झाड आणि माकड
"चांगल्या झाडावर माकड बसते"
संदीपचे ते शब्द मला आजही बर्याचदा आठवतात.
संदीप माझा समवयस्क माझ्याच कंपनीत सारखेच काम करणारा सहयोगी.
"चांगल्या झाडावर माकड बसते" हे त्याचे निश्कर्ष.
तो म्हणायचा की एखाद्या जोडप्यापैकी एकजण अगदी रुबाबदार असेल तर दुसरा/दुसरी एकदम फडतूस असतो/असते.
तरतरीत चालणारी देखणी बायको आणि तिच्या सोबत पाय घसतत चालणारा मेंगळट नवरा.
स्मार्ट रुबाबदार नवरा आणि त्याच्या सोबत वेंधळी बायको.
मिठ्ठास बोलण्यात साखर पेरणी , हजरजबाबी असणारा नवरा आणि बहुतेक वेळा अबोल किंवा बोललीच तर कुजकट बोलणारी त्याची सहधर्मचारणी.
समजूतदार नवरा आणि सतत तोंड चालवणारी त्याची पत्नी.
आग्यावेताळ नवरा आणि स्वभावाने मृदू सालस बायको.
काळ्यासोबत पांढरे असावे अशा कॉन्ट्रास्ट जोड्या नेहमी पहाण्यात येतात. त्यांचे संसारदेखील सुखात चालत असतात.
नवरा आणि बायको दोघेही कर्तबगार रुबाबदार देखणे अनुरूप आहेत असे चित्र फार क्वचित दिसते.
माझ्या पहाण्यात असे काही पतीपत्नी आहेत पण बहुतेकदा त्यांचे एकमेकांचे इगो इतके स्ट्रॉन्ग आहेत की त्यांचे संसाराचा गाडा कधी कोलमडेल ते सांगता येत नाही.
चांगल्या झाडावर माकड बसते हा निश्कर्ष या अशाच निरीक्षणातून आलेला.
दिल्लीत रहात असताना त्याने हे रस्त्याने जाणार्या तरूण जोडप्यांसंदर्भात दाखवून दिले.
रस्त्याने जाणार्या ८०% जोडप्यातील मुलगा किंवा मुलगी हे एकमेकाना अनुरूप तर सोडाच काळ्या सोबत पांढरे असावे इतके दिसण्या वागण्या बोलण्यात एकमेकाना विरूप होते.
हे असे का होत असावे. बहुधा विरुद्धा धृवांचे आकर्षण असावे.
गरीब मुलीला श्रीमन्त मुलाचे आकर्षण , देखण्या मुलीला काळा तेल्या बावळट तरूण आवडतो
तरुणांचेतारुण्यसुलभ म्हणून एकवेळ जाऊद्या
पण चाळिशीच्या आसपास असलेल्या जोडप्यात सुद्धा अशी विरुपता आढळते.
एकाच वेळेस नवरा आणि बायको दोघे रुबाबदार देखणे कर्तबगार असे का नसतात. एक जण झाड आणि दुसरा माकड असतो.
"चांगल्या झाडावर माकड बसते" हे संदीपचे बोलणे मला या मुळे नेहमीच आठवते.
माझ्या बाबतीत हे मी ताडून पाहिले .... आम्ही दोघे आलटून पालटून झाड आणि माकड हे रोल प्ले करत असतो.

प्रतिक्रिया
मथळा वाचून असे वाटले की
माकड असल्याचा फायदा
सही चुकली रे
सापेक्षता आहे.
हा हा हा ...
माकड शिकाउ आहे. माफी असावी.
सही चुकली रे! सहमत. -
सही चुकली रे! सहमत. -
निराशा
व्वा!
खीक .... परायक प्रभु
लेख आवडला थोडाफार पटलाही.
विजुभौ, निरिक्षणाशी सहमत आहे.
आपका हुकूम सर आंखोपर सरजी
एकदम सही लेख लिहला आहे.
लेखाशी एकदम बाडिस!
फोटो
ते माकड आहे की माकडीण आहे हे
चालायचच...
इथल्या सगळ्या विवाहितांनी आपण
चांगल्या झाडाची व्याख्या काय