दिवे आगर
नमस्कार मंडळी.
मागच्या वर्षी जानेवारीमधे दिवे आगर ला जाण्याचा अचानक बेत ठरला आणी आम्ही तीन मित्र निघालो. "अरे अचानक कुठे जाताय? रहायला जागा मिळणार नाही, सगळीकडे बुकींग फुल असतं" असं म्हणुन २-३ जणांनी टांग दिली तरी आम्ही तीन जण निघालोच.
जातानाच निसर्गाची सुंदरता जाणवायला लागली होती.
हॉटेल्स आणी लॉज फुल असणार माहित होत. आता रहाण्याची व्यवस्था फक्त एकाच ठिकाणी होणार म्हणुन गाडी सरळ माणगाव ला घेतली आणी तिथे आरामशीर रुम्स मिळाल्या. रुम बुक केल्या, बॅग ठेवल्या आणी दिवे आगर ला आलो. पुन्हा पुन्हा जाण्याची इच्छा होईल असं ठिकाण. हिरवाईने नटलेलं, निसर्गाचं वरदान लाभलेल एक छोटसं गाव. मोठा, स्वच्छ समुद्र किनारा लाभल्यानं पर्यटक येतात आणी तिथल्या लोकांना त्यामुळं थोडा पैसा कमवायचा लाभ मिळतो.
स्वर्ण्-गणपतीचा आशिर्वाद घेतला आणी समुद्र किनार्यावर गेलो.
बीच बराच मोठा आहे. व्हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल खेळायला चांगला वाव आहे. काही कॉलेजातले मुलं होते त्यांच्या बरोब आम्ही क्रिकेट आणी फुटबॉल खेळलो सुद्धा.
तास अन् तास बसुन रहाता येईल असा समुद्रकिनारा आणी सुर्यास्त. डोळ्यांच पारण फिटतं निसर्गाची कला पाहुन. :)
आपला,
मराठमोळा
प्रतिक्रिया
फोटो दिसत
हेच
+१
| मागच्या
>>फोटो मधे
ममो
मस्त रे...
भारी फोटू