मैत्र जीवाचे
लहानपणीच शिवचरित्र वाचून भारावून वगैरे गेलो होतो. त्यानंतरच्या काळात शिकारकथा,जंगलकथा ई. प्रकार वाचून तर जंगल,डोंगर दर्यांची जास्तच ओढ वाटायला लागली. कोल्हापुरात राहत असल्यामूळ पन्हाळा भरपूरदा बघितलेला होता,इतर पण डोंगर चढून उतरून झाले होते. पण यालाच ट्रेक म्हणतात हे माहित नव्हतं.
पुढ पुण्यात आल्यावर 'ट्रेक' या विषयाची थोडीफार माहिती कळायला लागली,आजूबाजूच्या पोरातली काही पोर शनिवार,नारायण,सदाशिव म्हणावं तसं तोरणा,राजगड,सिंहगड म्हणत होती. मग ह्यांच्यात घूस,त्यांच्या बरोबर जा करत ट्रेकिंगची गोडी लागून गेली.
मग हळूहळू कळत गेल कि ट्रेकिंग म्हणजे नुसता टाईमपास नाही,यात गच्च भरलेली सेक घेऊन उन्हातान्हात हिंडण आहे. थंडीचा अंदाज चुकल्यावर कुडकुडून काढलेल्या रात्री आहेत. कधी रस्ता चुकला म्हणून मारलेला संपूर्ण उलटा फेरा आहे.,एकाच वाटेला २-३ फाटे फुटलेले दिसल्यावर कुणीकड जायचं म्हणून मित्रांशी घातलेला वाद आहे,आणि सगळ्यात शेवटी एक आव्हान आहे.
सुरुवातीला प्रश्न पडायचा कि हे सगळ का करायचं? होस्टेलवरचे मित्र सुट्टीदिवशी झोपणे,कपडे धुणे,सिनेमा बघणे अशा लोकमान्य कार्यक्रमात असताना आपणच हे का करतो? मग हळुहळु लक्षात यायला लागल्,कि आता या डोन्गर वाटांची आवड लागायला लागली आहे. मग इतर छंद आपोआपच कमी व्हायला लागले. भोवती ट्रेकप्रेमी लोकांचा ग्रुप जमला. छोटे छोटे 'प्लान' करून ट्रेक व्हायला लागले,आणि ४-५ जणांचा नेहमीचा ग्रुपच तयार होउन गेला. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या जबाबदार्या कळून पार पडायला लागल्या.
त्यानंतरची पुढची पायरी म्हणजे डोंगर ओळखता यायला लागले. कोल्हापूर ते पुणे प्रवासात रस्त्यात दिसणारे सगळे किल्ले ओळखता येऊ लागले. एखाद्या किल्ल्यावरून दुसरा ओळखीचा किल्ला दिसल्यावर एखादा मित्र भेटल्याचा आनंद व्हायला लागला. किल्ल्यावर जाताना ईतिहास,भुगोल ई. विषयांचा अभ्यास चालू झाला. ईतिहासाच्या अभ्यासाची मग गोडीच लागून गेली. किल्याचा ईतिहास तिथं पोचायच्या आधीच पाठ होउन जायचा. मग गडावर जाताना किंवा गेल्यावर 'त्या' खुणा 'ती ' ठी़काणं शोधणं चालू झालं.
गडावरची बांधकामं ओळखता यायला लागली. नविन दिसण्यार्या गोष्टींबद्दल चर्चा व्हायची आणि पुण्यात आल्यावर जाणकार लोंकांकडून अधिक माहिती मिळायची.
सतत जाउन राजगड्,तोरणा ,राजमाची,कमळगड,जीवधन अशा गडांच्या पायथ्याशी आपली हक्काची घरं,माणसं तयार झाली. हक्कानं त्यांच्या घरच्या कार्यांची आमंत्रणं यायला लागली.
आज मागं वळून बघताना असं वाटतं की , की किती किती दिलं या भटकंतीनं मला ?असंख्य आनंदाचे क्षणं दिले, मारलेल्या हाकेला "ओ" देणारी ,काहीही अपेक्षा न ठेवता घासातला घास काढून देणारी माणंसं दिली,भरपूर फी मोजूनसुद्धा मिळ्णार नाही अशी बरीच शिकवण या सगळ्यातून मिळाली. हीच माझी 'ईस्टेट' आहे ...जीवनभरासाठी !
प्रतिक्रिया
सुंदर लेखन
+१
ट्रेकचे ४/५ फोटु टाकले असते
मस्तच .......
लेख आवडला, पण आटपता
+१
ट्रेकचे फोटु
लेख आवडला.
खरी इस्टेट
सुन्दर लेख! भारतातले दिवस
फिरस्ता : मस्त शब्द
श्रीमंत आहात.
मस्त!!
आवडलं लेखन.. पुलेशु
मानले बुवा तुम्हा
छान लेख, पण वर बर्याच जणांनी
+१
फार छान
लेख आणि त्या अनुषंगाने मांडलेले विचार
प्रतिक्रिया
मुद्देसुद