हसत खेळत चीनी भाषा शिका, व त्यांच्या स्वागतास तयार राहा.
आजकाल मी 'आपण गेली काही दिवस काही दिवस रोज एकेक इंच मागे सरकतो आहे', अश्या बातम्या ऐकत आहे. आणि त्यातच आता मला 'नुकत्याच मिपावर झालेल्या चर्चेनुसार' सैनिकांवर जो काही उरला सुरला विश्वास होता तो देखील संपला.
मग आता काय ? आपल्याला दारात आरती घेऊन चीन पाकड्याचे स्वागतास कधी सज्ज व्हावे लागेल सांगता येत नाही. रात्र रात्र झोप देखील लागत नाही, कि कधी दारावर थाप पडते आणि एखादा चीनी दर ठोठावून म्हणेल कि "नि हाव". पाकाद्यांची उर्दू थोडी फार समजते पण हे चीन्यांचे बोलणे माझ्या सारख्या सामान्यांना कसे समजणार ? तर मी गुगल बाबाला साकडे घालून काही चीनी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
नाहीतरी चीनी हे महासत्ता आहेतच. (चिन्यांनी त्यांच्या कोणत्यातरी एका शहराचे शांघाय सुद्धा केलेले आहे. माहिती आहे का ? ) आपण काही तज्ञांनी (विशेष करून ज्यांना चीनी भाषेबद्दल काही माहिती आहे ) भर घालून सगळ्यांना सोप्या भाषेत चीनी शिकण्यास मदत करावी.
तशी चीनी शिकण्यासाठी जालावर बरीच पुस्तके उपलब्ध आहेत, पण ऐनवेळी काही वाक्ये तोंडपाठ ठेवावी लागतील त्याची तयारी सुरु करूयात.
तर सुरुवात मी माझ्या पासून करत आहे.
मराठी शब्द.....................पर्यायी इंग्लिश शब्द....................चीनी भाषांतर
नमस्कार.............................. Hi, हेल्लो..............................नि हाव
आपण कसे आहात ? .............How are you ?........................नि हाव मा ?
मी ठीक/बरा आहे...................I am fine ............................. वो हेन हाव
ठीक आहे..............................OK .......................................होदा
हे चांगले आहे........................This is good .......................हाव ची
धन्यवाद...............................Thank You...........................शे शे
(धन्यावादाची) गरज नाही ..........Welcome ...........................बुयो काची
परत भेटू...............................See you soon ................... हेन काय जीन दाव नि
टाटा .....................................Bye bye .............................झाई जिआन
अवांतर :
मी गंप्याला सुद्धा शिकवायला सुरुवात केली . आमच्या गणप्याने मला विचारले, कि
राव हे चिन्यांनी जर भारताला ताब्यात घेतले तर काय करतील ते भारताचे ? मी म्हणालो, काही नाही, सगळ्यांना कामाला लावतील, पांढर्या लोकांकडून मस्त काम करून घेऊन त्यांच्या ढेर्या तरी कमी करतील.
त्याने परत एक विचारले ,
मग हे अतिरेकी वगेरे सगळे , त्यांचे काय होणार ? मी उत्तरलो, कि जर भारत चीनच्या ताब्यात गेला कि पाक काय संपूर्ण जगही डोळे वर करून बघणार नाही. ते अतिरेकी कीस झाड कि पत्ती ? एका सुद्धा अतिरेक्याची हिम्मत होणार नाही परत आत घुसायची. चीनचे राज्यकर्ते निषेध, तीव्र, कडक निषेध खलिते पाठवित नाहीत. डायरेक्ट म्याटर संपवून टाकतात.
त्याने शेवटचे प्रश्न विचारला
मग हे आपले ३३ कोटी देव, त्यांचे काय ?
मी म्हणालो, दे ना भाऊ सोडून, मुला-बाळांना, बाग-बगीचे, लोकांना काम, ठीक ठाक रोड, अन्न, चांगले जीवन मिळत असेल तर काय करायचे आहे ते देव देव, ना गणपती, ना नवरात्री, ना दिवाळी. ना आपले १५ ऑगस्ट २६ जानेवारीच्या दिवशीच्या ट्रिपा. ना त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण , ना त्यामुळे जालावर झडणाऱ्या चर्चा. चांगल्या जीवनापेक्षा हे देव, सन, उत्सव मोठे आहेत काय ?
त्याने परत विचारले कि हे चीनी भाई कधी येणार आहेत ?
मी म्हणालो कि रोज एकेक इंच येत आहेत.
ते स्पीड का वाढवत नाहीत ?
इथे येऊन पस्तावाणार तर नाय ना, कदाचित ह्याचा विचार करत असतील. अरे ते दमादमाणी पावले टाकतात राजा. घिसाड घाई करत नाहीत.
आपण इंग्रजांना १५० वर्षे चान्स दिलाच आहे आता चिन्यांना देऊन बघुयात ना, काय हरकत आहे ?
केलं त्यांनी भले तर ठीक नाहीतर आपण परत आपले अव्हिंसा नामक ब्रम्हास्त्र* टाकून त्यांना परतून लाऊ शकतो. नाही का ? त्या अस्त्राला संपूर्ण विश्वात काही तोड नाही. चीनी सुद्धा त्या शस्त्राला घाबरून पळून जातील. अरे हाय काय , नाय काय.
-------------------------------------------------------------------------------------------
*अव्हिंसा नामक ब्रम्हास्त्र केवळ आणि केवळ भारताकडेच आहे.
प्रतिक्रिया
नि हाव नि हाव मा ? वो हेन
हाव ची.
चिनी मुली सुंदर असतात का? वो
मला काय माहित ?
हाव ची
काय बरा हाव ना? संपूर्ण भारत
पहिल्याप्रथम अतिशय संयत भाषेत
खो खो खो ! बेस्ट !!!
उपरोधीक लेख आवडला. पण आपले
ए वन