कोकणचा सुपुत्र हरवला..

Primary tabs

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
1 Oct 2007 - 8:03 am
गाभा: 

जेष्ठ रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी यांना मिसळपाव परिवारार्फे विनम्र आदरांजली!

आमच्या कोकणचा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र हरवला!

तात्या.

प्रतिक्रिया

सहज's picture

1 Oct 2007 - 8:09 am | सहज

मला मालवणी/कोंकणी समजत नसून टीव्हीवर मच्छिंद्र कांबळी यांचा कार्यक्रम मात्र आवडीने बघायचो. तसे लवकरच गेले म्हणून जास्त वाईट वाटते आहे.
इथे भरपूर दु:ख असताना देखील परमेश्वर लोकांना रमवणार्‍या मंडळींना का बरे लवकर नेतो? देवालापणा दु:ख आहेत वाटते.

परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

राजे's picture

1 Oct 2007 - 8:17 am | राजे (not verified)

विनम्र आदरांजली!
परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

राजे
(*हेच राज जैन आहेत)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Oct 2007 - 8:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मालवणी नाटकाचो बादशाहो गेलो...! या बातमीने जरा धक्काच बसला !
मालवणी रंगभुमी आणि भाषा म्हटले की, मच्छिंद्र कांबळीच आठवतात !

कोकणच्या पुत्राला आमची विनम्र आदरांजली !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विकास's picture

1 Oct 2007 - 8:25 am | विकास

आत्ता ही बातमी वाचली आणि धक्का बसला... माझ्याकडूनही विनम्र आदरांजली.

प्रमोद देव's picture

1 Oct 2007 - 8:28 am | प्रमोद देव

मालवणी भाषा ही अतिशय गोड भाषा आहे आणि तिचा लहेजाही तितकाच चित्तवेधक आहे. मला ही भाषा तितकीशी कळत नसली तरी तिची ओळख मात्र "वस्त्रहरण" पासूनच झाली आणि ऐकायला खूप आवडते.. मच्छींद्र कांबळींना माझीही आदरांजली.

नंदनला एक विनंती की त्याने मालवणी भाषेत ह्या "तात्या सरपंचाला(मच्छींद्र कांबळींना)" एक छानसा लेख लिहून श्रद्धांजली वाहावी.

नंदन's picture

1 Oct 2007 - 2:18 pm | नंदन

मच्छिंद्र कांबळींना माझीही विनम्र श्रद्धांजली. धनंजयरावांनी म्हटल्याप्रमाणे मालवणीच्या कक्षा महाराष्ट्रात आणि राज्याबाहेरही रुंदावण्याचे काम त्यांच्या नाटकांनी केले. पटकथांत विशेष दम नसलेली अनेक नाटकेही त्यांनी आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने पेलून धरली होती.

(प्रमोदकाका, एखादा लेख लिहिण्याइतपत माझ्याकडे खरंच माहिती नाही. एखाद्या वृत्तपत्रीय लेखाच्या अनुवादाचा प्रयत्न करतो.)

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय's picture

1 Oct 2007 - 8:33 am | धनंजय

मालवण नागपुरापर्यंत नेणारा गुणी कलाकार! एकसष्ट म्हणजे किती लहान वय हे. प्रथमावताराच्या प्रत्येक घासाबरोबर मच्छिंद्र आमच्या आठवणीत राहातील.

सर्किट's picture

1 Oct 2007 - 10:02 am | सर्किट (not verified)

मालवण नागपुरापर्यंत नेणारा गुणी कलाकार!

अगदी अचूक बोललात धनंजय !

फार्स ची व्याख्या म्हणून वस्त्रहरणाकडे बोट दाखवता येईल. यदाकदाचित हे कालपरवाचे हिट नाटक हिट का झाले याचा खुलासा वस्त्रहरणातून होतो.

- (दु:खी) सर्किट

गुंडोपंत's picture

1 Oct 2007 - 9:38 am | गुंडोपंत

मोठा धक्का बसला!
त्यांच्या जीवनकार्यावर येथे जाणकारांकडून एक सविस्तर लेख येईल ही अपेक्षा.
आपला
गुंडोपंत

माधवी's picture

1 Oct 2007 - 2:48 pm | माधवी

मच्छिंद्र कांबळींना माझी आदरांजली. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

प्रमोद देव's picture

7 Oct 2007 - 10:48 pm | प्रमोद देव