प्राक्तन
थोडं अंतर राहिलय आता... तो ठिपका अगदी जवळ आलाय.
किती तास, दिवस, महिने, वर्ष की युगे
अशीच लोटली माहित नाही
काळ जणु काही थबकुन गेलेला
प्रकाश अंधार ह्या कालाच्या खुणा कधी संपल्या माहित नाही...
किती काळ लोटला
त्या गुढ प्रकाशाच्या दिशेने जात आहे
जिकडं पहावं तिकडं फक्त अंधार
आणि
मिच्च काळ्या अंधारावर
फिक्कटसा दिसणारा तो ठिपका
चालत आहे अनंत काळापासुन त्याच्याच दिशेने...
वाटेत कित्येक पाय-या लागल्या
बुळबुळीत निसरड्या
पाय ठेवताच धप्पकन पाडुन परत माघारी पाठवणा-या...
कित्येक टोकदार काटेरी
पावलांमधे कचकन घुसुन
रक्तबंबाळ करणारे शिंपले अंगावर धारण करुन असलेल्या...
कित्येकदा गळ्यापर्यंत
रुतलेल्या चिखलाने थपथपत
तर कधी अकारण कोंडलेल्या
श्वासाने धापा टाकत टाकत ...
पण चालतच होतो त्याच्या दिशेने.
कित्येकदा त्याच्यापर्यंत पोहोचलो
झिरझिरीत तलम पांढुरक्या पडद्याच्या जवळ पोहोचलो
अनामिक उत्सुकतेने,
सुटकेच्या आशेने,
धडधडत्या छातीने,
पडदा ओलांडणार...
तोच पाय सटकायचा अन्
परत कोसळायचो खाली ...
परत चालु व्हायचा प्रवास ... तसाच अगदी तसाच
किती तरी वेळा असंच झालं.
आता परत तिथेच पोहोचलो आहे
मागच्या चुका परत करणार नाही
पाय सटकणार नाही याची काळजी नक्की घेईन
उगाच घाई करणार नाही
असं मनाला वारंवार बजावत
मी परत त्या पडद्यापाशी आलो आहे
आज ज्या ठिपक्याकडे पहात पहात मी हा प्रवास केला
कधी थकलो, दमलो, रक्तबंबाळ झालो
कधी चिडलो, ओरडलो, निराश झालो
कधी थांबलो, धावलो, तिरिमिरीत पडलो
तो हा प्रवास नक्की पूर्ण होईल...
बस्स ...
आता एक क्षण पुरे.
सुटका आता...
फक्त एक क्षणानंतर.
हा काळ सुद्धा किती लांब वाटत आहे
संपतच नाही
पाउल टाकले ... टाकले... टाकले.
पडद्याला ओलांडले.
आणि समजले ....
.....पायाखाली जमीनच नाही.
प्रतिक्रिया
नान्या, प्रतिभेला सध्या
ठाकठिक.. जुनेच रुपक सर्वत्र
मस्त...!
नाना म्हणजे घोर अंधार नाना
सुरेख आहे पण ...
नान्या हे असे मुक्तक भारी
नान्या लई टुकार कविता आहे.
मस्त रे नान्या
चालुन चालुन पाय दुखले रे !!!
मस्त रे नाना
व्वा !
प्राक्तन थोडं लांबल्या सारख
लांब
ह्म्म
हम्म...!
सर्व वाचकांचे आणि
फारसे झेपले नाही... पण