गंभीर हास्य !!!
नमस्कार मंडळी.
हि लिंक बघा.
http://www.youtube.com./watch?v=gclosBcTgF8&feature=related
आपण यापुर्वी असल्या क्लिप्स बघितल्या असतील... मला तर हे सगळं फार फार करमणुकप्रधान वाटलं. पण नंतर काहि प्रश्न देखील पडले...
१) गेंड्याची कातडी म्हणतात ति हीच काय ???
२) आपण थेट रामायण कालापासुन ते शिवयुग, भारताचा स्वातंत्र्यलढ्यापर्यंत सर्व सर्व घटनांचा, कृतींचा पुरावा शोधत असतो, त्यावर वादविवाद करत असतो, अभ्यास करत असतो. इथे आजच्या म्हणता येईल इतक्या ताज्या घटनेचे ढळढळीत सत्य राजरोसपणे संपूर्ण उलट पालट करुन ते लोकांच्या पचनी पाडण्यात येत आहे... उद्या याची ऐतिहासीक संदर्भ म्हणुन कोणी नोंद घेतली तर कसाबच्या कृत्याचे चित्र त्याच्या नजरेत कसे असेल ??
३) आपले अभ्यासु मिपाकर, काळे काका, नेहमी म्हणत असतात कि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतापेक्षा खूप जास्त यशस्वी आहे... पाकिस्तानी मिडीयाच्या असल्या बातम्यांमुळे त्याला हातभार लागत असेल काय ?
४) भारताविरुद्ध हा जो पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद चाललाय त्याला केवळ तेथील लश्कर आणि आय्.एस्.आय जवाबदार आहे असं म्हटलं जातं. पण जर तेथील जनता अश्या बातम्या रोज बघत्-पचवत असेल तर तीही भारताविरुद्ध आकस बाळगुन नसेल काय ??
चला... फार गंभीर लिखाण झालं. तत्सम क्लीप पुन्हा एकदा बघतो आणि पोटभर हसुन घेतो कसा...
(हास्योत्सुक) अर्धवटराव
प्रतिक्रिया
मालक, दुवा उघडत नाहीये..
हॅहॅहॅहॅ. हा विडीओ आधी पण
आयला...
सोडून द्या
ती क्लिप मी तीनेक मिनिटं
दुसरी !!
खास करुन दुसरी आयटम आपल्याला
अरु मामु, हे पी टीवी वर रोज
अमेरीकेला लाथा घालता घालता पण
मला वाटले
ये क्या मजा है मिंया !!