Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जागु on गुरुवार, 08/12/2010 - 15:09
जसे राम फळ, सीता फळ तसे हे लव फळ. हे मोठे झाड होते. ह्याची पाने रुंद मोठी असतात. लव फळ कच्चे असताना हिरवेगार साधारण पोपटी असे असते. मग पिकत गेल की पिवळसर रंग चढतो. आणि पिकले की एकदम गर्द नारंगी कलर (पिकलेल्या पपई सारखा) येतो. ह्याचे साल चरट अगदी पातळ असते. ह्यात गरा पेक्षा बियाच जास्त असतात त्या पांढर्‍या असतात. चविला हे फळ आंबट गोड असते. ह्याच्या बियांमुळे हे फळ खायच म्हणजे टाइमपास असतो. बराच वेळ बिया तोंडातच काढत खात बसायला लागते. कारण ह्याचा गर सिताफळाप्रमाणेच बीला चिकटलेला असतो. पण अगदी चिवटपणे. हे झाड माझ्या माहेरी अगदी आमच्या माळ्याच्या जिन्याच्या समोर आहे. शाळेत असताना मी सकाळी, संध्याकाळी जिन्यावर अभ्यास करत असे. त्यावेळी ह्या झाडावर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी ही फळे खाण्यासाठी येत. त्यात पोपट, चिमण्या, सुगरण, कोकीळा, कावळे, पोपटी रंगाचे पण चिमण्यांएवढे पक्षीही येत. ते दृष्य अगदी बघतच रहावेसे वाटे. झाडाला भरपुर फळे यायची. आम्ही काढून ती पक्षांनापण उरायची. कारण हे फळ जास्त परिचित नसल्याने इतर लोकांकडून ह्या फळासाठी डिमांड येत नसे. पण ज्यांना ह्याची चव कळ्ली आणि ज्यांना आंबट गोड वर्गातील फळे आवडता आणि जे हे फळ खाण्यासाठी वेळ देउ शकतात ते मात्र घेउन जायचे. माझ्याही लव फळ हे आवडीचे फळ आहे. मी ह्या फळाचा पाव भाग १५ मिनीटेतरी साधारण खात बसायचे. पण मला ह्याची चव खुप आवडायची. आता ह्या झाडाला पुर्वी सारखी फळे धरत नाहित. पण मागच्या आठवड्यात माहेरी गेले तेंव्हा अचानक नजर गेली लागलेल्या फळावर आणि तुमच्याबरोबर हे झाड, फळ शेअर कराव म्हणुन खालील फोटो तुम्हाला दाखवायला काढले. हे हिरवे कच्चे फळ हे पिकत आलेले फळ पण पुर्ण पिकलेले नाही. पिकल्यावर एकदम ऑरेंज कलर होतो.
  • Log in or register to post comments
  • 7533 views

प्रतिक्रिया

Submitted by स्मिता चावरे on गुरुवार, 08/12/2010 - 15:14

Permalink

धन्यवाद

एका नवीन झाडाची सचित्र ओळख करून दिल्याबद्दल!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 08/12/2010 - 18:39

In reply to धन्यवाद by स्मिता चावरे

Permalink

+१

हेच बोलतो. एका नवीन झाडाची सचित्र ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by येडबंबू on गुरुवार, 08/12/2010 - 15:20

Permalink

मला

मला वाटले प्रेमात काय काय फळे भोगावी लागतात ते सांगताय :) छान लेख. ---
  • Log in or register to post comments

Submitted by मनि२७ on गुरुवार, 08/12/2010 - 15:21

Permalink

सहि आहे लव फळ..... मनि

सहि आहे लव फळ..... मनि :-)
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on गुरुवार, 08/12/2010 - 15:32

Permalink

रसराज, येडबंबु, मनी धन्यवाद.

