दगड
दगड.........
दगडांना आपणच देव बनवतो,
दगडांनी एकमेकां ची टाळकी फोडतो,
दगडांनी ठेचून कुणी बळीहि घेतो,
अन दगडाच्या देवालाच अर्पण करतो.
दगड जोडून सेतू बनतो,
दगड आकारून ताजमहाल घडतो,
दगड तोडून कुणी बावरी खणतो,
आज काश्मिरात दगड बॉम्बहि होतो,
घडवणारे,जोडणारे, अन विध्वंसक,
हात मात्र सारखेच असतात,
“ माणूस ” जातीतील,
माणसाचेच असतात.
दगडांच आपलं बरं असते
भल्याबुऱ्याची त्यांना जाण नसते
विध्वंसक हातांच डोकं मात्र
“ जाणत्या ” पुढारयांकडे गहाण असते.
निरंजन वहाळेकर
अतिशय चांगली कविता. सुन्दर
आभार ! ! !
अतिशय सुंदर कविता...
सुरेख कल्पना
धन्यवाद ! ! !