प्रतिबिंब
हॅलो. अहो पोहोचलात का ऑफीसात ?
हो . पोचलो बोल लवकर. मला मिटिंगला जायचे आहे.
पाऊस आहे का ?
फालतू प्रश्न विचारु नकोस.
तुम्ही शनिवारचं तिकिट काढलं का पुण्याचं?
हो आत्ताच काढल. बोरीवली - स्वारगेट बसचं. म्हणजे स्वारगेटहून सिंहगड रोडला जायला सोपं
कॅन्सल करता येईल का ?
कॅन्सल ?अग तू ऑफीस मधे जाण्यापुर्वी तिकिट काढण्यासाठी मागं लागली होतीस आणि आता कॅन्सल करायचं म्हणतेस ?आता या एसटी च्या नव्या साईट वरुन तिकिट कसं रद्द करायचं ते बघायला पाहिजे. पण का? पुणे प्रोग्रॅम कॅन्सल करायचा ?
नाही नाही. मी काय म्हणते.
बोल लवकर.
आपण सिंहगडने जाऊ या का ?
बापरे आता रेल्वे बुकिंग ?
नाही या दिवसात रेल्वेचा प्रवास मस्त असतो. आपला बंड्या पण एन्जॉय करेल.
अग पण शिवाजीनगर हून सिंहगडरोडला जाणे म्हणजे फारच त्रासदायक
नाही. मी काय म्हणते. आपण पुणे स्टेशनला जाऊ
स्टेशनहून सिंहगड रोड ? त्यापेक्षा मुंबईतच राहू.
मी काय म्हणतेय. ऐकताय ना !
हा बोल पटापट
आपण असं केलं तर !
कसं?
आपण पुणे स्टेशनवरुन नगर रोडला तुमच्या मित्राकडे जाऊ या का ?
कुठे माधव कडे ?
हो ना .
पण एकदम त्याच्याकडे जायचं का आठवलं ? मागच्या वेळेला जाऊ या म्हणल तर म्हणालीस ..
असू दे असू दे . तुम्ही त्याला फोन करताय का तो शनिवारी आहे का विचारायला.
अग पण तुझ्या बहिणीचं काय झालं? तिच्याकडे जायच होत ना ?
हो पण ती कुठे रहाते ?
कुठे म्हणजे विठ्ठलवाडीला
अहो म्हणजे सिंहगड रोडला.
असं कोड्यात काय बोलती आहेस?
अहो आत्ताच ताईचा फोन आला होता. आणि तीने एक रिक्वेस्ट केली आहे.
कसली रिक्वेस्ट ?
तिने सांगितले की तुम्ही शनिवारच्या एवजी रविवारी या.
का?
कारण आपण ज्या दिवशी जाणार आहोत त्या दिवशी सम तारिख आहे.
हे काय सम तारिख , विषम तारिख.
अहो तिने सांगितले की त्यांच्या भागात सम तारखेला पाणी येणार नाहिये. तेंव्हा तुम्ही शनिवारच्या एवजी रविवारी या.
अच्छा अच्छा म्हणून म्हणालीस होय मित्रा कडे जाऊया म्हणून
चला ठिक आहे .फोन ठेव आता. बघतो काय करायचं ते. मित्राला फोन करुन विचारतो तुझी तारिख सम का विषम ? ;)
प्रतिक्रिया
आवडल हो
हा हा
+१
अशक्य!!!
(विषय दिलेला नाही)
संवाद
मस्त