अफजल- कसाब पेक्षाही भयावह
संसदेवरील हल्ल्याचा सुत्रधार मोहमद अफजल गुरु याचा दयेचा अर्ज अद्याप राष्ट्रपती भवनापर्यंत पोहचला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.माहितीच्या अधिकाराचा वापर करून पत्रकार अमन शर्मा यांनी ही माहिती उघडकीस आणली आहे.काही प्रमुख वृत्तपत्रातून या बाबत छापून आले आहे.समस्त भारतीयांची क्रुर चेष्टा अशा भाषेत या घटनेकडे पाहावे लागेल. दिल्लीच्या राज्यपालांनी अफजल गुरु याचा दयेचा अर्ज २ महिन्यापूर्वी गृहमंत्रालयाकडे पाठविला.यात अफजलची याचिका रद्द करून फाशीच द्यावी अशी शिफारस राज्यपालांनी केली.परंतू अर्ज अद्याप राष्ट्रपती भवनापर्यंत पोहचला नाही.२००६ सालापासून अफजल गुरुची फाईल दिल्ली सरकारकडे पडून होती.ज्या अफजल गुरुच्या दयेच्या अर्जावरून राजकारण चालले आहे.जनता भडकलेली आहे.त्याची सत्यस्थिती जनतेपुढे इतकी वर्षे का आली नाही कि तशी जरूरी कोणत्याही सरकार अथवा राजकारण्यांना वाटली नाही.संसदेवरील हल्ल्याचा सुत्रधारालाच पाठीशी घालणारे खरे सुत्रधार संसदेत, विधानभवनात तर नाहीत ना ?.अफजल गुरुची फाईलसंदर्भात गृहमंत्रालयाने दिल्ली सरकारकडे १६ वेळा स्मरणपत्रे पाठविली.याबाबत शिला दिक्षित यांनी तात्कालीन गृहमंत्री शिवराज पाटिल यांच्या सुचनेनुसार फाईल केल्याने विलंब झाला असे उत्तर दिले.याच शिवराज पाटिलांनी वृत्तवाहीन्यांजवळ बोलतांना अफजल गुरुच्या अगोदरही अनेक अर्ज राष्ट्रपतींकडे असल्याचे सांगितले होते.त्यांना अफजल गुरु याचा दयेचा अर्ज अद्याप राष्ट्रपती भवनापर्यंत पोहचलेला नाही हे माहीत नसावे का ?. अफजलनंतर कसाब ...या सर्वांपेक्षाही भयावह अशी आपली राजकीय व्यवस्था झालेली आहे. ही तुम्हा आम्हा भारतीयांची चेष्टा नाही का?
प्रतिक्रिया
आता तर अस वाटतय की त्या
+१००१ टक्के शयमत
फायील वेळेवर पोचून देखील काय फायदा होणार नाय !
दिशाभूल
>> किरकोळ अतिरेक्याच्या
निष्कर्श ??
माझ्या तुमच्या जुळता
तोमार शूर ......
मला वाटते राष्ट्र्पतीनी इतर काही कामे करण्यापेक्षा....
चुकचुक (पाल करते ती)
वाय्फल
त्रास करून घेऊ नका
कसाब साहेब ह्या महान लोकशाहीत
देव करो आणि असे न होवो!
Mumbai attacks: Kasab gets
अफजलला माफ करा
सारखे सारखे भरपूर खर्च काय
माननीय कसाब साहेबांचे अजुन काही पराक्रम
पोलिसांकडे हत्यारे नसल्यानेच कसाब जिवंत
माननीय कसाब साहेबांना भारतीय