मूळ लेखकाला म्हणजे ???
हे वन लाईनर " शब्दमेघ" या माझ्या ऑर्कुट प्रोफाईल ने २ वर्षापासुन बर्याच कम्युनिटी वरती लिहिलेले /दिलेले आहे .
उलट तुम्हीच कोणी तुम्हाला आधी दाखवले ते सांगावे .
-
काही ही विचार न करता रिप्लाय देने बंद करावे...
एक कादंबरी सध्या लिहित आहे ... त्यामधेय यातील बरेच वन लाईनर आहेत .
तुम्ही रिप्लाय दिलाय म्हनुन मुळ लेखक जे तुम्ही म्हणत आहेत त्यांचे नाव द्या..
आणि तुम्ही तसे करु शकणार नाही कारण हे मी पहिल्यापसुन लिहिलेले आहे.
असो . मला राग आलाय .. शांत राहतोय तरीही .. कारण मिसळ पाव वरील सुरुवात मला भांडनाने नाही कराय्ची ..
गणेशा ( ९९८७६७३३३२)
माझे सर्व लेखन अनुभवा वरुन असले तरी त्या मध्ये वन लाईनर लिहिने हे मी व.पुं च्या कथा/ कादंबरी मुळे शिकलो आहे .
आणि विस्म्रुतीत जाणार्या कवितांपेक्षा विचारांचे सरळ वर्णन वन लाईनर मध्ये करणे आवडले म्हणुन येथे देत आहे.
ह्या वाक्यांमुळे कदाचीत स्वानंद ह्यांचा गैरसमज झाला असावा गणेशा शेठ. चिडायचे काय येवढे त्यात ? आणि मिपावर सुरुवातच नाही, तर मध्य आणि शेवट पण भांडणाने करु नका. त्याचे अधिकार वेगळ्या लोकांकडे आणि त्यांच्या वेगळ्या आयडींकडे आहेत.
गैरसमज असल्यास माझा राग मागे घेतो [:)]
परंतु राग येणे स्वाभिविक आहे .
मी पुरुष बिच्चारा , मुंबई .. माझी तू त्याची होताना अश्या माझ्या अनेक कविता चोरुन लोक त्यान्च्या नावाने टाकतात .
आणि मी कधी लिहिल्या त्या तर मलाच बोलतात मुळ कवि सांगा आधी .
येथे ही तसेच म्हणुन जास्त राग आला.
माझ्या एका कथा वजा कादंबरीचे काहीच भाग
२००८ मध्ये मनोगत वरती दिले होते
त्या मध्ये तेंव्हा ही वरील लिस्ट मधील वन लाईनर आलेले आहेत
लिंक देतो येथे : भाटमळ वाडी -- http://www.manogat.com/node/13451
जमल्यास बघावे ..
जास्त बोललो असलो तर शमस्व
परंतु खालील वाक्य हे असल्याच अनुभवा वरुन आहे .
""कलाकार हा त्याच्यावर झालेले वार सहन करु शकतो, परंतु त्याच्या कलेवर झालेले वार त्याच्या ह्रद्याच्या ठिकर्या उडवून जातात.." -- शब्दमेघ ( गणेशा )
श्री. गणेशा,
खरंच मी दिलेल्या प्रतिसादाचा विपर्यास झालाय. सर्वप्रथम, मला असे वाटले की हे वन लाईनर्स हे तुम्ही वाचलेल्या वेगवेगळ्या पुस्तकातील तुम्हाला आवडलेल्या वाक्यांचा संग्रह आहेत. तेव्हा आता तुम्हाला मी असा प्रतिसाद का दिला आहे ते लक्षात येईलच.
मी तुमच्या वन लाईनर्स चा पहिला भाग वाचला नव्हता, त्यामुळे त्याची पार्श्वभूमी मला माहित नव्हती. मिसळ्पाव वर जास्त वेळ येता येत नाही त्यामुळे सर्व लेख वाचणे शक्य होतेच असे नाही. असो.
तुमच्या पुढील लेखनाला शुभेच्छा. ( कादंबरी ला देखील ).
वाद राहू द्या हो...
चांगल्या लिखाणाचे कौतुक तर होउ द्या...
सगळे वन लाइनर आवडले... उत्तम...
मस्त... मस्त... मस्त...
तुमच्याच शब्दांत,
"प्रत्येक वर्तमान हा कालांतराने भुतकाळ होत जातो,
परंतु त्याचा इतिहास बनवणे हे प्रत्येकाच्या मनगटात असते."
सो कीप इट अप... चांगले लिखाण चालू ठेवा...
कादंबरीसाठी शुभेच्छा...
"प्रेम हे प्रखर असते, त्यामुळे कधी कधी त्याची प्रखरता डोळ्यासमोर धुसरता निर्माण करते"
हे थोडंसं वाचताक्षणी वेगळं वाटलं...
मी म्हणेन, "प्रेम व्यक्त करताना मांडल्या जाणार्या भावना, विचार प्रखर असतात... कधी कधी त्याची प्रखरता डोळ्यासमोर धुसरता निर्माण करते"
त्यावर एक वन लाईनर...
"आपले विचार प्रखर असण्यापेक्षा ठाम असावेत... प्रखर विचारांमुळे समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर धुसरता निर्माण होते अन तो म्हणावा तितका विचार करत नाही..."
ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे "राजकारणी"...
ते आपले (किंबहुना पक्षाचे) विचार प्रखरतेने मांडतात आणि यावर कार्यकर्ते कधीच विचार करत नाही...
अन मग राजकारणी ठाम नसलेल्या मतांवर पलटवार करतात...
बापरे... मी तर प्रेमावरून एकदम राजकारणावर गेलो...
असो... भावना पोहोचल्या अशाव्यात अशी आशा करतो...
आपल्याच भाषेत ..
विचार हे प्रत्येकाच्या मनात असतात .. आणि प्रत्येकाच्या विचारांचा रीस्पेक्ट करणे हे आपल्या मनावर असते
त्याप्रमाणे .. आपले विचार आवडले .
प्रत्येक विचाराची दिशा, अनुभव किंवा त्यावेळेसची परिस्थीती ठरवते.
त्यामुळे आपले विचार आवडले ..
आणि प्रेमाचे म्हणाल तर ते राजकारणावरुनच काय जगात कोठे ही फिरुन येते .. फक्त मनाच्या संवेदनांचे पंख त्याला हवेत.
मी पुरुष बिच्चारा , मुंबई .. माझी तू त्याची होताना अश्या माझ्या अनेक कविता चोरुन लोक त्यान्च्या नावाने टाकतात .
..याचा राग मिपाच्या बिच्चार्यांवर कां काढतांय राव!..
वाचक हे लेखकांचे मायबाप असतात...
प्रतिक्रिया
हे वन लाईनर्स संदर्भासह दिले
तुमच्या रिप्लाय्चा खेद आहे.
माझे सर्व लेखन अनुभवा वरुन
धन्यवाद
श्री. गणेशा, खरंच मी दिलेल्या
धन्यवाद ..
वाद राहू द्या हो...
प्रेम हे प्रखर असते, त्यामुळे कधी कधी त्याची प्रखरता डोळ्यासमोर
छान
मी पुरुष बिच्चारा , मुंबई ..
जन्माचार्य .. चालायचेच