(बघ त्याची आठवण येते का?)
चिरमुरे अन खोबरं ट्रॉलीत उभारून खा
बघ त्याची आठवण येते का?
हात लांबव , फळीखालून काढ उरलेली वर्गणी,
इवलासा पेग पिऊन टाक.
बघ त्याची आठवण येते का?
वार्यावर झुलणारे धुराचे ढग नाकात घे,
धूर पी , तल्लीन हो.
नाहीच आवडलं काही तर खाली उतर , राऊंडात ये,
ते चेकाळलेले असतीलच , पायात पाय तुडवत नाचत रहा.
मोरया ओरडेल कोणीतरी , बघ त्याची आठवण येते का?
मग चालू लाग , उरलेल्या नोटा मोजून घे,
पीत रहा नोटा संपेपर्यंत , त्या संपणार नाहीतच , शेवटी परत ये ,
वाटेत घसरु नकोस, ट्रॉली विसरु नकोस , पुन्हा त्याच ट्रॉलीत ये.
आता वरचा बोर्ड बघ , बघ त्याची आठवण येते का?
कानाखाली वाजेल , तोल सावर , पोलीस असेल,
ओशाळून कान धर , लाथ तो स्वतःच घालेल.
तो विचारेल तुला तुझ्या पिण्याचं कारण , तू म्हण घशात खाजतंय.
तो हात सोडेल , तू पाया पड.
कोणितरी उठुन 'ए गणपत' लावेल , ते तू बंद कर,
'चिकमोत्याची' लाव , बघ त्याची आठवण येते का?
मग रात्र होईल , सेक्रेटरी खुशीत येईल , म्हणेल मला बिर्याणी आवडते,
तू ही तसंच म्हण,
ट्रॉलीत घमघमाट होईल , ढेकरांचा गडगडाट होईल,
तो त्या फळीखाली झोपेल , वरच्या पाठ्मोर्या मूर्तीकडे बघ ,
बघ त्याची आठवण येते का?
यानंतर भकास डोळ्यांनी पावतीपुस्तक बघायला विसरू नको.
यानंतर उरलेली वर्गणी फक्त मोजायचा प्रयत्न कर.
यानंतर कानावर बिडी ठेव , झोपी जाण्याचा प्रयत्न कर.
येत्या गणपतीत एकदा तरी ,बघ त्याची आठवण येते का?
मस्त
क्या बात है अडगळभौ!!
सुंदर...
__/\__
विडंबन/ कविता सुरेख !
अप्रतिम
विडंबनाचा वेगळा विषय
>>कानाखाली वाजेल , तोल सावर ,
एकदम फ्रेश ... झक्कास विडंबन.
सर्वांना धन्यवाद
फारच छान !
अडगळशेठ,
सुंदर विडंबन...
+१
वेगळाच विषय निवडलाय, आणि जमलय
bag tyachi athavan yete ka?
आवडली
सही
कविता