नुस्ता लॅपटॉप घ्यायचा आहे असे सांगून कसे सांगणार नक्की कुठला घ्या ते.. तुम्हाला नेमका कशासाठी (म्हणजे फक्त करमणूक करण्यासाठी हवा आहे की त्यावर काही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट साठी हवा आहे की नुसताच नेट सर्फींग साठी हवा आहे.) हे कळल्याशिवाय अमका घ्या हे म्हणणे/ठरवणे चुकीचे होईल, म्हणून 'अन्य' ला मत दिले आहे.
तोशिबा, एल जी आहेत आणि डेलचं नावच नाही?
डेल ची स्टुडीओ किंवा वोस्ट्रो सिरीज पण बघा.
माझ्याकडे गेली ३ वर्षे एसर आहे. मस्त चाललेला आहे. अतिशय कमी तापतो दिवसभर चालू ठेवला तरी. ( त्यामानाने लिनोव्होचा खूप तापतो. एच पी चा सुद्धा चांगलाच तापतो). वेब कॅम सर्वात भारी. एच पी, डेल वगैरेला मागे टाकतो. फक्त इनबिल्ट स्पीकरचा आवाज थोडा कमी आहे.
(आता नवीन घेताना डेल वोस्ट्रो बघतोय कारण त्यात टचस्क्रिन येणार आहे असं ऐकतो.)
लॅपटॉपचे मॉडेल निवडताना चोखंदळपणा आवश्यक.
आपल्या गरजा कागदावर लिहून काढा.
त्यानंतर लॅपटॉप निवडा.
त्या लॅपटॉप मध्ये आपल्याला आवश्यक सुविधां व्यतिरिक्त आणखी काही सुविधा असाव्यात, ज्यांची गरज आपल्याला नजीकच्या भविष्यात लागेल.
लॅपटॉपचे मॉडेल आपल्याला किमान ५ ते ७ वर्षे साथ देईले असे असावे. नाहीतर एखाद वर्षात लेपटोप आउटडेटेड होईल.
लॅपटोपची दुरुस्ती महाग असते, त्यामूळे थोडे ज्यास्त पैसे गेले तरी चालतील परंतु, उत्तम लॅपटॉप घ्यावा.
गेल्या १५ वर्षांत मी तीन लॅपटॉप घेतले (कंपनीच्या खर्चाने) . तीनही तोशिबा.
मी प्रत्येक लॅपटॉप आउटडेटेड होई पर्यंत वापरतो. तोशीबाला तोड नाही.
प्रतिक्रिया
एच पी
मला वाटते..
In reply to एच पी by स्वछंदी-पाखरु
अॅपल..
तोशिबा, एल जी
सफरचंद!!!
लॅपटॉप..