गाभा:
आमच्या वेळी टूथ ब्रश हि कल्पना फारशी प्रचलित नव्हती..घरी तयार केलेल्या राखुंडी..वा कापूर..तुरटी घालून वस्त्रगाळ
केलेल्या कोळशाच्या पावडरने बोटाने दात घासत असू..
हळूहळू काकडे.पोरवाल..बि ट्को .माकडछाप काळी टूथ पावडर बाजारात आली ..
व लोक त्या पावडरने लोक पण बोटाचा वापर करून लोक दात घासत असत..
पुढे टूथ पेस्ट व ब्रश प्रचलित झाला..कोलगेट व म्याक्लीन ह्या दोन पेस्ट बाजारात होत्या..
हल्ली तर पेस्ट व ब्रश यांचे अनेक प्रकार बाजारात आले असून प्रत्येक चानल वर ...ओठांची महीरप,करे मम मनांस दंग.
आत असे दंतपंक्ती कि शुभ्र मोत्याची रांग... असे गोड कोडे पडेल अश्या सुंदरी त्यांच्या जाहिराती करत आपणास दिसतात...
मला तर बोटाने दात घासणे पसंत आहे..
आपण कशाचा वापर करता? बोट कि ब्रश ?
प्रतिक्रिया
29 Aug 2010 - 4:10 pm | योगी९००
मलाही हाच प्रश्न पडतो..पण ते मोबाईलच्या स्क्रिनवर paint करताना..
टचस्क्रिनवर बोट वापरून चित्र काढावे की ब्रश(stylus) वापरून..?
आपण कशाचा वापर करता? बोट कि ब्रश ?
29 Aug 2010 - 4:16 pm | प्रचेतस
मला काडया घालायला आवडतात--दातांमध्ये.
तुम्हांस बोटाने दात घासावयास आवडतात पण कुठल्या बोटाने आणि कुठल्या हाताच्या? धुत्या का जेवत्या?
आणि बोटाचा वापर करतांना पावडर कुठली वापरता? काळी, पांढरी का लाल? का पावडरच वापरत नाहीत? फक्त बोटेच वापरता?
29 Aug 2010 - 4:47 pm | इंटरनेटस्नेही
अतिशय उच्च लेखन!
29 Aug 2010 - 5:44 pm | विकास
अतिशय उच्च लेखन!
सहमत!
बाकी "आमच्या वेळीही" ब्रश प्रचलीत नव्हते. पण काय म्हणणार काळाचा महीमा, अधुनिकतेने नुसते घेरले आहे. :( आता बोट का ब्रश हा मला पडत नाही, मी रात्री सरळ दात डिशवॉशरमधेच ठेवतो, सकाळी, चकाचक!
29 Aug 2010 - 6:35 pm | अमोल खरे
एक क्षणभर प्रतिक्रिया कळलीच नाही.........सहीच प्रतिक्रिया. :)
29 Aug 2010 - 10:26 pm | नितिन थत्ते
>>आता बोट का ब्रश हा मला पडत नाही, मी रात्री सरळ दात डिशवॉशरमधेच ठेवतो, सकाळी, चकाचक!
_/\_ उच्च
29 Aug 2010 - 5:08 pm | अनिल हटेला
प्र का ट आ
29 Aug 2010 - 7:12 pm | निखिलेश
माझे आजोबा आहेत., ८५ वर्षाचे! हल्ली त्यान्नाही हाच प्रश्न पडतो.
29 Aug 2010 - 10:40 pm | कवितानागेश
पावसाळ्याचे दिवस आहेत.
हा विषय कौलांसाठीच बरा.
(...माझ्या मेन्दूला तर झिणझिण्या आल्या या गहन प्रश्नावर विचार करता करता.)
29 Aug 2010 - 11:57 pm | भीडस्त
दात घासण्यासाठी बोटांमधे धरुन ब्रश वापरतो.
30 Aug 2010 - 12:02 am | मी-सौरभ
दोन्ही ...
कौलारु घर बांधायला घ्या..
30 Aug 2010 - 9:36 am | शेलार मामा मालुसरे
सकाळ मध्ये लोकल आणि ग्लोबल सदरामध्ये आलेल्या फ.मु.शिंदे यांच्या लेखनाची ही चोरी आहे.
निषेध !!