नातीगोती व वंशावळी जपण्याचा नवा ई-मार्ग....
आजकालच्या धकाधकीच्या व अंतरजालाच्या जीवन पद्धती मध्ये नातीगोती जपणे खरोखरच अवघड झाले आहे, म्हणूनच कि काय आता हे जपण्यासाठी अंतरजालामध्येच हि सुविधा उपलब्ध झालि आहे.
www.geni.com हे संकेतस्थळ कसे काम करते??
Geni हे संकेतस्थळ आपण आपली वंशावळी बनवण्यासाठी वापरता येईल,आपल्या नातेवाइकांमधे नवीन कार्यक्रम किंवा छायाचित्रे प्रकाशित करता येतील, ह्या संकेतस्थळाचा उपयोग
आपल्या नातेवाईकांसोबत आपल्या वंशाच्या नवीन किंवा असलेल्या शाखांचा आराखडा बनवता येतो.
ह्या संकेतस्थलावरील सहज आणि सोप्या अंतरफलका (Simple Interface) चा वापर करुन तुम्ही स्वतःचे खाते बनवून स्वतःच्या परिवारपासुन सुरुवात करु शकतात. हे संकेतस्थळ
पुर्णपणे मोफत आहे व ते आपल्या नातेवाईकांना आपल्या वंशाचे सदस्य होण्यासाठी अत्यंत त्वरीत सम्पर्क साधुन नम्र विनंती / अर्ज देते. ह्या सोप्या कार्यप्रणाली मुळे तुम्हाला तुमची वंशावळी
फारच त्वरीत बनवुन त्याचा आढावा घेता येतो.
जसे जसे आपण आपली व माहिती असलेल्या नातेवाईकांची माहीती टाकाल, Geni स्वयंचलीत पध्दतीने तुमच्या परिवाराच्या ईतर परीवाराशी संभाव्य संबध असल्याची सुचना तुम्हाला
ई-पत्रा द्वारे कळवेल, जेणेकरुन तुमच्या वंशावळिचा / परिवाराचा विस्तार अधिक गतिने होतो. किन्बहुना आपली वंशावळी ही संपूर्ण जगतातील वंशावळीचा एक भाग पण बनु शकेल.
सध्याच्या वर्तमान परीस्थिती नुसार Geni वर संपुर्ण जगत वंशावळी मध्ये ४० लाखांवर खाते आहेत.
वंशावळीतील/ परीवारातील प्रत्येक सदस्याला एक वैयक्तीक खाते असते व ह्या खात्यावरुन त्याच वंशावळीतील ईतर सदस्याला त्याच्य बद्दल माहीतीची देवाण घेवाण करता येते, उदा.
छायाचित्र,नात्यांमधे होणारे लग्न,मुंजी,बारसे ईत्यादी. ह्याचा सर्वोत्तम फायदा म्हणजे आपले नातेवाईक व नात्यातील घडामोडींशी संपर्कात राहता येते.तसेच एक किंवा अधिक परीवार
मिळुन आपल्या पूर्वजांची वंशावळी अत्यंत सहज बनवता येईल.
Geni हे एक निजी संकेतस्थळ आहे. फक्त तुमच्या वंशावळीतील/ परीवारातील सदस्यच तुमचे खाते बघु शकतात. Geni तुमचा जालातील निरोप पत्ता ह ईतरत्र कुठेही प्रकशित करणार
नाही, त्यामुळे तुम्हाला spam ची चिंता नाही होणार. तुम्ही किंवा वंशावळीतील/ परीवारातील कर्त्या (Administrator) ने केलेले सर्व बदल सर्वांना एका दैनिक पारीवारिक वृत्तपत्राद्वारे कळवले जाते.
आधिक माहीती साठी कृपया येथे पहा....
मि.पा वर पहीले लेखन करीत आहे. चू.भू.मा. अ.
स्वछंदी पाखरु.....
आज का डोळ्यात माझ्या, पाणी पुन्हा दाटले होते...
कासाविस या व्याकुळ आत्म्यात, आभाळ भरून साठले होते...
पण... पंख पिंजर्यातच अडकलेले होते..........
प्रतिक्रिया
उपयुक्त
उत्तम
उपयुक्त
उपयुक्त माहिती
सही आहे..
प्रकाटाआ.
धन्स!!
धन्यु......
.....छान आहे
.....छान आहे