रसराज, येडबंबु, मनी धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 08/12/2010 - 16:06

Permalink

मला पण

मला पण येडबंबू सारखंच काहीसं वाटलं आधी, पण नवीन फळाची माहिती मिळाली.....( थोडं विषयांतर आहे, पण कुणी सांगेल का की लिखाणात स्मायली कसे अ‍ॅड करतात ?? मी नवीन आहे ईथे ....)
  • Log in or register to post comments

Submitted by हेमा on गुरुवार, 08/12/2010 - 16:30

Permalink

नवीनच पाहिल . मला माहित

नवीनच पाहिल . मला माहित नव्ह्त हे फळ
  • Log in or register to post comments

Submitted by हेमा on गुरुवार, 08/12/2010 - 16:31

Permalink

नवीनच पाहिल . मला माहित

नवीनच पाहिल . मला माहित नव्ह्त हे फळ
  • Log in or register to post comments

Submitted by हेमा on गुरुवार, 08/12/2010 - 16:31

Permalink

नवीनच पाहिल . मला माहित

नवीनच पाहिल . मला माहित नव्ह्त हे फळ
  • Log in or register to post comments

Submitted by हेमा on गुरुवार, 08/12/2010 - 16:31

Permalink

नवीनच पाहिल . मला माहित

नवीनच पाहिल . मला माहित नव्ह्त हे फळ
  • Log in or register to post comments

Submitted by हेमा on गुरुवार, 08/12/2010 - 16:31

Permalink

नवीनच पाहिल . मला माहित

नवीनच पाहिल . मला माहित नव्ह्त हे फळ
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on गुरुवार, 08/12/2010 - 17:01

Permalink

मस्त..

सचित्र माहिती छान आहे जागु, ह्या फळाची माहिती नव्हती. स्वाती
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 08/12/2010 - 17:59

Permalink

जागु ताय... फोटु युक्त नविन

जागु ताय... फोटु युक्त नविन माहिती बद्धल धन्स... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on गुरुवार, 08/12/2010 - 18:32

Permalink

नवीन

नवीन माहिती, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by भाऊ पाटील on गुरुवार, 08/12/2010 - 19:04

Permalink

फोटो दिसत नाहीत :(

फोटो दिसत नाहीत :( बाकी लव फळ पहिल्यांदाच ऐकले. त्यामुळे फोटॉ बघण्याची जास्त उत्सुकता आहे. याचे इंग्लिश नाव सांगता का? म्हणजे गूगलवर फोटो पाहता येतील.
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Fri, 08/13/2010 - 12:39

In reply to फोटो दिसत नाहीत :( by भाऊ पाटील

Permalink

ह्याचे इंग्लिश नाव मलाही

ह्याचे इंग्लिश नाव मलाही माहीत नाही. परत माहेरी गेले आणि हे फळ आले असले की मी ते फळ काढायला सांगुन त्या फळाचा फोटो टाकेन.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 08/12/2010 - 19:01

Permalink

पहिलांद्याच ऐकले , पाहिले !!

पहिलांद्याच ऐकले , पाहिले !!
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Fri, 08/13/2010 - 00:13

Permalink

नवी माहिती

हे फळ आणि फळाचे नाव प्रथमच ऐकले. सचित्र माहितीबद्दल धन्यवाद. ह्याल लव फळ असे नाव कसे पडले? माझ्या मते, "लव" फळ हे नाव धारण करण्याचा अधिकार फक्त सफरचंदालाच आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Fri, 08/13/2010 - 12:36

In reply to नवी माहिती by सुनील

Permalink

आहो जसे राम फळ सिता फळ तसे लव

आहो जसे राम फळ सिता फळ तसे लव फळ रामाचा मुलगा हो.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Fri, 08/13/2010 - 01:00

Permalink

नवीनच

नवीनच माहिती कळली. छान.
  • Log in or register to post comments

Submitted by रुपी on Fri, 08/13/2010 - 02:48

Permalink

छान

फोटोयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! केरळमध्ये बर्‍याच मसाल्याच्या बागा पाहता येतात. त्यामध्ये आम्हाला एक झाड दाखवले होते, हनुमान फळाचे. पण, खूप दिवस झाले त्याला. माझ्याकडे फोटोही नाहीत, आणि मला ते दिसायला कसे होते हेही आठवत नाही. कुणास ठाउक, कदाचित याच झाडाला तिकडे हनुमान फळ म्हणत असतील!
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Fri, 08/13/2010 - 12:40

Permalink

सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.

सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com