२६/११ आणि सलमानची माफी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=100307:2010-09-12-17-51-42&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104
सलमान खानने असे विधान केले होते की २६/११ चा हल्ला हा पंचतारांकित हॉटेलांवरही झाला त्यामुळे त्याचा जास्त गाजावाजा झाला. त्या आधी अनेक हल्ले झाले, बाँब फुटले पण त्याला इतकी प्रसिध्दी मिळाली नाही.
काही प्रमाणात हे नक्कीच खरे आहे. विशेषतः मेणबत्ती मोर्चा वगैरे प्रकार हे ह्या हल्ल्यानंतरच झाले आणि सनाजाच्या उच्चवर्तुळातील लोक ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे कारण की त्यांचा वावर असलेली ठिकाणे ह्या हल्ल्याकरता निवडली गेली.
मुंबईच्या स्टेशनावरील हल्ल्ला हा ही २६/११ चा भाग होता पण तो एका रात्रीच्या काही तासांपुरताच. बाकी भागातला हल्ला (ओबेरॉय, ताज, ज्यूइश सेंटर) कितीतरी दिवस चालू होता. त्यामुळेही ह्या पंचतारांकित स्थळे जास्त अधोरेखित झाली.
ह्या हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा थेट सहभाग नव्हता. (अर्थात नंतरच्या तपासात फारसे सहकार्यही नव्हते.) आपली सुरक्षायंत्रणा कमी पडली. अशी विधाने सलमानने केली आहेत आणि ती मलातरी पटतात.
मी काही सलमान खानचा फॅन नाही. पण इथे त्याचे काही चुकले नाही. त्याने माफी मागायची गरज नव्हती. असे मला वाटते.
तुमचे काय मत?
प्रतिक्रिया
'सरकारला सामान्य जनतेच्या
बिलकुल गरज नव्हती...
सलमानसारख्या मान्यवर
राज ठाकरे यांनीही सलमानच्या
फुकटच्या पब्लिसिटीचा फायदा सिनेमासाठी
"त्याने माफी मागायची गरज
अहो पण...
अगदी अगदी!
हा दुवा