोऊन ठेवलेली आहेत. ते चांगले कि वाईट हा मुद्दा वेगळा.
प्रतिक्रिया
अमानवीय गांधीवादी, तुम्ही इथे
>>em>अमानवीय गांधीवादी, भावना
In reply to अमानवीय गांधीवादी, तुम्ही इथे by परिकथेतील राजकुमार
एक नम्र विनंती, वैयक्तिक लिहू
In reply to >>em>अमानवीय गांधीवादी, भावना by गांधीवादी
दुसर्या क्वालिफिकेशनचा कोणी
तिसरा पर्याय
In reply to दुसर्या क्वालिफिकेशनचा कोणी by नितिन थत्ते
पवारांकडे पहिली दोन्ही
In reply to दुसर्या क्वालिफिकेशनचा कोणी by नितिन थत्ते
संपादक संपादक मला वाचवा
सप्रेम भेट
भेटीबद्दल धन्यवाद. पण आम्ही
In reply to सप्रेम भेट by सुनील
(प्रथेप्रमाणे आमचा एक